
इथून पुढे फक्त त्यांनाच दीर्घ आयुष्य मिळेल !
तुम्हीच सांगा ……..
हल्ली.. आपलं आजारी पडण्याचं प्रमाण थोडं जास्तच वाढलं का नाही ?
कधी पोटच दुखतं , कधी बी.पी.च वाढतो , कधी शुगर वर खाली होते.
कधी हृदयाचे ठोके वाढून चक्करच येते
करमत नाही , मन लागत नाही
छातीत धडधड , मनात
भीती ….अशा एक ना अनेक तक्रारी …..!
कारणं काय तर म्हणे ….
अशुद्ध पाणी , कचरा , रासायनिक खतं , डासांची संख्या वाढणे ….वगैरे , वगैरे …!
मग ……
मग वॉटर प्युरीफायर आलं , रूम फ्रेशनर आलं , डास प्रतिबंधक वड्या , उदबत्त्या , एवढंच काय घरा घरात डास मारण्याच्या बॅटी सुद्धा आल्या …..
काय परिणाम झाला ?
डासं मेले पण आजारपण गेलं का ?
नाही ……..
मग…?
तुम्ही आम्ही काय केलं आहे…
जाणते अजाणते पणे सर्वांशी कट्टी धरली आहे !
हल्ली माणसं एकमेकाला मोकळेपणाने बोलतच नाहीत ……हे खरं कारण आहे आजारी पडण्याचं !
सख्खे , चुलत , मावस
आई वडील , बहीण भाऊ
शेजारी , सहकारी …या सर्वांशी आपण अबोला धरला आहे !
ओळख आहे पण संवाद नाही
नातं आहे पण माया नाही
अवांतर , मोक्कार विषयावर आपण खूप गप्पा मारतो पण खरं दुःख कुणीही कुणाला सांगत नाही ……हे एक आपल्या वारंवार आजारी पडण्याचं कारण असू शकतं !
सगे सोयरे , घरकुल , गोकुळ
नातीगोती , हॅपी फॅमिली , आपली माणसं
….अशा गोंडस नावांनी आपण Whats app चे ग्रुप बनवले ….
पण त्यावर मनमोकळा संवाद होतोय का ?
मी दुःख सांगितल्यावर मला हसतील का ? अशी जर भीती वाटत असेल ….
मी Good news सांगितल्यावर आनंदी होतील का नाही ? अशी जर भीती वाटत असेल …..
तर असे ग्रुप ,अशी नाती काय कामाची ?
लक्षात ठेवा हिलस्टेशनला , युरोप टूरला जाऊन relax होता येईल ….पण हलकं वाटू शकेल का ?
टेन्शन कमी होईल का ?
त्यामुळे वारंवार आजारी पडण्याची कारणे कदाचित ही तर नसतील ……
मनातल्या भावनांचा निचरा न होणे …,
सकारण , विनाकारण प्रत्येक नात्या सोबत झालेली कट्टी …,
खूप बोलावं वाटणे …पण व्यक्त होण्यासाठी जागाच न उरणे ….
मग आता काय करावं ?
ज्या वादा मध्ये , अबोल्या मध्ये , फारसं तथ्य नाही असे वाद मिटवण्यासाठी स्वतः होऊन पुढाकार घ्यावा ….
व्यक्त व्हा , बोला , दो करा
कदाचित आपलं वारंवार आजारी पडणं थोडं कमी होईल
सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
क्लिक करून सामील व्हा!
??



