Skip to content

परीस्थीती बदलता येत नसेल तर मनस्थीती बदलूया..

परीस्थीती बदलता येत नसेल तर मनस्थीती बदला..


रेणुका शेलार

(पुणे).


खुप दिवसानंतर मी होस्टेल वरुन घरी आले होते. सकाळचा नाष्टा करत आमची सर्वांची गप्पांची मैफील जमली होती. तोवर टी.व्ही. वरीत एक बातमी सर्वांच्या कानी पडली प्रांजल पाटिल ही दोन्ही डोळ्यांनी अंध असनारी मुलगी UPSE परीक्षेत १२४ वी रॅंक मीळवत यशष्वी झाली प्रांजल पाटिल ला IAS ही पोस्ट मीळाली आणी तीची मुलाखत सुरु झाली त्या मुलाखतीत तीला मीळालेल्या यशाच्या मागची तीची मेहनत तीने एका वाक्यात सांगीतली की, “जेव्हा परीस्थीती बदलता येत नाही तेव्हा मनस्थीती बदला”

खरचं आहे की, जीवनात यशस्वी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अनेक भयावह परीस्थीतीतुन जावे लागते पन त्या वेळेस त्या प्रत्येकाने त्या परीस्थीला सामोरे जाण्यासाठी आपले मनस्थीला बदलवीली आणी त्या मुळे ती यश गाठु शकली जसे की, लक्ष्मी अग्रवाल, काचंनमाला पांडे (देशमुख), नरेद्र मोदी, सिंधुताई सपकाळ

अनेकांना अपगंत्व जन्मताहा असते तर काही भवीष्यातील घटनांमुळे अपंग होतात. या परीस्थीतीला बदलता येनार नाही त्यामुळे त्यांना आपले जीवन अंधारमय वाटु लागते. अशा चुकीच्या मनस्थीतीने जीवन संपवनारे अनेक आहेत पन या परीस्थीत मनस्थीती बदलुन अनेकांनी धर्याने, मेहनतीने स्वताच्या अस्तीत्वाचा पाया रोऊन आपल्या जीवनात प्रकाश आनला व आपल्या जीवनात नाही तर इतरांना त्यांच्या वागण्यातुन प्रेरना दिली उदाहरण घ्यायचे झाले तर कांचनमाला पांडे (देशमुख) आंतराष्ट्रीय दर्जाची भारतीय जलतरन पटु.

दुसरे उदाहाण घ्यायचे झाले तर वैवाहीक जीवनात प्रकर्शाने अनेक महीलांना सामोरे जावे लागनाऱ्या परीस्थीचं लग्नानंतर प्रत्येक मुलीला समजुन घेनार सासर मीळेल अस नाही जसे की तीच्या भावना समजून न घेन, तीच्या कामात चुका काढुन तीला वाईट बोलन, तीच्या माहेरच्यांना वाईट बोलन, तीच्यावर चीडचीड करुन तीच्या प्रत्येक चुकांच गावप्रर्दशन करन, तीच्या रडण्यावर हसन, मी जबरदस्तीने तुझ्या सोबत राहतोय अस सांगन व त्या प्रमाने वागनुक देने, तीच्याबद्दल सारख्या घरच्यांजवळ तक्रारी करन, गेम सोशल मिडीया या मघ्ये वेळ घालवन पन तीला वेळ न देनं, तीच्या आजार पनात तिची काळजी न घेन तीला तुच्छतेने वागवन.

अशा परीस्थीत ती पावला पावला वर मानसीक रीत्या जखमी होत असते. पन तीचं एकुन घेईल तरी कोन? ती मानसीक रीत्या आधु होते आणी शारीक रीत्या व्याधींनी ग्रासते. मग अशा वेळेस प्रत्येक मुलीने जर आपली मनस्थीती बदलली ती खंबीर झाली. तीने स्वताच्या पायावर उभे राहण्याचा ठाम निर्नय घेतला. वाट बघीतली हे सगळे बदलेल पन तरीही ही परीस्थीती बदलली नाही तर मग मात्र तीने समाजाचा वीचार न करता अशा वाईट वागण्याला जगासमोर आनावे न्याय मीळवावा आणि तीला संविधानाने दिलेल्या जगण्याच्या स्वातंत्र्याचा उपभोग घ्यावा. सिंधुताई सपकाळ हे आपल्या समोर ज्वलंत उदाहरन उभे आहे.

अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीला अनेक परीस्थीतुन जावे लागते काही परीस्थीती चांगल्या तर काही वाईट असतात. पन या वाईट परीस्थीतच अपली खरी परीक्षा असते. या वाईट परीस्थीत आपन आपली मनस्थीती बदलावी म्हणजे नक्की काय तर या परीस्थीतीत पॉझीटीव उर्जेने स्वत:च्या वीचारांना कनखर बनवाव येनाऱ्या प्रत्येक वादळात ठाम पने उभे राहावे. मानसीक रीत्या न खचता धर्ऱ्याने सामोरे जावे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपन धीर धरावा.

अशा प्रकारे परीस्थीती बदलता येत नसेल तेव्हा मनस्थीती बदलावी व यशाचे शिखर सर करावे, स्वातासाठी न्‍याय मीळवावा, आणि आपल्या बदललेल्या मनस्थीतीने आपल्या सारख्या जखमी मनांना आधार देऊन एक चांगल नागरीक बनण्याच कर्तव्य करावे.


प्रस्तुत लेखात आढळून येणाऱ्या व्याकरणाच्या तुरळक चुका जाणीवपूर्वक दुर्लक्षित करण्यात आलेल्या आहेत. कारण लिखाण करणारी व्यक्ती प्रथमच आयुष्याच्या पहिल्या लिखाणाची सुरुवात करत आहे. आपल्या शुभेच्छा तिच्या पाठी असू द्या!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!