
पालकांनो ह्या चुका कधीच करू नका..
ऋचा पाठक
आई वडील व त्यांची मुलं हे अतिशय सुंदर,निर्मळ नातं असतं… आई वडिलांचं प्रेम म्हणजे साक्षात जिवंतपणी स्वर्गाची अनुभूती असते ..हो ना…पण काही काही वेळा थोडंसं कुठं तरी पालक चुकतात आणि नेमक्या त्यांच्या त्याच गोष्टीचा परिणाम त्यांच्या मुलांच्या कोवळ्या मनावर होतो.. त्यामुळं आज मी खालील गोष्टी ज्या सांगणार आहे त्या अगदी काळजीपूर्वक वाचा…
1. आई वडिलांनी मुलांसमोर भांडू नये.
लहानमुलं म्हणजे मातीचा गोळा असं आपण म्हणतो त्यामुळं आज पालक जर त्यांच्या मुलांसमोर भांडण करत असतील तर विचार करा काय परिणाम होत असेल त्यांच्या बालमनावर!उद्या ते तुमचंच अनुकरण नाहीत का करणार??साधे मतभेद जरी होत असले तरी त्याचे मोठ्या वादात रूपांतर होत असते,त्यामुळं आई वडिलांनी त्यांच्या मुलांसमोर कृपया वाद विवाद टाळावेत…
2. मुलांना वेळ द्या.
मला मान्य आहे की तुम्ही दोघेही नवरा बायको तुमच्या मुलांसाठीच जॉब करता,दिवस भर घराबाहेर असता आणि घरी आल्यावर दमून झोपून जाता.पण अश्याने तुमच्या पाल्याला जे आई बाबांकडून प्रेम बालवयात हवं असत ते नाही मिळत..त्यामुळं निदान दिवसातील 2 तास तरी मुलांना वेळ द्या..
3. तुमच्या मुलाशी दुसर्याशी तुलना करणे टाळा.
हे बघा पालकांनो,हाताची पाची बोटे जशी सारखी नसतात तसेच माणसा माणसा मध्ये देखील आहे… त्यामुळं कृपया असं करू नका..अभ्यासाची मार्कांची तुलना दुसऱ्या मुलांशी किंवा तुमच्याच असलेल्या दुसऱ्या मुलाशी नका करू…
4. मुलांना त्यांच्या वयानुसार वागणूक द्या.
असं म्हणतात खरं कि ज्यावेळेस बाबाची चप्पल मुलाला येते त्यावेळेस बाबांनी मुलाचा मित्र बनायचं असत…पण प्रत्यक्षात मात्र कितीजण हे पाळतो?
तर पालक म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्या प्रमाणे आपल्या पाल्याची काळजी घ्या!
हा लेख तुम्हाला कसा वाटला??
नक्की सांगा…
आवडल्यास like करा आणि share करा..आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मस्त रहा..आनंदात रहा..भेटूया आपण पुढच्या लेखात..
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !
