
ऊर्जा म्हणजे काय❓ति मुलांच्या व आपल्या आयुष्यात कसे कार्य करते ❓
प्राजक्ता पंडित
समुपदेशक,पुणे
“Energy follows Thoughts” ?
ऊर्जा ही अविरत प्रवाहित होत असते. ऊर्जा आपल्या विचारांनी निर्माण होत असते. मग विचार सकारात्मक असतील तर ऊर्जा ही सकारात्मक असेल आणि नकारात्मक विचार असतील तर साहजिकच तीच ऊर्जा आपल्या अवतीभवती व जिथे जिथे आपण ती निर्माण करतोय तिथे तिचा प्रभाव असतो. मग आपल्याला त्या ऊर्जेची स्पंदने जाणवू लागतात.
उदा. घरात आई बाबा मुलांसाठी जे मनात विचार करीत असतात त्या सर्व सकारात्मक-नकारात्मक भावना,विचार स्पदनांच्या व ऊर्जेच्या माध्यमातून मुलापर्यंत पोहोचतच असतात. आपण नकळत मुलांचे माईंड प्रोग्रॅम करीत असतो. या सर्व घडामोडी खूप सूक्ष्म स्तरावर घडत असल्यामुळे आपल्याला त्याची कल्पना येत नाही परंतु त्याचे परिणाम नक्की दिसायला लागतात*. मुलांचे जसे माईंड प्रोग्राम झालेय तश्याच त्याच्या प्रतिक्रिया व परिणाम दिसायला लागतात व आपल्याला प्रश्न पडतो – आपण तर सतत यांच्याशी सकारात्मक बोलतो पण ही मुलं अशी का वागतात? कारण स्पस्ट आहे या तोंडाने जरी सकारात्मक बोलत असलो तरी मनात जे बोलतोय तेही मुलांपर्यंत , त्यांच्या अवचेतन मना पर्यंत पोहचत असते.
हल्ली मुले फोन,लॅपटॉप घेऊन एकाच रूम मध्ये बसण्याचे प्रमाण वाढलेले दिसते,त्यात खिडकी दरवाजे बऱ्यापैकी बंद ठेवले जातात त्यामुळेतर या गॅजेट्स मधून निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा तशीच साचून राहते व मुलांची मानसिकता सुद्धा तशीच तयार होतांना आढळून येतेय.
ज्या प्रकारच्या उर्जेला आपण जोडलेले असतो तशीच माणसे,परिस्थिती, परिणाम आपल्याला आयुष्यात मिळत असतात.
? सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी काय करावे❓
✨ प्रार्थना करणे
✨ ध्यानधारणा करणे
✨ घरात हवा खेळती राहील याची काळजी घेणे
✨ कापूर जाळणे
✨ सकारात्मक विचार करणे
✨ इतरांसाठी सुद्धा उत्तम भाव ठेवणे
✨ माफ करायला शिकणे
✨ नेहमी कृतज्ञ असणे
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !धन्यवाद !
