Skip to content

एकाची समस्या ही एकाची नसते, तर ती सर्वांची असते!

उबंतू…….


डॉ. जितेंद्र गांधी


साधारण 2008 मध्ये उबंतू (ubuntu) या आफ्रिकन संकल्पनेने जागतिक माध्यमांचे लक्ष वेधले व अल्पावधीतच ही संकल्पना जगभरातील कानाकोपर्‍यात पोहोचली….

मानवतावादी तत्वज्ञानाची मोठी मोहीम या माध्यमातून जगभर उभी राहण्यास खूप मोठी मदत झाली… वरकरणी ही संकल्पना मानवतावादी असली तरी ती मोठ्या प्रमाणात मनोशास्त्रीय कसोट्यावर उभी राहिलेली आहे हे विसरता कामा नये…

व्यक्ती, कुटुंब व समुदाय स्वतःचे दुःख कुरवाळत बसल्यास त्याचे दुःखामध्ये मानसशास्त्रीय स्तरावर वाढच होत जाते…त्याऐवजी आपले दुःख सर्वांसोबत वाटून… वाट्याला आलेला आनंद सुद्धा वाटल्यास मानसशास्त्रीयरित्या त्याची अनुभूती आपण मोठ्या प्रमाणात अनुभवू शकतो हे सामूहिक मानसशास्त्राचे सिद्धांत उबंतू ने मोठ्या प्रमाणात यशस्वी करून दाखवले….

आपल्या आजूबाजूला असणारे लोक दुःखीकष्टी असतील तर आपण समाधानाने व आनंदाने राहू शकणार नाही हे अतिशय सोपे मानसशास्त्रीय सिद्धांत आपल्याला शिकायला उबंतू भाग पाडतो…दुःख हे ‘फक्त एकट्या-दुकट्याचे नसून ते सर्व समूहानेच वाटून घ्यायचे असतात’ ही वैश्विक व सामूहिक मानसशास्त्रीय उपचार पद्धती उबंतू मुळे आपल्याला शिकायला मिळते…

आपण सर्व जण एकमेकांना प्रभावित करीत असतो…व एकमेकांकडून प्रभावित होत असतो… ह्या मानसशास्त्रीय सिद्धांताचा सुरेख उपयोग उबंतू मुळे अनुभवयाला मिळतो…मुळातच गट, कुटुंब, समाज व संस्था त्यांची धोरणं व काम करण्याच्या पद्धती मध्ये मानसशास्त्रीय सिद्धांताचा आधार घेणे किती महत्वाचे आहे हे उंबतू मुळे अधोरेखित होताना दिसत आहे….

एकदा एका आफ्रिकन आदिवासी , अतिशय गरीब व दुर्गम अशा भागांमध्ये एक बाहेरील व्यक्ती काही खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन जातो..आणि एका झाडाखाली ठेवतो….त्या गटांमध्ये असलेल्या सर्व मुलांना एका दूर ठिकाणी बोलवतो…आणि म्हणतो पळून जाऊन त्या खाण्या-पिण्याच्या गोष्टी घेऊन जाऊ शकता…

सर्वात अगोदर जो पोहचेल त्याला सर्वात जास्त चॉकलेट् व बिस्किट्स मिळतील…व त्याने सर्व मुलांना पळून जाऊन त्या गोष्टी घेण्यास सांगितल्या….परंतु घडले वेगळेच ती सर्व मुलं जरी गरीब, उपाशी व दुर्गम भागातील असली तरीही सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घातले व समान पद्धतीने चालत जाऊन उपलब्ध असलेल्या सर्व चॉकलेट्स व बिस्किटांचे समान पद्धतीने वाटप केले व त्याची खातरजमा झाल्यानंतरच त्यांनी ते खायला सुरुवात केली…

हे बघताच सर्वांच्या डोळ्यात वेगळेच भाव निर्माण झाले…. आणि हे सर्व घडलं होतं फक्त आणि फक्त उबंतू मुळे… कारण इथे ‘प्रत्येकाचं दुःख हे प्रत्येकाचे नव्हतं तर ते समूहाचे होतं’ आणि ही सामुहिक दुःखाची प्रक्रियाच उपचारात्मक प्रक्रियेचा भाग बनली होती…फक्त उबंतु मुळे…

So would you like to be a part of Ubuntu? … …



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!