Skip to content

‘Mindfulness’ आपल्यासाठी कसं काम करतं पाहूया…..!

सजगता आणि क्षणसाक्षित्व !

(अर्थात, awareness and mindfulness)


अपूर्व विकास

(समुपदेशक व मानसशास्त्र तज्ज्ञ)


आधी उद्दिष्ट समजून घेऊ :-

१. विचार-आचार-उच्चार (thought-action-communication) या त्रयंगांनी आपलं अस्तित्व आपण प्रकट करतो. हेच ते “व्यक्तिमत्त्व”.

२. यातला जो भाग आपण जाणीवेबाहेर ठेवलाय, त्या अंधारलेल्या भागात नकारात्मकतेचा निवास असतो.

३. लहानपणापासून आजपर्यंत आपल्या विचारांना आणि भावनिक आवेगांना एक साचेबद्धपणा आलेला असतो. ठराविक प्रकारच्या घटनांना ठराविक प्रकारेच प्रतिक्रिया देण्याची आपल्याला सवय असते. उदाहरणार्थ, “कुणी माझ्या कपड्यांवरून मला काही बोललं की मला जाम राग येतो…” एखाद्या नाटकातील संहितेनुसार (script), एखादी भूमिका वठवल्याप्रमाणे, आपण एका मर्यादित साच्यानुसारच आपले विचार-आचार-उच्चार होऊ देतो.

४. हे नकळत होत नसतं; होऊ दिलं जातं. कारण याने, लक्षपूर्वक जगण्याच्या कष्टातून आपण आपली सुटका करून घेत असतो.

५. या आळसाची किंमत नकारात्मकता चुकवते. ती या scriptमध्ये आपल्यासाठी असे बेमालूम loops सोडून देते; ज्यात आपण चकव्याप्रमाणे परतपरत फिरत राहतो. तीच परिस्थिती, तशीच माणसं, तेच अनुभव. इथे आपण निराश होतो आणि स्वत:ची वाढ होऊ देत नाही.

या script मधून बाहेर पडणं, म्हणजे growth.
त्यासाठी सजगता आणि mindfulness.

रीत :-
१. सजगता म्हणजे “मी आत्ता जो विचार-आचार-उच्चार करतोय, तो पूर्वीच्याच साचेबद्धतेतला आहे की नवा, जाणीवपूर्वक आहे?” हा प्रश्न स्वत:ला हरघडी विचारणं. त्याचं उत्तर शोधण्यासाठी वापरायचं tool, म्हणजे mindfulness. क्षणसाक्षित्व.

२. घडत्या घटनेत स्वत:ला हरवू देण्याऐवजी, “या घटनेमुळे माझ्यातले कोणते साचे trigger होतायत, सक्रिय होतायत?” ते पाहावं. जेणेकरून घटना आणि प्रतिक्रिया यातला साचेबद्ध कार्यकारणभाव (scipted causality) लक्षात येतो; आपण स्वत:चं कशाप्रकारे programming करून घेतलंय, हे समजतं.

३. जर “हो, हे scriptनुसार येतंय” हे जाणवलं, तर हा नकारात्मकतेचा डाव आहे, हे ओळखावं.

४. आपला भावनिक आवेग आपला स्वत:चा नसून, तो त्या “भूमिकेतील व्यक्तीचा” आहे, हे लक्षात घ्यावं.

५. हे लक्षात येऊ दिल्याबद्दल स्वत:चं अभिनंदन करावं. “मला growth हवीये” हे स्वत:शी आठवावं.

६. या जाणीवेतून आलेल्या सकारात्मकतेचा inspiration म्हणून वापर करून, “प्राप्त परिस्थितीत मला कोणतं सकारात्मक उद्दिष्ट हवंय?” ते ठरवावं.

७. आणि आपल्या क्रिया त्या उद्दिष्टाच्या दिशेने न्याव्यात; जेणेकरून नकारात्मक परिस्थितीचा stepping stone सारखा वापर करून आपण आपली growth करून घेतो.

८. हरघडी “मी विजेता आहे” हे आठवावं. आणि “इथे एक विजेता कसा वागेल?” त्यानुसार आपल्या क्रिया ठरवाव्यात. लक्षात घ्या :- इथे आपण सुजाण प्रतिसाद देतोय, अजाण प्रतिक्रिया नाही (Respond; don’t react). आणि इथे आपण जिंकतो !

(लेख शेअर केल्यास कृपया लेखकाच्या नावासहित करावा, ही नम्र विनंती. शेअरिंगबद्दल आभार.
आवडल्यास जरूर कळवा.)



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!