Skip to content

प्रत्येक घराचं एक वय असतं…

प्रत्येक घराचे वय असते ..


आज सकाळपासून ती तापाने फणफणली होती,… कालच डॉकटरांनी अगदी कडक शब्दात सांगितलं होतं,…दोन दिवस फक्त आरामच करायचा,…त्यामुळे अभयने आपल्या मावशीला गावाकडून बोलवून घेतलं होतं,…गाव तसं तासभर अंतरावर होतं,… छोटीशी शेती,घर सांभाळत मावशी एकटी रहात होती,…ठेंगणी ,ठुसकी गोरी गोमटी मावशी अभयच्या एका फोनवर सकाळीच दारात हजर,…तेंव्हा बाईसाहेबांचं कुरकुरत,..वाकत कपबश्या विसळणं सुरू होतं,.. पोरं शाळेत निघून गेले होते,…मावशीने लगेच तिच्या हातातुन कप काढून घेत तिला रूम मध्ये झोपायला पाठवलं,…

अभय कुरकुरत मावशीला म्हणाला,” आग फार चिडचिड करत असते ही पसारा,पसारा म्हणत,…आता तू जरा समजव तिला तब्येत बघ कशी झालीये तिची कालच डॉकटर म्हणालेत जरा दोन काम कमी करून आराम करत जा,…

म्हणजे शरिराला शीण येणार नाही आणि दोन चार महिन्याला असा ताप येणार नाही,…पण ही बया ऐकेल तर,.…” मावशी हसुन म्हणाली अरे असतंच बायकांना सगळ्याच डगरीवर हात ठेवावा वाटतो,.. आता आहे मी आठवडाभर सांगते तिला समजावून,….चल तुला डबा भरून देते तू निघ उशीर होईल तुला,…

अभय गेला मावशीने मस्त आल्याचा चहा बनवला आणि आली रूपाच्या खोलीत,…रूपा उठून बसली,”मावशी अहो चहा कशाला केलात,..?” ” घे ग तेवढंच फ्रेश वाटेल तुला,… रोज नोकरी,मुलांचं,नवऱ्याचं आणि घराचं करून दमत असशील ना,…”मावशीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तसं तिला रडूच आलं,..”खरं आहे मावशी,खुप थकून जाते मी,…

कदाचित म्हणूनच शरीर असे दुखणे काढत असेल आरामासाठी ,पण काय करणार मावशी घरात इतका पसारा होतो ना की खुप वेळ तर माझा घर अवरण्यातच जातो,..” मावशी हसुन म्हणाली,…”प्रत्येक घराचं ना वय असतं ते स्वीकारायला शिकता आलं ना ग मग त्रास होत नाही पसऱ्याचा,…” तिला कळेना नेमकं काय म्हणायच आहे मावशींना आणि घराला वय म्हणजे,..??मावशींच्या लक्षात आलं,..हिला घराचं वय कळलं नाही,…मावशी हसुन म्हणाली,…

तू प्राजक्ता कडे जातेस ना,..म्हणजे माझी सून ग नोकरीमुळे नाही राहत माझ्याकडे,…तिच्या घरी तू गेली आहेस ना,….मावशीच्या प्रश्नाला ती उत्तर देत म्हणाली,..”हो घरभर खेळणे पसरलेले असतात,…अगदी उड्या मारून जायची वेळ येते,…,,”हं अश्या घराचं वय 1 ते 5 वर्ष,…आता तुझ्याकडे आहे का असा पसारा नाही आता तुझ्याकडे गोष्टींची पुस्तकं,.. रंग,खडू,रंगीत कागद आणि कपडे म्हणजे तुझ्या घराचं वय आहे 6 ते 15,…आपल्या सुनीलकडे म्हणजे माझ्या पुतण्याकडे सगळीकडे फोन,चार्जर,कपडे,पुस्तकं,.. बुटांचे चपलांचे जोड,..ते वेगवेगळे स्प्रे ह्याचाच पसारा कारण त्या घरच वय 15 ते 20 आणि आता माझंच घर बघ काही पसारा नाही कारण पिल्लं गेलेत ग उडून घरट्यातून मग कोण पसारा करतंय,…

सगळं चित्रातल्या सारख आहे,…काही हलत नाही मला फार वाटतं कसे कसे वय होऊन गेले घराचे पण आता हे बिनपसाऱ्याच म्हातारपण पेलवत नाही,..म्हणून त्या घरच ते वय छान आनंदाने स्वीकारायला शिक कारण आपण बायका उगीच चिडचिड करून सगळ्यांना बेजार करतो आणि हे सगळं समोर असलं ना तर मुलं त्याला हात लावतात ठेवून दिल की गेलं नजरे आड,…

थोडी फार आवरा आवर ठिक पण त्यासाठी अगदी दमछाक करून अस आजारपण नको ग,…घराचे हे वय परत येत नाहीत पिल्लं आहेत तेव्हाच घराची ही मजा अनुभवायची असते,…मग आहेच आपलं म्हातारपणीच शांत आणि स्वच्छ घर,..

तिलाही पटलं मावशींच म्हणणं आणि खरंच आठवलं मुलांचं बालपण सगळीकडे खेळणे,…बाहुल्या,सायकली,..आता सगळे पुस्तकं, रंग पण आता मावशींनी घराच्या वयाची दृष्टी दिल्याने नकळत तिला तो पसारा वाटत नव्हता तर घर सजावटीच सामानच वाटत होतं,…ती हसुन म्हणत होती 6 ते 15 वयातल आहे माझं घरं आणि कौतुकानं घराकडे पहात होती?

कीती छान पोस्ट आहे ही! घराचं वय असू शकतं आणि ते आपण अनुभवायचं असतं ही कल्पना भन्नाट खरी पण खूssssप गोड!!


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!