Skip to content

आज जरा एकमेकांसाठी अनोळखी होऊया….

चला अनोळखी बनुया!!


ज्ञानेश्वर वाघचौरे


चलो एक दुजें के लिए
अजनबी बन जाए हम फिरसें

महेंद्र कपुर यांच्या आवाजातिल हे गित ऐकल आणि एकमेकांना पुरेपूर ओळखणारे आम्ही , किंवा समाजात स्वताःची ओळख निर्माण करणारे आम्ही…पुन्हा अनोळखी का बनाव??

निश्चितच एकमेकांना ओळखणं आता आनंददायी वाटत नसावं , म्हणून कविला हे शब्द सुचले असावेत का ?

काय अर्थ लागतो बरं या अनोळखी बनण्याचा ? परिवारात , समाजात आमचा दावा असतो , मी त्याला चांगल ओळखतो ! मात्र हे ओळखणं कधिकधी कल्पोकल्पीत असतं. कधी दंतकथा बनुण येतं , तर कधी पुर्वग्रह दुषित असतं. एखाद्याला आपण पुर्ण ओळखतो असा दावा करतो , मात्र त्याचा असा एखादा पराक्रम आमच्या कानावर येतो आणि ” तो असा देखिल आहे का ? विश्वासच नाही बसत !” असे शब्द नकळत बाहेर पडतात.

खरं तर आमचं एखाद्याला ओळखणं हे आमच्या क्षमतानुरुप असतं . तो किंवा ती फारच आक्रमक आहे. खुपच हट्टी आहे , निर्भिड आहे किंवा भिडस्त आहे , हळवा आहे किंवा कणखर आहे , त्याच्या अस्तित्वापेक्षा त्याच्या गुणविशेषावर फोकस केला जातो आणि त्याच्या गुणामुळे तो किंवा ती मला अजिबात आवडत नाही. यामुळेच मला त्याचा खुप रागही येतो. हा आपला द्रुष्टीकोन तयार होतो.

अस्तित्ववादी विचारधारा माणसांच अस्तित्व हे गुणापेक्षा मुल्यवान आहे असं मानतात . तो माणुस म्हणून जन्माला आला या पेक्षा मुल्यवान काहीच नाही. मग ती माझी पत्नी असो वा मुलगा , नातेवाईक असेल वा परिचीतापैकी कुणीही ! मात्र मी त्याच्या असण्यापेक्षा त्याच्यातल्या गुण-अवगुणालाच अधिक महत्त्व देतो. खरं तर कुठलही गुण-अवगुण हा त्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग असतो नव्हे कि पुर्ण व्यक्तिमत्त्व ! तो गुणविशेष सोडला तर व्यक्ती म्हणून मी त्याचा आदर केलाच पाहीजे . जसं माझ स्वतंत्र्य अस्तित्व आहे , स्वतंत्र्य विचार आहे तसे त्याचेही असणार ! हा विवेकनिष्ठ विचार जोपासणं गरजेच असतं . मात्र त्याच्यातल्या या गुणविशेषामुळे त्याच नि माझ जमणारच नाही. या अविवेकनिष्ठ विचाराचे आपण बळी ठरतो आणि नात्यातली परिचीत , ओळखिची माणसं दुरावायला लागतात.

स्वभावाने कितीही विक्षिप्त असले तरी दोन्ही माणसं जर अनोळखी असतिल तर त्यांचा तो काही काळाचा सहवास तणावपुर्ण नसतो तर कधिकधी आनंददायी ही असतो. मग एकमेकांना ओळखणं , परिचीत असणं , आज तणावाला कारण ठरत आहे. यातुन नातेसंबध उध्दव होत आहे .

खरचं आपण पुन्हा एकमेकांसाठी अनोळखी ‘अजनबी’ झालो तर सहवासाचे आनंददायी क्षण आपल्याला अनुभवता येतिल !! कदाचित हा विश्वास या गीताद्वारे व्यक्त करायचा असावा!!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!