Skip to content

प्रेम करताय….मग एकमेकांना गृहीत धरून कसं चालेल!!

तू ही मेरा मीत है जी.


डॉ.राहुल दासु इंगळे

pantherrahul27@gmail.com .


तशी आमची ओळख फेसबूक वरच झाली. एम.पी.एस.सी (MPSC) ची तयारी करत असल्यामुळे ती घरीच अभ्यास करायची आणि मी मेडिकल चा विद्यार्थी माझी फायनल वर्षाची परीक्षा झाल्यामुळे मी पण जास्त वेळ फेसबूक वर असायचो.

आम्ही दोघे ही एकमेकांना खूपच जास्त वेळ द्यायला लागलो. सारखे फोन ,मेसेजेस. मेसेज ची तर दिवसाची लिमिट संपायची. एकमेकांची काळजी घेणारे मेसेज,फेसबूक,व्हाटसप ते फोन कॉल ह्या सर्व टप्यातून गेल्यानंतर ज्या ठरलेल्या टोकाचा उगम होतो तो म्हणजे प्रपोज आणि तो दोन्ही कडून आला. दोघांनी ही स्वीकार केला .

रात्री 2-3 शिवाय आम्ही झोपत नव्हतो .सारखा फोन चालू असायचा. तस आम्ही दोघ एकमेकांना कधीच भेटलो नव्हतो. दोन महिन्यांनी कॉलेज संपल्यामुळे मला घरी जाव लागलं. घरी गेल्यापासून वेळ भेटत नसल्यामुळे तिला मेसेज करण होत नव्हतं. हळूहळू कॉल पण कमी झाले. दिवसभरात कितीतरी वेळ बोलणारे आता संध्याकाळी किवा सकाळी फक्त एकवेळा बोलयला लागलो. मी घरी असल्यामुळे तिने पण ते मान्य केल.

या वेळी मात्र मला सात दिवसांपासून तिला कॉल करता आला नाही.तिने पण रागाने केला नाही. खूप वेळ माझी कॉल करण्याची वाट बघितल्या नंतर तिने रात्री मला कॉल केला.एक दोन वेळा मी टाळला पण तिने परत कॉल केला म्हणून मी रागात फोन उचलला आणि जोरात ओरडायला लागलो “मी घरी आहे,आई वडील आहेत माझे घरात कळते का ?” अस म्हणत मी रागाने फोन ठेवून दिला.

थोड्यावेळाने तिचे दोन मेसेज आले त्यात लिहल होत “गेल्या सहा महिन्यापासून मी बाजूला माझी आई,बहीण असून देखील तोंडावर चादर घेऊन तुझ्याशी बोलली तू रात्री बारा,एक,दोन कधी पण कॉल केल्यावर मी उचलला कधीच नाही म्हटलं नाही आणि आज तु एका शब्दात म्हणतो की मी घरी आहे कळत नाही का ? …… थॅंक यू .

तिच्या मेसेज मधला एक एक शब्द जणू बाणा सारखा माझ्या हृदयात टोचल्या सारखा झाला.माझे डोळे पाणावले मि लगेच तिला कॉल केला पण तिचा नंबर स्विच ऑफ आला.

तिच व्हाटसप बंद होत, तिच फेसबूक अकाऊंट ओपण केल्यावर Somthing Error येत होत .त्या एका रात्रीत मी ७०० मेसेज आणि २३०७ वेळा तिला फोन केला पण तिचा नंबर स्विच ऑफ च होता.एक वर्ष झाले तिचा फोन स्विच ऑफ च आहे.

कितीही संकटात असताना तिने मला शब्दाच्या मिठीत घेऊन शांत केल होत ……… मला रडण आवडत नाही म्हणून मि तिला नेहमी म्हणयचो रडल्याने प्रश्न सुटत नसतात. आज मात्र मला फक्त एकवेळा तिच्या समोर रडायच आहे म्हणून गेल्या एक वर्षा पासून तिला रोज फोन करतो पण तिचा फोन स्विच ऑफ च आहे………..

आज तिला फोन केल्यावर तिचा फोन रिंग झाला माझ्या चेहऱ्यावर नकळत एकदम स्मित हास्य आल.पुर्ण अंग रोमांचीत व्हायला लागल .माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तीचा फोन रिंग होने ही खुशी आवरत नव्हती.दोन्ही हात पाय हालायला लागले. तिने फोन उचलला आणि हॅलो अस म्हणत एक पुरुषाचा आवाज आला .माझ अंगच गरम झाल मि मोठ्याने श्वास घेत त्या माणसाला कोमल आहे का म्हणुन विचारलं त्या पुरुषाने नाही म्हंटल आणि रॉन्ग नंबर म्हणुन फोन ठेऊन दिला …….

५४८ दिवसापासून ती फोन उचलेल ही एकच वाट एका रॉन्ग नंबर शब्दाने आज पुर्णपने संपली होती ……..

हृदय जड पडल तितक्यात डोअर बेल वाजली म्हणुन मि दार उघडायला गेलो.तर ति दारात उभी. तिचे दोन्ही हात पाठीमागेच होते. तिने हात समोर केला तिच्या हातात केक होता. तिला बघुन माझे अश्रु आवारतच नव्हते.तिने मला कच्च मिठी मारली.तिच्या उबदार मिठीने मला शांत केल. तिने हळुवार पणे डोक्यातुन हात फिरवला . मला रडताना बघितलं आणि हसली मि पण थोड हसलो .तिने माझे ओले डोळे पुसले .मि तिला लगेच उचलुन घेऊन गोल फिरवायला लागलो…….ति नको नको म्हणत जोरा जोरात हसायला लागली ……..
तिच्या हसण्यातुन ५४८ दिवसाच दुखः बाहेर येत होत …………आणि मि फक्त तिच्या हसण्यातुन सुख वेचायला लागलो .

ज़रा सी बात पे
जब हंसती है तू
हंसती है मेरी ज़िन्दगी

तू ही मेरा मीत है जी
तू ही मेरी प्रीत है जी
जो लबों से हो सके ना जुदा
ऐसा मेरा गीत है जी.

आवडल्यास मेसेज करून प्रतिक्रिया कळवा…



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!