
मला हे फार जाणवतंय.. तुम्हाला काय वाटतं?
आजकाल चौथी पाचवीपासून काहीजण मुलांना स्मार्ट फोन देतात.. आईबाबा नोकरी करणारे आणि मूल कुठेतरी , कोणाच्या तरी हाताखाली वाढत असतं ज्यावर पालकांचा ना कंट्रोल ना ही ते नीट वाढतंय का यावर लक्ष..सध्या नेट वरून काय येतं येऊ शकतं यावर कंट्रोल नाही..
फिल्म्स च्या आयटम सॉंग मध्ये काय दाखवताय, कॉलेजच्या मुलींना छेडत मागे फिरणारे हिरो पण दिसतात ज्यांना फार ग्लोरिफाय केलं जातंय, आमच्या तमाम सो कॉल्ड हास्य किंवा कॉमेडी नामक कार्यक्रमातून बाई ही एक टर उडवण्याची गोष्ट झालीये मग तिचा रंग, जाडी वा बारीक, बुद्धधी कमी वा जास्त etc काहीही पकडायच आणि चेष्टा करत सुटायचं जस काही ..ती एक ऑब्जेक्ट.. यावर कोणाचा कंट्रोल नाही..
मालिकेत स्त्री चा वेगळाच अवतार.. either मठ्ठ गोळा किंवा धूर्त कपटी कारस्थानी.. असलं दाखवायचं.. आजकाल गाणी पहिली तर कमी कपड्यातल्या असंख्य मुली बायका .. त्यांच्यामागे पागल जनता.. किंवा मग मराठी गाणी पहिली तर आमदार झाल्यासारखं वाटतय, शांताबाई types गाणी ..म्हणजे आलं ना लक्षात मला काय म्हणायचंय..
बर ते जाऊ दे रिऍलिटी शो मध्ये पाहावं तर dance च्या नावाखाली अंगविक्षेप चालतात, अनेक छोट्याशा मुलीपण लावण्या सादर करतात डोळे मारत, कामुक इशारे करतात अर्थात त्यांना तसं शिकवलं जातं ज्याचा त्यांना अर्थही कळत नसतो पण त्या करतात प्रेक्षक टाळ्या वाजवतायत परीक्षक ते डोक्यावर घेतात..ना त्या मुलांच्या पालकांना ना प्रेक्षकांना आणि ना त्या विद्वान परीक्षकांना याच काही वाटत..
आजकाल फिल्म्स पहिल्या मराठीतल्या तर खूपदा शाळेपासून असलेलं लव्ह अफेअर दाखवतायत ज्याला again ग्लोरिफाय केलं जातंय.. हिंदीबद्दल वेगळं काय सांगावं डिसेंसी कमीच दिसते regarding बायकांबद्दल असणाऱ्या values…
हे सगळं आसपास सर्रास चालतं.. आणि मग एखाद्या मुलीवर ऍसिड हल्ला होतोय, बलात्कार होतोय, तेंव्हा अचानक मनाला जाग वैगरे येते आणि सगळे जण मिळून बायका आणि त्यांना मिळायला हवी ती dignity वैगरे बद्दल बोलायला लागतात…
विचार करून मुलांना जन्माला घालणारे लोक कमी आहेत, जन्माला घातल्यावर मुलांना लक्ष देऊन वाढवणारे पालक मूठभर आहेत. निम्मे पालक वैयक्तिक लाईफ मध्ये इतके फसत जातात की स्वतः चा डीव्होर्स आणि ऑल मध्ये मुलांची काय फरफट होतेय हेही पाहत नाहीत..
आणि याच्या दुसऱ्या बाजूला… जिथे पोसायची ताकद नाही तिथे मुलं वाटेल तेवढी जन्माला येत आहेत ना त्यांना प्रेम मिळतंय ना care ना नीट शिक्षण… संस्कार तर दुरकी बात… मात्र यांच्याकडे नेट पोचतंय, स्मार्ट फोन पोचलेत, पॉर्न पोचतंय..
प्रश्न गरिबी श्रीमंती हा नाहीच…मूठभर विचारी लोक आणि ढीगभर अविचारी, गांजलेले लोक आणि त्यात विकसनशील अशी परिस्थिती असणाऱ्या देशात… मीडिया ज्या पद्धधतीने धुमाकूळ घालतोय तो न पेलवणारा आहे so.. स्त्री प्रश्न, आणि त्यांना मिळणारी वागणूक यावर विचार करायचा असेल तर त्याची पाळंमुळं फारच deep आहेत… अनेक levels ला काम करावं लागेल..
तुम्हाला काय वाटतंय?
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !धन्यवाद !
