Skip to content

ज्यांची मुले – मुली १८+ आहेत, त्या सर्व पालकांसाठी!!

ज्यांची मुले – मुली 18+ आहेत, त्या सर्व पालकांसाठी!!


बाप-लेकयुवक-पालक मेळाव्यातील युवक-युवतींच्या नव्याच समस्या ऐकून मन विदीर्ण झालं. आई-बाबांचा संपूर्ण आदर राखून ही मुलं फार धिटाईनं बोलत होती. आदिती नावाची मुलगी म्हणाली, ‘दोघंही खूप बिझी आहेत, हे मान्य आहे; पण दोघं जेव्हा घरात येतात तेव्हाही ती दोघं विसरूनच गेलेली असतात की त्यांना एक मुलगीही आहे.

एकजण लॅपटॉपवर ऑफिस उघडून तर दुसरा मोबाइलवर. अक्षरश: आमच्या दोन हजार स्क्वेअर फिट फ्लॅटच्या घरात मी पोरकी आहे! आणि अचानक ती रडायलाच लागली. सार्‍यांचेच डोळे भरून आले.

सौरभ उठला. त्यानं हातात माईक घेतला. आदितीच्या बोलण्याचं सूत्र घेऊन तो म्हणाला, ‘खरंच आहे आदिती जे म्हणाली ते. आम्ही चॅटिंग करतो. व्हॉट्सअँपवर खूप रमतो, ते चूकच आहे; पण ती गरज आम्हाला का वाटते. याचा विचार कुणी केलाय का? आमचा सारा दिवस कसा गेला. हेसुद्धा पप्पा-मम्मी विचारत नाहीत. एक तर सीरियल्स नाही तर मोबाइलवर. मग आम्ही आमचं मन शेअर कुणाशी करायचं? आमचं चुकत असेल; पण त्यांचं तरी आम्हाला इतकं विसरणं बरोबर आहे का?’

सौरभ घुश्श्यातच खाली बसला. वातावरणात एक तणाव पसरला.

तन्वी विचार करत होती. बोलू की नको? हातसारखा वर पट्कन खाली घेत होती. निवेदिकेनं तिला विश्‍वासात घेतलं –

‘ये, बोल मोकळेपणानं.’

तन्वी आणि ती जे म्हणाली समुपदेशकांना एक आव्हानच ठरावं.

तन्वी म्हणाली, ‘आमचं आताचं वय अठरा ते वीस दरम्यान आहे. या वयात प्रत्येक मुलीला मुलाबद्दल अँट्रॅक्शन वाटतं आणि हे बट नॅचरल. वाटतंच. कुणा पुरुषाच्या आपण जवळ असावं; पण त्यात सारा भाग सेक्श्युअल नसतो. एक सेफ्टी फील करतो आम्ही. एक पुरुष फ्रेंड आहे आमचा. खरं सांगू? यात एक वेगळं सांगायचंय मला.

आम्हा मुलींना आमच्या बाबांबद्दल आईपेक्षाही जवळीक वाटते. याचसाठी; पण बाबांना वेळ नाही. घरी असले तर ऑफिस डोक्यात. येणार रात्रीच्या केव्हा तरी. नाही तर फॉरेन टूर.’ तन्वी थोडी
थांबली. दाटलेला गळा, आवंढा गिळला तिनं. मग धीर करून म्हणाली, ‘प्रत्येक मुलीला तिचा बाबा मित्र म्हणून मिळाला नां तर आम्ही इतर पुरुष फ्रेंड करणारही नाही. आमचे बाबा आमचे मित्र व्हायला हवेत. आमच्या मनातलं आम्ही त्यांना खूप मोकळेपणाने सांगू शकायला हवं. त्यांनी आम्हाला आमचं चुकत असेल तर समजून सांगायला हवं. कित्येक प्रश्न सुटतील. काही प्रश्न तर निर्माणच होणार नाहीत. आज इथं माझे बाबा समोर आहेत. मी त्यांना सॉरी म्हणते. मी चुकत असेन, हे सांगून तर मला माफ करा. मी हात जोडते. फक्त माझे मित्र व्हा!’

तन्वीसह सारे सभागृह अश्रूत बुडून गेले. त्या आसवात फक्त दु:खाचे कढ नव्हते. नव्या पिढीचं आक्रंदन होतं. पुष्कळ वेळ एक नि:स्तब्धता होती. मग शर्वरी उठली. आता ही काय बोलते आहे याची उत्सुकता होती.

शर्वरी प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची. उंच-सडसडीत. डोळे बोलके, स्माईली, बोलायला लागली. ‘माझे बाबा मात्र माझे चांगले मित्र आहेत. खूप गप्पा करतात. सिनेमालाही नेतात. मित्र-मैत्रिणींशीही छान बोलतात. मला अभिमान वाटतो. माय डॅड इज बेस्ट डॅड! मीच त्यांच्याशी आतापर्यंत वाईट वागत होते. उगीच रागावत होते. हट्टीपणानं खूप काही मागत होते. आज सर्वांच्या समोर मी म्हणते – सॉरी डॅड! सॉरी रिअली सॉरी!’ शर्वरीनं सर्वांच्या समोर आपल्या बाबांची माफी मागितली. सुसंवादाच्या या कार्यक्रमात एक मन मोकळं होत आहे, याचा मला आनंद झाला; पण हा आनंद काही क्षणच टिकला. पालकांमधून एक गृहस्थ उठले. त्यांचे डोळे भरलेलेच होते. व्यक्तिमत्त्व उमदं होतं. जीन्सची पॅण्ट, टी-शर्ट यामुळे वयापेक्षा तरुण वाटत होते. त्यांनी बोलायला सुरुवात केली.

‘आता शर्वरी बोलली ना, तिचा मी बाबा.’ मग एक दीर्घ श्‍वास घेऊन ते म्हणाले, ‘आज माझ्या लेकीनं मला हरवलं. पूर्ण हरवलं. शी इज् रिअली ग्रेट! तिनं जे जे माझ्याबद्दल सांगितलं, त्याच्या अगदी उलट आहे मी. मी तिच्याशी अगदी इथं येईपर्यंत वाईट वागलोय. कधीही तिला प्रेमानं मी जवळ घेतलं आहे हे मला आठवत नाही. सिनेमा तर जाऊच द्या, एकत्र जेवणही खूप वर्षांत केलेलं नाही. फक्त मार्कांच्या चौकशा केल्या. कधी कुठून उशिरा आली की फक्त रागावलो न् खरं सांगतो. माझ्या या गोड लेकीला मी मारलं सुद्धा! शर्वरी, आज तुझ्या या बोलण्यानं मी बदललो गं, शर्वरी मी तुझी माफी मागतो. उद्यापासून – उद्यापासून तुझा हा डड्डा – तुझा फ्रेंड असेल, बेस्ट फ्रेंड!’

शर्वरी भावनावेगाने व्यासपीठाकडे धावत गेली सर्वांच्या समोर बाप-लेक एकमेकांच्या कुशीत स्फुंदताना सारं सभागृह रडत होतं.

नव्या मुलांचं दु:ख घरात असूनही बेघर! आई-बाप असूनही पोरकेपणाचं!

खरंच हे वाचून आपण काही समजून घेणार आहोत का?

आपण सारे या नव्या पिढीचे मित्र होणार आहोत का? तसे होऊया. ही पिढी खरंच गोड आहे. अति बिझीपणाचा डायबिटीस झाल्यामुळे हा गोडवा आपल्याला कळत नाही इतकंच!


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!