Skip to content

‘स्ट्रेस मॅनेजमेंट’….एका अद्भुत प्रयोगाद्वारे समजून घेऊ!

‘स्ट्रेस मॅनेजमेंट’….एका अद्भुत प्रयोगाद्वारे समजून घेऊ!


सुहास वैद्य


एका कॉर्पोरेट ट्रेनरने पहिल्या दिवशीच्या शेवटी संगितले की, उद्या आपण ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ विषयावर काही खेळ घेणार आहोत. त्यामुळे कोणीही ‘फॉर्मल ड्रेस’ घालून येवू नका. अगदी साधे मैदानी खेळ असल्याने त्याला उपयोगी पडतील असे कपडे घालून या.

दुसर्‍यादिवशी तो ट्रेनरही थ्री फोर्थ पॅंट आणि टी शर्ट घालून आला होता. सगळ्यांना उत्सुकता होती की आता तो कुठले खेळ घेणार आहे ते. आल्या आल्या त्याने आज आपण याच मातीत खेळले गेलेले खेळ घेणार आहोत ही घोषणा केली. त्याने पटकन दोन गट पडून आटया-पाट्या खेळण्यासाठी सर्वांना जमवले. हा खेळ सर्वांना एकूण माहिती होता. काही जणांनी लहानपणी खेळलाही होता पण सरत्या काळात विस्मृतीत गेला होता. अनेकांना खेळावेसे वाटत होते पण आताच्या त्यांच्या ‘पोझिशन’ ला ते मानवणार नव्हते. पण ट्रेनिंगचा भाग असल्याने नाही म्हणता येत नव्हतं. हळू हळू लगोरी, सागर गोटे, करत करत शेवटी ‘मामाचं पत्र हरवलं आणि ते मला सापडलं’ या खेळा पर्यन्त सगळे आले.

नाही हो करत. चेष्टा मस्करी करत खेळ सुरू झाला, पहिल्यांदाच जिच्यावर राज्य (डाव) आला तिने एक फेरी पूर्ण केली आणि तिच्या डोळ्यातून पाणी येवू लागलं. ट्रेनरने काय झालं विचारताच ती म्हणाली “गेल्या कित्येक वर्षात मी माझ्या मामाचं गाव पहिलं नाही, माझ्या मुलालाही मामाच्या गावाचं मोठेपण काय असत हे मी दाखवू शकले नाही. आज जेंव्हा पस्तीस चाळीस वर्षांनंतर हा खेळ खेळतेय तेंव्हा प्रत्येक सुट्टीत मामाच्या गावाची ओढ काय असायची या आठवणीने डोळे भरून आले.”

त्यातल्या एकाने ट्रेनरला प्रश्न केला हा खेळ तुम्हाला का घ्यावसा वाटला,

त्याने उत्तर दिले.

आपल्या नात्यांबद्दलची ओढ कुणाला नसते. ही नाती काळाच्या ओघात धूसर होत गेली. पण असा काळ परत आला तर तो कुणाला नकोसा वाटेल.

आहे की नाही छान आयडिया

बघा या खेळाला लागून असलेल्या अनेक आठवणींना तुम्ही मोकळी वाट करून दिली आहे. पण अजूनही तुमची कोट, टाय मधली औपचारिकता पूर्ण संपली नाही आणि ती कणभर जरी शिल्लक राहिली तरी तुमचा ‘स्ट्रेस’ तसाच राहील. लक्षात घ्या आपल्या मातीतून जन्माला आलेला कुठलाही खेळ हा आपल्यातील अनौपचारिकता पणाला लावूनच खेळावा लागतो. त्याशिवाय नात्यातील वीण घट्ट होत नाही. म्हणून त्याचे स्वरूपही सामुहिक आहे.

आज कॉर्पोरेट जगात ‘आय’ (I) च्या जागी ‘वीई’ (WE) ठेवा असे संगितले जाते, तसं केलं तर कामाचा ताण जाणवत नाही, आपल्या परंपरेतच ‘आम्ही’ दडलेल आहे. तुम्ही लहानपणी याचा अनुभव घेतला होता आज त्यावर साचलेले तथाकथित ‘उच्च भ्रू’ चे मळभ दूर करण्याची आवशकता आहे.

आत्ता अनेकांनी आपल्या मुलांच्या आयुष्यात ‘आत्या मामां’ची जागा रिक्त आहे हे सांगितले, पण मला असं वाटतं त्या रिकाम्या जागा आजच्या या ‘गेट टुगेदर’ मध्ये भरून काढल्या जाऊ शकतात. फक्त कोणीतरी पुढाकार घेण्याची गरज आहे. सगळ्यांना हे पटले आणि अनेकजण खर्‍या अर्थाने एकमेकात सहज मिसळून गेले.

आता त्या ट्रेनरने आपले ट्रेनिंग आवरते घेतले. शेवटच्या चहा पानाच्या वेळी त्या फाइव्ह स्टार होटलचा वेटर त्याला म्हणाला “सर तुमचे हे नात्याबद्दलचे बोलणे माझ्या कानावर पडले मला खूप आवडले. माझ्या गावी आमचे एकत्र कुटुंब आहे.”

“तुमचं गाव कोणत सर ?”

चहाचा कप टेबलवर ठेवता ठेवता तो म्हणाला “सारं जगच माझं कुटुंब आहे कारण मी अनाथ आश्रमात लहनाचा मोठा झालोय.”



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!