
पालकांनो, तुलना नकोच!!
सौ सुरेखा अद्वैत पाटील
मुंबई (पाचोरा)
तुलना नकोच!कोणत्याही खोल जखमेचा व्रण मागे राहतोच…
आपण घर, शाळा किंवा सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुलना. शाळेतलं नाचगाणं सादरीकरण असो वा भाषण असो या एक ना अशा अनेक गोष्टींची आपण तुलना करतो.तुझ्यापेक्षा त्याच चांगलं होत.
सहजासहजी पालक हे बोलून जातात आणि मुलं कायमच मनात घर करतात मी त्याच्यासारखा नाहीये माझ्या मध्ये कमी आहे.ती तुलना आयुष्यभर मुलसोबत घेऊन वावरत असतात. बालमनावर होणारा तो परिणाम पुढे स्पर्धेमध्ये बदलतो, स्पर्धेतून तो असूये मध्ये बदलतो.
आपल्या कुटुंबात सुद्धा लहान-मोठ्या भावंडांमध्ये सदैव तुलना होत असते आईच म्हणतांना म्हणते की दादा बघ तुझ्यापेक्षा चांगला अभ्यास करतो आणि तू मात्र खेळायला जातो.असे एक ना अनेक गोष्टी बालमनावर कायमच्या कोरल्या जातात. त्यातून बाहेर निघण्यास खूप कठीण जातं. त्यामुळे मूल जसआहे तस त्याला स्वीकाराव.. कदाचित एखादा मुलगा अभ्यासात हुशार असतो तर दुसरा मुल खेळण्यात हुशार.. प्रत्येकाची बुद्धी वेगळी असते… जशी हाताची पाचही बोटे सारखी नसतात तसेच मानवी बुद्ध्यांक… तसेच दिसण्याचही असते..
कुणीगोरा कुणीसावळा, कुणी खुजा कुणी उंच ज्याचं त्याचं रूप, ज्याला त्याला शोभेल असं असतं.. पण आपण हलका भारी,,, हे सगळं आपल्या वातावरणात न तयार करतो,, आणि मुलं निराशेच्या गर्तेत भरकटत जातात.. स्वतःला कमी लेखायला लागतात!मी त्याच्या पेक्षा कमी तो माझ्यापेक्षा हुशार मी दिसायला कुरूप तो दिसायला छान… यामुळे आत्मविश्वास गमावतात म्हणून कोणीही कोणाशी तुलना करू नये. हे मात्र खरं…
एखादा ड्रेस खरेदी करताना त्यात चांगला भारी हा विचार आपण नक्कीच करू शकतो पण तो एका वस्तू विषयी असतो. त्या दोन्हीपैकी एक उत्तम पर्याय आपण निवडतो..परंतु हीच तुलना जेव्हा व्यक्ती व्यक्तीत होते. तेव्हा !तेव्हा इतरांना किंवा इतरांच्या तुलनेत आपण स्वतःला कमी लेखायला लागतो आणि त्यातच न्यूनगंडाची भावना निर्माण होते..
त्यामुळे नात्यात सुद्धा दुरावा निर्माण होऊ शकतो. आणि त्यातच नाती संपुष्टात येतात. ज्याच्याशी तुलना केल्या जाते त्याच्याकडे लक्ष केंद्रित होऊन प्रत्येक गोष्टीत अनुकरण होत असते.. आणि सोबत असूया ही निर्माण होते. यातच आपले स्वतःचे कर्तृत्व झाकोळले जाते. इतरांची कॉपी करण्याच्या नादात आपल्यातील कल्पकता आपणचं थांबवतो…
आपण स्वतःला इतरांपेक्षा कमी समजून पुढे नैराश्य, मानसिक व्याधी विकृती याच्या गर्तेत सापडतो.आणि प्रसंगी आलेल्या नैराश्या पोटी आत्महतेसारखी पावले उचलली जातात.तुलना करून आपण काही साध्य करीत नसतो.. त्यातून एकच दिसत तुलना केल्याने हाती काही येत नसतं..
म्हणून तुलना हीं नकोचं.त्यामुळे सर्व समसमान हीं एकच भावना, माणसास स्वत्वाची व पूर्णत्वाची भावना निर्माण करण्यास नक्कीच मदत करेल! म्हणूनच माणसाला माणूस म्हणून स्वीकारा!?
आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.

ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
क्लिक करून सामील व्हा!
??

