Skip to content

‘स्वयंसूचना’…..मुलांनो परीक्षेची भिती अशी पळवून लावा!

संमोहन अथवा स्वयंसुचनांचे तंत्र


आता परीक्षेचे दिवस जवळ येत आहेत.विद्यार्थी या काळात तणावातून जात असतात.काहींना परीक्षेची भीती वाटत असते.कशी होईल परीक्षा?पेपर सोपा असेल ना?अवघड प्रश्न येतील का?अपेक्षित यश मिळेल ना? असे नानाविध प्रश्न,शंका,कुशंका या काळात विद्यार्थ्यांच्या मनाचा ताबा घेतात.या मुळे विद्यार्थ्यांच्या ठायी भीती उत्पन्न होते,छातीत धडधडू लागते,आत्मविश्वास डळमळू लागतो.अशा विद्यार्थ्यांसाठी स्वसमोहन किंवा स्वयंसुचनांचे तंत्र अत्यंत लाभदायक आहे.

मानसिक आजारावर उपचार करण्यासाठी संमोहन किंवा
स्वयंसूचना पद्धतीचा उपयोग केला जातो.व्यक्तिमत्व विकासासाठी देखील हे तंत्र अत्यंत लाभदायक आहे.

विना खर्चाचे ,घर बसल्या करण्याचे हे एक अत्यंत उपयोगी तंत्र आहे.ते आपण समजावून घेऊ.

बांधकाम सुरू करण्यापूर्वी अभियंता,इमारतीचा आराखडा तयार करतात.हो ना?किचन कसे असावे,मुख्य हॉल कसा असावा,प्रत्येक रुम ची साईज किती असावी,समोर पाठीमागे ,आजूबाजूला किती जागा मोकळी सोडावी ई

बाबींचा विचार करून अभियंता इमारतीचा आराखडा तयार करतो.त्या प्रमाणे बांधकाम सुरू करतो.त्याच्या कल्पनेतील इमारत तयार होते.
आपण भाषणाची, गाण्याची ,नाटकाची रंगीत तालीम करतो ना तसेच हे स्वयं सुचनेचे तंत्र काम करते.त्याचा अवलंब करून आपण व्यक्तिमत्व विकास साधू शकतो.

परीक्षेची वाटणारी भीती घालवू शकतो.मनाला ग्रासणारी काळजी,चिंता,निराशा घालवून आत्मविश्वास प्राप्त करू शकतो. मनाला धाडसी,उत्साही बनवू शकतो. विश्वास ठेवा यशाला खेचून आणू शकतो.हे साधे सोपे तंत्र असे आहे.

पहाटे शांत वातावरणात,मंद प्रकाशात अंथरुणावर शवा सनात झोपा, किंवा खुर्चीवर शांत बसा. डोळे बंद करा.

काहीं क्षण दिर्घ श्वसन करा.कसलीही हालचाल करू नका.
त्या नंतर पायांचे तळवे, अंगठे,गुडघे,मान, खांदे,डोळे,पापण्या,मस्तक रिलॅक्स करा अशी स्वतःला सूचना द्या.रिलॅक्स व्हा.

“शांतपणे झोपी जा”अशी 5 सेकंदाच्या अंतराने तीन वेळा स्वतःला सूचना द्या.”शांत वाटतंय रिलॅक्स वाटतंय हलकं वाटतंय”असं मोठ्याने आपणास ऐकू येईल अशा आवाजात म्हणा.इथे एक लक्षात घ्या शांतपणे झोपी जा या सूचनेचा अर्थ आपण तंद्री लावायची असा आहे.
मग “गाढ झोपी जा”अशी 5 सेकंदाच्या अंतराने तीन वेळा स्वतःला सूचना द्या.याचा अर्थ जास्तीत जास्त मन शांत एकचित्त करा. 1ते 11 अंक मोजा.

इथे मुख्य भागाला सुरुवात होते.तीन वेळा आता स्वतःला सूचना द्या. डोळ्यासमोर तसे चित्र आणा.

१) माझ्यात पुरेपूर आत्मविश्वास आहे.
आत्मविश्वास असलेली व्यक्ती कशी असते तशी स्वतःची प्रतिमा डोळ्यासमोर आणा.

२) “मी धैर्याने परीक्षेला सामोरा जात आहे”अशी सूचना स्वतःला देऊन,प्रश्नांची उत्तरे लिहित आहे असे चित्र डोळ्यासमोर आणा

३) “प्रश्नपत्रिका मी समाधानकारक रित्या सोडवली आहे”
अशी सूचना देऊन,प्रसन्न चित्तानेपरीक्षा हॉल मधून बाहेर पडत आहोत असे कल्पनाचित्र पहा.

४) “मला परीक्षेत अपेक्षित यश मिळत आहे”अशी एक सूचना देऊन स्वतः यशस्वी झाल्याचे दृश्य डोळ्यासमोर आणा.

आपण यशस्वी होण्यासाठी इतरही काही सूचना स्वतःला देऊ शकता.
नंतर 3 ते 1 अंक मोजून हळू हळू डोळे उघडा.

हा व्यक्तिमत्व विकास करून यशस्वी होण्यासाठी मनाचा व्यायाम आहे.

इच्छुकांनी करावा.नक्की लाभ होईल.


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!