Skip to content

माणूस श्रीमंत झाला की अनेक समस्या वाढतात..

माणूस श्रीमंत झाला की अनेक समस्या वाढतात..


निखिल गर्कळ,
अक्षर मानव

१५.०२.२०२०


माणूस श्रीमंत झाला तर अनेक समस्या कमी होतात , पण माणूस श्रीमंत झाल्यावर अनेक समस्या वाढतातही . अनेकदा श्रीमंत माणूसच आधीच्या समस्याही वाढवतो .म्हणजे श्रीमंत होणं हा उपाय अर्धसत्य आहे, उरलेला दुसरा भाग काय? श्रीमंत झाल्यावर त्याला काड्या करायला भरपूर वेळ मिळतो. त्याचा तो वेळ इतर ठिकाणी गुंतवता आला पाहिजे. पारंपरिक उपाय संमिश्र निकाल देतात , पण आधीच्या समस्या मिसळून माणूस अधिक समस्या वाढवतो .तर नवीन उपाय काय ? संशोधन करणे , जुन्या-नवीन उपायांमध्ये. कला , विज्ञान, खेळ यात रमणे , त्याला गरीबी आडवी येत नाही, उगी रडगाणे गायले नाही पाहिजे . श्रीमंत माणसाला काड्या करायला वेळ भेटल्यावर तो बाकी लोकांना श्रीमंत होऊ देईना, निदान तसं होण्याची गती मंद होण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो.वास्तवात हे चालत आलेलं आहे म्हणून वेगळा विचार त्याच्यापाशी नसतो . बहुजन हिताय बहुजन सुखाय यात आपला प्रभाव वाढणार कारण आपण त्यासाठी झटलो असं मनात न येण्याएवढा हा श्रीमंत भित्रा असतो , त्याला वाटतं हे , ते आपल्या पुढं जातील ?

अरे , अगं स्वतःच स्थान निर्माण करा , लोकं पुढं गेली तरी लक्ष तुमच्यावरच राहील.

आणि जगात न सुटलेल्या अनेक समस्या आहेत. कुणाला शास्रार्थ पाहायचा असेल तर गणित , विज्ञान त्यांच्या शाखा-उपशाखा यांत अनेक समस्या आहेत त्या कोणत्या त्या जाणून घेणे व सोडवण्याचा प्रयत्न करणे. या आपल्याशी संबंधित नाहीत असं वाटू शकतं पण खरंतर त्या आपल्या अस्तित्वाशीच संबंधित आहेत. माणूस स्थिर झाला मन व बुद्धीने की त्याकडे लक्ष देईल.

सध्या समाजशास्रीय समस्या आधी सोडवणे भाग आहे. त्यात जातीयवाद , असहिष्णुता, भ्रष्टाचार, लिंगभेद, अंधश्रद्धा इ. विषय येतात. समस्या सोडवताना लक्षात येतं की त्याआधी आर्थिक प्रश्न सोडवायला पाहिजे. म्हणजे पुन्हा श्रीमंत कसं बनायचं असं वर्तुळ वाटू शकतं , पण हे सर्पिलाकार आहे ( Spiral) , म्हणजे एककलमी कार्यक्रम नाही . तर अर्थशास्रात आपल्या गरजा आणि संसाधनं यांची सांगड घालावी लागते .

म्हणजे पुर्ण आठशे कोटी ( होतील लवकरच!) किंवा पुढे आणखी जेवढे होतील तेवढे लोकांच्या अन्न , वस्त्र आणि निवारा या गरजा भागल्या पाहिजेत. आपण अनेक उपाय सुचवू शकतो, कल्पकतेची वाणवा किंवा कमतरता नाही; पण कल्पकता कल्पकतेने आणि व्यवस्थित राबवणे कठीण आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू ठेवायला हवेत. सत्ताकारण आणि इतर गोष्टी कासवाच्या पाठीवर उचलायला हव्यात. त्यामुळे सुरूवात म्हणून अन्न, पोषण या समस्येवर कृती कार्यक्रम राबवायला हवेत. सर्व प्रश्नांचे आंतरसंबंध असतात म्हणून शिक्षण, आरोग्य या गरजा भागवण्यासाठी काळजी घ्यायची आहेच. एक के बाद एक हे आपल्या सोयीसाठी असतं, तसा तर सर्व व्याप आणि उपद्व्याप सोबत घेऊनच चालायचा असतो ; तुम्ही नाही म्हणालात तरी तो येणारच आहे सोबत. तरी आपण सर्वांना दोन वेळचं आरोग्यदायी पौष्टिक खायला भेटावं म्हणून काय करता येईल ते पाहायला हवं.

यावर अनेक उपाय आहेत ते यथाशक्ती करूया , सध्या तरी जानेवारी २०२० मध्ये ठरवल्याप्रमाणे महिन्यातील कोणताही एक दिवस लाक्षणिक उपोषण करायचे, बॅनर वगैरे काही नाही, रोजची कामेही बंद नाही , फोटो वगैरे काही नाही, आपला प्रामाणिकपणा फक्त. तर १६ फेब्रुवारी २०२० ला दिवसभर उपोषण. रात्री बारा वाजल्यानंतर १७ फेब्रुवारी ला पाणी पिऊन खुश व्हायचं?

टीप : दोन तीन उपरोधिक वाक्य टाळली आहेत , लाईक कमी होतात ? लाईक च काही पडलेलं नाही , अल्गोरिदमनुसार जितके लाईक जास्त तितकं लोकापर्यंत पोहोचणार. मूळ प्रश्नाकडं कुणी लक्ष देत नाही अशी ओरड आपण करतो , म्हणून अशा प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा साधासोपा प्रयत्न.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!