Skip to content

आपल्या प्रत्येकात एक छुपा लेखक दडलेला आहे, त्याला बाहेर काढा!

लेखनात सकारात्मक ऊर्जा


संगीता वाईकर

नागपूर


चौसष्ट कलांपैकी एक कला म्हणजे लेखन कला ही आहे .आपल्या मनातील विचार,भावना शब्दबध्द करणे आणि त्यातून मन मोकळे करणे हे लेखनातून साध्य होते.

फार पूर्वी घरातील स्त्रीला लेखनाचे ही स्वातंत्र्य नव्हते आणि म्हणून ती मनात आलेले विचार दडपून ठेवत असे आणि लिहिण्याची संधी मिळाली तर ते लेखन लपवून ठेवत असे.पण काळानुसार काही बदल अपरिहार्य आहे तसे ती देखील लिहिती झाली आपल्या मनातील विचार कथा, कविता, कादंबरी यातून मांडू लागली .एवढेच नाही तर आज तिचे लेखन स्त्रीवादी झाले आहे.आज ती तिच्या व्यथा ,वेदना मोकळ्या मनाने लिहू लागली आहे.जे तिला व्यक्त करायचे आहे ते समाजासमोर येऊ लागले आहे.तिची लेखणी सशक्त आहे कारण ती मनातील भावना व्यक्त करणारी आहे.

लेखनाच्या माध्यमातून अनेक विषय ती सहज कागदावर उतरवत असते .पूर्वी तिला बंधन होते पण आज लेखनासाठी अनेक मार्ग तिला उपलब्ध झाले आहे .समाजातील हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे. अनुभवावर आधारित लेखन हे त्या लेखनाचे सकसत्व आहे.कारण अनुभवातून ती त्या विषयाच्या अगदी जवळ जाते आणि त्यामुळे ते लेखन मनाच्या जवळ जाणारे असते .

आजची स्त्री घरात आणि घराबाहेर ही तेवढीच सक्षम आहे आणि त्यातून तिच्या विचार करण्याच्या कक्षा देखील रुंदावल्या आहेत.त्यातूनच तिची लेखणी अधिक सशक्त होते आहे .आणि त्यामुळे “ती सध्या काय करते “हा प्रश्न कालबाह्य झाला आहे.

स्त्री अष्टावधानी आहेच एकाच वेळी अनेक कामं ती लीलया पार पाडत असते .आणि लेखणी तून तिला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.समाजातील घडामोडी ती अत्यंत मनापासून मांडत असते .

उत्तम लेखन करायचे तर चांगले वाचन देखील व्हायला हवे.”वाचाल तर वाचाल” असे म्हणतात तसेच” उत्तम वाचाल तर उत्तम लिहाल ” असेही म्हणता येईल.

उत्तम साहित्य हे कालातीत असते आणि त्यामुळे ते टिकून राहते.आजही पू. ल आणि व .पू मराठी माणसाच्या मनात घर करून आहे ते त्यांच्या कसदार लेखणीच्या सामर्थ्याने च.त्यांचे अनुभव आणि ते वाचकांसमोर मांडण्याची कला आजही तेवढीच प्रभावी आणि आनंद देणारी आहे हे निश्चित.

काळानुसार साहित्यातही बदल होतात आणि ते अपरिहार्यच आहे.कारण परिस्थिती बदलली म्हणजे विचारही बदलतात आणि विचार बदलले की लेखनात ही बदल होतातच . आजही जुने साहित्यिक कथा, कविता, कादंबरी यातून आपले मन काबीज करतात ते त्यांच्या कसदार साहित्याने .

शब्दांची ताकद फार मोठी आहे. ती कधी शस्त्र होते तर कधी प्रेमाने कुरवाळते, कधी उपदेश करते तर कधी मनोरंजनही करते .अशा या शब्दांची महती फार अगाध आहे.

पू. ल च्या मते प्रत्येकाने जीवन जगताना पोटापाण्याचा व्यवसाय करावाच पण एक तरी छंद जोपासायला हवा तर जीवन अधिक समृध्द होईल.या लेखणीतून प्रोत्साहन मिळते आणि त्यामुळे लेखनाचा आनंद द्विगुणित होतो.प्रत्येकाने जीवन जगताना एक धैय उराशी बाळगले पाहिजे.आज डोळे उघडे ठेवून समाजात वावरले तर अनेक विषय सहज उपलब्ध होतात. चांगले काहीतरी लिहीत जावे आणि चांगले वाचत जावे त्यातून सतत कार्यरत राहण्याची ऊर्जा प्राप्त होते.

प्रत्येक व्यक्तीने लिहिते व्हायला हवे.कारण लेखन ही आनंदाची पर्वणीच आहे.


एक साधा फॉर्म भरून आपलं नाव नोंदवा.

येथे क्लिक करा!


दर्जेदार आणि उत्तमोत्तम लेखन साहित्य निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे, हाच एकमेव हेतू.

अधिक माहितीसाठी – ९१३७३००९२९

‘आपलं मानसशास्त्र’ सोशल मिडिया टीम



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!