
परीक्षा पे चर्चा-पालकां साठी काळाची गरज ???
Clinical Psychologist & Hypnotherapist.
फेब्रुवारी महिन्यापासून वेगवेगळ्या बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होत आहे त्यामुळे अश्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी काही महत्वाच्या गोष्टी ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरील ताणतणाव , चिंता, परीक्षेची भीती कमी होण्यासाठी मदत होऊ शकेल. कारण ताण-तणाव निर्माण करण्यामध्ये पालकांचे मुलांवर असणारे अपेक्षांचे ओझे हे 57% असलेले बघायला मिळते. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त ताण हा पालकांकडून मुलांवर निर्माण केला जाणार आहे.
भारतामध्ये 24 तासात 28 आत्महत्या होतात यापैकी आत्महत्या होतात यापैकी 8% आत्महत्या या विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आहेत. या सर्वेनुसार 2019 या वर्षात 1448 विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले जीवन संपवले. दुर्दैवाने महाराष्ट्राचा एक नंबर लागतो मागील पाच वर्षाच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात 57% वाढ झालेली आहे व मागील दशकांचा 2010 ते 2019 विचार करता जवळजवळ 82 हजार हजार विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या करून जीवन संपवले .त्यापैकी एक कारण म्हणजे परीक्षा !!!!!!!
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते त्या म्हणजे ताण तणाव stress, चिंता Anxiety, भीती Phobia .या नकारात्मक गोष्टी कमी करायचे असल्यास मानस शास्त्रात सांगितलेल्या काही तत्त्वांचा अवलंब करून त्यात कमी करता येऊ शकतात.
1) मानवतावादी दृष्टिकोन Humanistic Approach हा दृष्टिकोन असा मानतो की प्रत्येक व्यक्तीमध्ये विकास करण्याची क्षमता, पात्रता, कौशल्य हे जन्मजात असतात त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याकडे विद्यार्थी म्हणून, परीक्षार्थी म्हणून, न बघता माणूस म्हणून बघा. व आपल्या मुलांमध्ये कोणत्या क्षमता आहे कोणत्या क्षमता कशा विकसित होतील याबाबत विचार करावा. कारण काही क्षमता मोजमाप करण्यामध्ये परीक्षापद्धती कोणतीही तंत्र उपलब्ध नाही. पहिले स्थान मानवाचे आणि मग त्याच्या विद्यार्थी असण्याचं दुय्यम स्थान.
2) तुलना करू नका Don’t Comparison
विद्यार्थ्यांनी स्वतःची आणि पालकांनी इतर मुलांबरोबर तुलना करू नका. तुलना केल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. स्वप्रतिमा ढासळली जाते या मानसिक क्षमतांचा ऱ्हास होतो. कारण प्रत्येकाच्या क्षमता वेगवेगळ्या आहेत. ज्याप्रमाणे घोड्याची क्षमता पळण्याची, हत्तीची क्षमता ताकदीची, माकडाची उड्या मारण्याची ,त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांची क्षमता वेगळी असते त्यामुळे त्यांच्यात तुलना करू नये.
3) नाते संबंध सुधारा Developing Relationships
चीनमध्ये केलेल्या संशोधनानुसार व्यक्ती कुटुंबामध्ये जेवढा वेळ देतो तेवढ्या प्रमाणात ताण कमी होताना बघायला मिळतो. त्यामुळे कुटुंबातील सभासदांचे एकमेकांशी नाते संबंध सुधारण्यास परीक्षेचा विद्यार्थ्यांवर व पालकांवर असणारा ताण कमी होऊ शकतो. विद्यार्थ्यांना सूचना देण्यापेक्षा त्यांना विचारलेल जास्त आवडत. त्यामुळे वारंवार अभ्यास कर ही सूचना देण्यापेक्षा तुझा अभ्यास कसा चालू आहे?? असे विचारा.
4) भावनात्मक दृष्टीकोण जोपासावा Emotional /Emphatic Approach इक्यू अलीकडच्या काळात जीवनात यशस्वी होण्यासाठी असणारी बुद्धिमत्ता आहे जिजा मार्कांची काहीही संबंध नाही कारण जे लोक चांगले टक्क्यांनी पास होतात त्यांच्याबाबत झालेल्या संशोधनात अशी व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी झालेली असते असे दिसत नाही. कारण त्यांच्याजवळ लोकांशी कसे वागावे? त्यांच्या भावना कशा समजून घ्याव्या ??आपल्या भावना कशा व्यक्त कराव्या??? अशी क्षमता नसल्यामुळे जास्त मार्क मिळवणारे पुढे जीवनात अपयशी ठरलेले दिसून आलेत.
एखादा खीळ ठोकताना वाकडा झाला तर, त्याला पुन्हा सरळ करण्यासाठी आपण ठोकतो परंतु अगदी हळुवारपणे कारण जोरात ठोकला तर तो पूर्ण कामातून जातो. त्याचप्रमाणे मुलांना भावनिक पातळीवर कसा आणि किती सांगावं ,बोलावं, रागावव हे करताना त्या वाकडे झालेल्या खीळाचा विचार करावा.
5) प्रेरणा द्या Give Motivation
मुलांना सांगताना सांगा आमचं प्रेम तुझ्यावर आहे तुझ्या मार्कांवर किंवा परसेंटेज वर नाही. आम्ही तुझ्या प्रयत्नांवर, कष्टांवर, परीक्षेच्या तयारीवर प्रेम करतो. त्यामुळे मुलांचा देखील विश्वास तुमच्यावर वाढतो.
6) पालकत्वाची शैली Patenting Style
पालकत्वाच्या चार शैली आहे त्यापैकी अधिकार वादी (Authoritative) पालक शैली असणाऱ्या पालकांची मुले शैक्षणिक संपादनात वरचढ ठरतात हे संशोधनातून सिद्ध झालेले आहे . असे अधिकार वादी पालक हे जबाबदारीने वागणारे, परस्पर भावनिक संबंध जोपासणारे ,वास्तववादी अपेक्षा ठेवणारे, लोकशाहीने वागणारे ,आपल्या मुलांना सपोर्ट करणारे, त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करणारे ,परिस्थितीसापेक्ष लवचिक असणारे ,व वेळ प्रसंगी परखडपणा/ स्पष्टपणा दाखविणारे असतात. त्यामुळे पालकांनी अशा शैलीचा विकास स्वतः मध्ये करावा ज्यादा फायदा पालक-बालक संबंध चांगले निर्माण होण्यास होतो.
7) इतरांचा सल्ला घ्या Advice from others
सगळे प्रयत्न करूनही जर परीक्षेचा ताण तणाव ,चिंता वाढणारी असेल तर प्रोफेशनल कौन्सिलिंग करणाऱ्या काउंसलरची ,टीचरची ,जवळच्या मित्राची मदत घ्या व मुलांना परीक्षेच्या ताण-तणावातून बाहेर पडण्या मदत करा.
शेवटी काय तर….परीक्षेचे महत्त्व आपल्या जीवनात आहे. परंतु कोणतीही परीक्षा ही शेवटची नसते तर तो आपल्या जीवनातील एक टप्पा असतो. असे अनेक टप्पे आपल्या जीवनात येणार आहे व ते पार करण्यासाठी आपण त्यासाठी तयार व सक्षम असलं पाहिजे.
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !धन्यवाद !
