आयुष्य जगण्यासाठी नेमकं काय लागतं ??
एका मैत्रिणीच्या आईचे परवा 95 व्या वर्षी निधन झाले .वडील आधीच निवर्तले होते.65 वर्षांच्या त्यांचा सहजीवनातला संसार.
आणि विस्तार म्हणजे तीन लेकी दोन लेक आठ दहा खोल्यांचा प्रशस्त बंगला.
प्रत्येकाचाच स्वतंत्र शयन कक्ष,कपाटे ,तेवढे कपडे,कार्यप्रसंगी 100 माणसे जेवू शकतील एव्हढी भांडी ,फर्निचर ,बाग,हौसेमौजेने तीर्थयात्रा ,पर्यटन करून आणलेल्या शोभेच्या वस्तू,प्रचंड माळे आधीच्या दोन पिढ्यांचे ऐवज,वस्तू,सामान……
पण आता सर्व मुलेबाळे स्वतंत्र व स्वतःच्या कार्यक्षेत्रात मग्न,यशस्वी व अत्यंत व्यस्त जीवनक्रम असलेली!!!
आईपश्चात वर्षभर रिकामे प्रचंड घर आवरायला कुठून सुरुवात करावी हा यक्षप्रश्नच!!!
कपाटातल्या पाचशेच्या वर साड्या आता कुणीही घेऊ इच्छित नाही,100 माणसांच्या स्वयंपाकाची घरात कुणीही उस्तवार आता करणार नाही,जुने अवाढव्य फर्निचर आता कुणाच्याच घरात मावणार नाही,शोभेच्या वस्तूंकडे निगराणी करण्यास वेळ नाही, मोठाले खरे दागिने बाळगून किंवा घालून मिरवणे सुरक्षीत नाही,बाग मेंटेन करायला मनुष्यबळ नाही.अडगळी साफ करायला कष्टांची शारीरिक क्षमता नाही…..
असे अनेक नकार व फुल्या मारल्यावर मग जेव्हढे चांगले व शक्य तेव्हढे ,गरजू संस्था व संसार असलेल्या लोकांना देण्यात आले,आठवण म्हणून आईची एक साडी घेण्यात आली असे करताकरता त्या घराची सात दशकांची घडी मिटवण्यात आली.
या उस्तवारीत प्रचंड मनस्ताप,कठोर निर्णय,नकार,उस्तवार आणि शारीरीक व मानसिक कष्ट तसेच थकवा व ताण मुलांना सोसावा लागला.
या सगळ्यांपेक्षा सर्वाधिक मौल्यवान असा त्यांचा वैयक्तिक वेळ त्यांना वाया गेल्याची भावना निर्माण झाली.
ज्या पिढीने हे सगळे जमवण्याचा अट्टाहास करण्या साठी कष्ट झेलले ती पिढी काळाच्या पडद्याआड गेली.
हे सर्व सांगतांना ‘ती ‘ मैत्रीण खरेच दुःखी ,खिन्न व अंतर्मुख झाली होती.
यातून काही बोध घ्यावा असे वाटले तो म्हणजे…..
**गरजा कमी हीच अनंदाची हमी!
** घर हे माणसांचे वस्तीस्थांन आहे,वस्तूंची अडगळ नव्हे!
** आपल्यासाठी वस्तू,वस्तूंसाठी आपण नाही.नाहीतर अवघे आयुष्य साफसफाई व राखण्यात व्यस्त जाते.
** प्रवासात फक्त सुंदर क्षणांचा संचय करा ,शोभेच्या वस्तूंचा नव्हे.
** जेव्हढे जास्ती मी देईन तेव्हढी जास्ती मी ,मला शोधू शकेन किंवा स्वत्व गवसेल.
** जितकी अडगळ कमी तेवढेच तुमचा आत्मशोध सुलभ.
** विकत घ्यायच्या आधी ,का?? चा शोध लावावा.
** साधेपणा,सुसंगतता,आणि सुयोजकता हे नियम पाळावेत.
**दान हे संचय करण्या पेक्षा कधिही श्रेष्ठच मानावे.
** आजचा संचय उद्याची अडगळ.
**दुसर्याना प प्रभावीत करण्यासाठी स्वतःच्या कष्टाचे पैसे अजिब्बात खर्चू नयेत.
**जेव्हढ्या वस्तू कमी तितके घर मोकळा श्वास घेते.माणसे शांत व समाधानी असतात.मानसिक विकार व नैराश्य येत नाही.
**सूटसुटीत,मोकळे घर,म्हणजे पैशाची, मनुष्यबळ ऊर्जेची व वेळाची बचतच.
** तव वेळ तुम्ही परस्पर मानवी सम्बन्ध,सुसंवाद,छंद जोपासणे,व्यायाम,आरोग्य सुधारणे यासाठी देऊ शकता.
**किमान गरजा ही जीवनशैली काळानुसार अत्यावश्यक गरज ठरणार आहे.
* * शाश्वत सुखाचा राजमार्ग हा ‘ समाधान ‘ नावाच्या गावातूनच असतो.
सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!