
होय, मी बदलतोय!
अनुवाद -किरण देशपांडे.
वाचनात आलेल्या एका इंग्रजी कवितेचा मी केलेला अनुवाद.
होय, मी बदलतोय !
आई वडिल, भावंडे, बायको मुले या सगळ्याना आतापर्यंत लळा लावून झाल्यावर,
आता मी स्वत:वर प्रेम करायला लागलोय.
होय, मी बदलतोय !
मला आता कळलंय की मी काही एकटाच नाही.
विश्वाची चिंता करण्याची जबाबदारी माझ्यावर नाही.
होय, मी बदलतोय !
मी आता गरीब भाजीवाल्याशी घासाघिस करणे बंद केले आहे. कारण की २ – ५ रुपयांनी माझा खिसा काही रिकामा होणार नाही. पण त्याच्या लहान मुलीला शाळेत जायला मदत होऊ शकते.
होय, मी बदलतोय !
आजकाल मी रिक्षातून उतरल्यावर सुटे पैसे घेण्यसाठी थांबत नाही.
त्यामुळे रिक्षवाल्याच्या चेहर्यावर स्मित झळकते.
जगण्यासाठी माझ्यापेक्षा तो जास्त महेनत करतो.
नाही का?
होय, मी बदलतोय !
आता मी वडिलधार्यांना तीच तीच गोष्ट परत परत सांगण्यावरून टोकत नाही. कारण ते जुन्या आठवणींमध्ये रमत असतात आणि प्रसन्न होत असतात.
होय, मी बदलतोय !
मी आता शिकलोय, की दुसर्याची चुक असेल तरी त्याला सुधारण्याचा प्रयत्न करायचा नाही.
कारण जगाला सुधारण्याचे उत्तरदायित्व माझ्यावर थोडेच आहे.
मला माझी शांतता जास्त महत्वाची आहे.
होय, मी बदलतोय !
मी आता मनापासून तोंडभरून काैतुक करायला शिकलोय. कारण त्याने मन उल्हसित होते त्याचे आणि माझे दोघांचेही.
होय, मी बदलतोय !
इस्त्रीच्या घडीचा वा कपड्यावरील डागांचा मी आता बाऊ करीत नाही.
कारण व्यक्तिमत्व प्रखर असते पेहेराव नाही.
होय, मी बदलतोय !
ज्यांना माझी किंमत नाही त्याच्यापासून मी दूर राहायला शिकलोय.
कदाचित त्यांना माझी लायकी कळत नसेल पण मला माहित आहे.
होय, मी बदलतोय !
स्पर्धेतून बाद करण्याकरिता माझ्याविरुद्ध कोणी राजकारण खेळू पाहिलं तरी मी अविचल राहातो.
कारण ना की मी स्पर्धक आहे ना स्पर्धेत.
होय, मी बदलतोय
मी शिकतोय की स्नेहबंध उसवण्यापेक्षा ‘मी’ पण टाकणे चांगले.
कारण मी पण मला एकटा पाडेल तर स्नेहबंध कधिच एकटेपण जाणवू देणार नाहीत.
होय, मी बदलतोय !
रोजचा दिवस मी असा जगतो की जणू हा आयुष्यातील शेवटचा दिवस आहे.
कुणी सागावे ?
कदाचित असेलही.
होय, मी बदलतोय !
मी आताशा तेच करतो ज्याने मला आनंद मिळेल.
मी आनंदित राहाणे माझ्याच हातात आहे.
आणि ते,
माझे मीच देणे लागतो.
मूळ संहिता – माहित नाही. क्षमस्व
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

