Skip to content

घटना एकच.. पण मनावर होणारा परिणाम हा वेगवेगळा!

मनाचीये गुंती …….


पवन पाथरकर

एकंच घटना आपल्या मनावर वेगवेगळा परीणाम करत असते.त्यात समाेर घडणारी घटना दृश्य स्वरुपात सारखी असली तरी तिच्याबद्दल मत बनवतांना आपण त्या घटनेतील पात्रांशी भावनीक दृष्ट्या किती जाेडले गेलेलाे आहाेत याचा विचार प्रथम केला जाताे.किंबहुना ताे आपाेआपंच हाेताे.तशी आपण आपल्या मनाला सवय लावलेली असते.

उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा करुण अंत सगळ्यांच्याच काळजाला चटका लावून जाताे.त्यातुन सावरण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळा वेळ घेताे.परदेशात झालेला अनाेळखी व्यक्तिचा अपघात आणि आपल्या गावात आपल्या आेळखीच्या व्यक्तीच्या झालेल्या अपघाताची तीव्रता सारखीच असली तरी तीचा आपल्या मनावर हाेणारा परीणाम हा भिन्न भिन्न असताे आणि हिच भावनीक गुंतागुंत असते.

आपल्या मुलाला झालेली किरकोळ जखम आईच्या ह्रदयाला वेदना देते.तेवढीच जखम दुसऱ्या कुणाला झाली तर त्याच तीव्रतेच्या वेदना त्या आईला हाेतील का ?

ही जाणीव काहींची स्वतःपुरती मर्यादित असते, काहींची आपल्या कुटूंबापुरती मर्यादित असते.तर काहींची त्यापेक्षा जास्त असते.

ही भावनीक गुंतागुंत जितकी जास्त तितकी व्यक्ति हळवी असते.म्हणून संतांच्या ह्रदयी सर्वांप्रती सारखा भाव वसत असताे.हा आपला आणि ताे परका हि भुमिका संत घेत नाहीत.

जे साधनेच्या बळावर संत पदाला पाेहाेचले आहेत त्यांना ह्या भावनीक गुंतागुंतीचा फारसा त्रास हाेत नाही.

परंतु ह्याच गुणांची जाणिव सामान्य माणूस म्हणून काही प्रमाणात आपल्यात असेल तर ? अशा लाेकांचा समाजातील वावर हा प्रभावी असताे.पंरतु त्यांचा भावनीक आधारावर वापर करुन घेतला जाताे हे त्यांच्या लक्षात येत नाही.

अशा व्यक्ती सतत व्यवहारीक दृष्टीकोन समाेर ठेवून वाटचाल करु शकत नाहीत.छाेट्या छाेट्या गाेष्टींशी त्यांच्या भावना जाेडल्या जातात आणि त्यातून बाहेर येणेही त्यांना सहज शक्य हाेत नाही.ह्या भावनांची कुणीतरी दखल घ्यावी असे त्यांना वाटत असते.परंतु दुसर्या बाजूला त्यांना माेकळेपणाने बाेलायचे देखील नसते.आपल्या मनाच्या कल्पनेच्या विलासावर, गृहीतांवर ह्या व्यक्ति मार्गक्रमण करत असतात.आणि नंतर एकट्या पडतात.

????


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!