Skip to content

जास्तीत जास्त ‘Perfection’ येण्यासाठी नेमकं काय कराल??

जास्तीत जास्त ‘Perfection’ येण्यासाठी नेमकं काय कराल??


सौ. शिरीन कुलकर्णी

फिनलंड
shirin.kulkarni@ccefinland.org


एखादं काम करणं आणि ते 100 टक्के पूर्ण करणं या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. समजा आपण एक चौकोन काढतो आहे. तीन बाजू काढल्या आहेत व्यवस्थित पण चौथी 98 टक्के काढली आहे तर तो चौकोन पूर्ण होईल का?
म्हणजे तीन बाजू व्यवस्थित काढून सुद्धा, चौथी बाजू 100 टक्के पूर्ण न केल्यामुळे केलेले प्रयत्न, घेतलेली मेहनत वायाच गेली.

पुष्कळदा आपण असंच करत असतो. काम भरपूर करतो पण ते जेव्हा पूर्ण करून शेवटचा घाव घालायचा असतो तेव्हा अचानक थकवा, आळस, कंटाळा यापैकी कुणाशीतरी गाठ पडते. अगदी पूर्ण होत आलेलं काम कुठंतरी सुटून जातं. 100 टक्के पूर्ण होत नाही. आपल्याला वाटतं आपण तर किती काम केलं आणि दुसऱ्याला ती चौकोनाची चौथी अपूर्ण बाजू दिसत राहते. एकीकडे आपली 98 टक्के मेहनत आणि दुसरीकडे अपूर्ण राहिलेलं काम, यातून खटके उडायला सुरुवात होते. घरात, बाहेर, ऑफिसमध्ये आणि मुख्य म्हणजे आपल्या मनात.

संवाद साधारण असे होतात (ऑफिसमध्ये),
व्यक्ती अ: ते अमुक एक काम सांगितलं होतं तुला. त्याचं काय झालं?
व्यक्ती ब: हो. केलं ना मी.
व्यक्ती अ: पण त्याबद्दल एक तक्रार आली आहे काम पूर्ण नसल्याची.
व्यक्ती ब: ओह, हां, तसं सगळं करत आणलं होतं मी पण बहुधा नेमकं शेवटचं काहीतरी राहून गेलं. सॉरी.
व्यक्ती अ: आता सॉरी म्हणून काय उपयोग? आपली प्रतिमा (इम्प्रेशन) तर डागाळली ना?

व्यक्ती ब: (मनातल्या मनात) एवढं काम केलं मी पण त्याचा काही उपयोग नाही. जे राहिलं ते बघणार सगळे, केलं ते गेलं कुणीकडे. असंच असतं नेहमी. माझ्या कष्टांची कुणाला किंमतच नाही.

आता या परिस्थितीत कष्टाची किंमत नसणे किंवा केलेल्या कामाचं महत्त्व नसणे असा कुठलाही भाग नसतो तर काम १०० टक्के पूर्ण न झाल्यामुळे ओढवलेल्या समस्येचा संबंध असतो.

मग अशा समस्या उद्भवू नयेत म्हणून काय करता येईल ? अर्थात दरवेळी एखादं काम १०० टक्के पूर्ण न होण्यामागे एखादा माणूसच कारणीभूत असेल असं नाही. इतरही तांत्रिक कारणं असू शकतात पण या लेखापुरता आपण तो विषय बाजूला ठेवू या.

काम १०० टक्के पूर्ण करण्याची सवय आपल्याला लावून घ्यायला हवी. हे कसं साध्य करता येईल बरं ? काही उपाय सुचलेत ते मांडते.

१. एखादं काम सुरु करण्यापूर्वीच त्याचा अंतिम परिणाम काय अपेक्षित आहे याची आखणी करणं.

२. हा अंतिम परिणाम सहकाऱ्यांकडून / कुटुंबियांकडून तपासून घेणं. त्यांच्या त्याबद्दलच्या अपेक्षा, विचार जाणून घेणं.

३. कामाचं स्वरूप लक्षात घेऊन त्याप्रमाणे ते कसं पूर्ण करता येईल याबद्दल निश्चित योजना आखणं

४. ती योजना वापरताना येऊ शकणारे संभाव्य धोके, अडचणी, वैयक्तिक मर्यादा लक्षात घेणं

५. वैयक्तिक मर्यादा या वेळेच्या, आपल्या स्वतःच्या ताकदीच्या, आरोग्याच्याही असू शकतात.

६. या वैयक्तिक मर्यादा लक्षात आल्या कि त्याच्यावर उपाय योजना करता येईल जसे कि कामाच्या काही टप्प्यांमधे इतर सहकाऱ्यांची मदत घेणे. त्यासाठी त्यांना आधीपासून कामाच्या स्वरूपाची माहिती देणे .

७. आपल्या वैयक्तिक आयुष्यात छोटी-छोटी कामं ठरवून वेळेत पूर्ण करणे जसे कि सकाळी उठल्याबरोबर पांघरुणाची घडी घालून जागेवर ठेवणे, जेवण झालं कि लगेच ताट उचलून ठेवणे, सोफ्यावर बसून पुस्तक वाचत असू तर सोफ्यावरून उठताना पुस्तक उचलून जागेवर ठेवणे.

शेवटी काही मोठे बदल घडवून आणायचे असतील तर सुरुवात छोट्या बदलांनीच करावी लागते नाही का ? चला तर मग सुरुवात करू या छोट्या छोट्या पावलांनी.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!