Skip to content

मुलांना पैशाचं मॅनेजमेंट असं शिकवा!

मुलांना पैशाचं मॅनेजमेंट असं शिकवा!


प्राजक्ता पंडित

समुपदेशक, पुणे.


मुलांना लहानपणी अभ्यास , खेळ , संस्कार इत्यादी आपण शिकवीत असतोच परंतु मुलांना पैश्याबाबत आपण शिकवितो का❓?

काही अर्थ तज्ज्ञांच्या सर्वेक्षणात असे दिसून आले की पैश्याबाबत ज्या गोष्टी श्रीमंत आपल्या मुलांना शिकवितात , तश्या गरीब किंवा मध्यमवर्गीय पालक शिकवीत नाही.

एवढेच नाही तर मध्यमवर्गीय,गरीब मुलांच्या व श्रीमंत मुलांच्या धन , पैसा विषयीच्या बिलिफ मध्ये खूप तफावत असते आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की अवचेतन मनावर बिलिफ सिस्टम चा खूप प्रभाव असतो.

आता बरेच पालक म्हणतील एवढ्या लहान वयात काय पैश्याबाबत शिकवायचे मुलांना मोठे झाल्यावर सांगू सर्व आत्ताच सांगितले आणि त्यांचा स्वभाव लालची झाला तर वगैरे वगैरे ……. पण नेमका इथेच सर्व घोळ होऊन बसतो. पैसा ही खूप मोठी आणि जास्त प्रमाणात वापरली जाणारी ऊर्जा आहे.

Low Of Attraction चा नियम जसा मोठ्यांना लागू होतो तसाच लहान मुलांनासुद्धा होतोच! जर मुलांचे बिलिफ कुठल्याही बाबतीत चुकीचे तयार झालेले असतील किंवा होत असतील तर त्याचा परिणाम आयुष्यावर होणारच! म्हणूनच पालक म्हणून आपली जबाबदारी म्हणजे मुलांच्या बिलिफ सिस्टम हेल्दी होण्यासाठी नक्की प्रयत्न करावेत हे साधलं की अर्धी लढाई जिकली असे म्हणू शकतो. ?

आता ही बिलिफ सिस्टम तयार कशी होते तर मुले जे काही ऐकतात,बघतात, त्यांचे व इतरांचे अनुभव इ. मुळे.

उदाहरण-28 वयाची दोन मुले – शिक्षण सोबतच घेतलेले, मार्क्स सुद्धा जवळपास सारखेच परंतु एक सहज पैसे कमावतोय तर दुसरा महिना भागेल एवढेच कसेतरी कमावतोय. काय बर फरक असेल ❓ ?
दोघांशी संवाद साधला असता लक्षात आले की त्यातला जो कमी पैसा कामवित होता त्याच्या लहानपणी त्याच्या ऐकण्यात अशी वाक्य यायची ?
“पैसा हा केवळ कष्टानेच मिळतो”, तर जो मुलगा मुबलक कामवित होता त्याच्या मते “पैसा कमविण्याची खूप साधने असतात तसेच तो सहज कमावीता येतो”?

वरील उदाहरणा वरून आपल्या लक्षात आले असेल की मुलांची बिलिफ सिस्टम किती महत्वाची आहे ते. या मुलांच्या या धारणा त्यांच्या वयाच्या 10 व्या वर्षापर्यंत तयार झालेल्या होत्या परंतु त्यांचा परिणाम संपूर्ण आयुष्यावर झालेला दिसतोय.

मुलाची पैश्याबाबत हेल्दी,उत्तम बिलिफ सिस्टम निर्माण व्हावी म्हणून काही टिप्स??

? पैश्याबाबत ज्ञान देणारी पुस्तके वाचायला द्या उदा. रिच डॅड पुअर डॅड इ.
?मुलांच्या पैश्याबाबतच्या कन्सेप्ट जाणून घ्या.
?पैसा कमविण्या बरोबरच तो योग्य मार्गाने कसा कमवायचा व वाचवायचा कसा याचेही ज्ञान देणे आवश्यक
? मुलांमध्ये केवळ गरजेसाठी पैसा वापरण्याचा समंजस पण लहानपणीच रुजवायला हवा.
? पैश्याबाबत च्या शिक्षणासाठी शाळा ,कॉलेज वर अवलंबून राहू नये.
?मुलांना पैश्याचा आदर करायला शिकवा.

धन्यवाद ????


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!