Skip to content

पहिलं ‘I love myself’, त्यानंतर मग ‘You’!!

I Love Myself


Malhar Shingade


हे वाक्य माझ्या रोजच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. मी स्वतःवर प्रेम करतो.हे मी स्वतःला रोज सांगतो आणि हे सांगताना मला रोज तेवढाच आनंद होतो. मी रोज सकाळी आरस्यात स्वतःला पाहतो. स्वतःकडे पाहून हसतो आणि नवीन दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो.सोबत दिवसभरातील कामासाठी प्रेरणा पण देतो. किती सहज सोपे आहे हे सगळं.

मी मनामध्ये कोणाचा राग नाही ठेवत.लगेच माफ करून टाकतो.जरी राहिलाच राग तसा तर मग शांत एकांतात बसून स्वतःची समजूत काढतो, कि कोणाचा राग मनात ठेवण्यापेक्षा स्वतःबद्दल प्रेम बाळगणे कधीहि चांगलं. मनालाही लगेच पटू लागतं.

मी कुणाच्या प्रगतीचा, यशाचा द्वेषही नाही करत.कोणाशी उगाच द्वेषपूर्ण स्पर्धाही करत नाही. आधी वाटायचं पण आता नाही. यशस्वी व्यक्ती सुद्धा आपल्याच जीवनाचा एक भाग आहे.आपल्याला प्रेरणा देण्यासाठी,आपणही जिंकू शकतो याची ग्वाही देण्यासाठी.त्यातून जे काही शिकायचं आहे ते शिकूनही घेतो.अगदी सहज.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, मी स्वतःला योग्य महत्व देतो.उगीच अपयश, चुकीचे निर्णय, अपमान यांचा त्रास स्वतःला करून नाही घेत.मनात कमीपणाची, अपराधी पणाची भावना नाही बाळगत.त्यामुळे मी स्वतःला कधीच दोषी समजून रडत नाही बसत. कोणाकडून आणि स्वतःकडून अवाजवी अपेक्षा ठेवतच नाही.

मी राग, अपराधीपणा आणि मत्सर या शत्रूंवर मात मिळवण्यात जवळ जवळ यशस्वी झालोय कारण “I Love Myself” हा मंत्र मला नीट समजला.

आता वरीलप्रमाणे “मी मी” म्हणणं योग्य आहे का ? असेही वाटेल ना. पण आज माझा जन्मदिवस आहे तर तेवढा एका दिवसाचा अधिकार राखून ठेवलाय मी. हजारो लोकांना प्रशिक्षण दिले, मार्गदर्शन केले आणि त्यांच्याकडून नेहमी शिकत राहिलो. एक विध्यार्थी म्हणून..! त्यामुळे वरील “मी ” पणा साधेपणातला आहे.

असो, सांगायचं एवढंच कि स्वतःवर प्रेम आपण करतो, पण ते स्वतःला सांगत नाही. ते सांगणं आवश्यक आहे.कारण आपण स्वतःच आयुष्यभर स्वतःच्या सोबत राहतो. पुढे अशी वेळ येते की आपण मग स्वतःचा राग करायला लागतो, स्वतःला अपराधी समजायला लागतो.दोषी ठरवतो स्वतःला. तेव्हा एकटं समजू लागतं. जीवन नको वाटतं. जवळचे सगळे दूर झाल्याची जाणीव तीव्र वाटू लागते.

आपल्याला कोणी समजूनच घेत नाही असे जाणवू लागते. या जाणीवाच मुळात आपल्याला असह्य असतात..हो ना?
मग हे सांगणे पण आवश्यक आहे आपण स्वतःला स्वतःच्या नजरेत कसे पाहतो. स्वतःला स्वतःच्या जीवनात किती महत्व देतो. स्वतःच स्वतःला किती प्रेम करतो…पटतंय ना ?

आज मी स्वतःलाच Happy Birth Day मोठ्याने म्हणालो. तेव्हा Love You Dear म्हणायला पण विसरलो नाही..न डगमगता..!

करून पहा मग एकदा…असे रोज.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!