Skip to content

‘नात्यात दुरावा’ कारण झपाट्याने बदललेली जीवनशैली.

बदलते नातेसंबंध


सुरेखा अद्वैत पाटील


हल्ली काळ बदलतोय तसे आपण स्वतः पण बदलतोय!

पूर्वी एकत्र कुटुंब असायचीत त्यामुळे साहजिकच घरी आजी, आजोबा, आत्या, काका आणि काकू सोबत आई बाबा सख्खे, चुलत, आते, मावस आणि मामेभावंड ही असायचीत.

नंतर जसे मोठे झालो तसे मित्रमैत्रिंनि वाढले.

त्यानंतर लग्न !आणि लग्नानंतर नवीन निर्माण झालेली ती
त्यात नवीन कुटुंबात जुळवून घेताना होणारी दमछाक.. आपल्या कडून त्यांच्या अपेक्षा आणि त्यांच्या कडून एकाचवेळ अपेक्षा आणि दबाव.

त्यात सून म्हंटली की तिच्याकडून साहजिकच जास्तीच्या अपेक्षा त्यामुळे कुटुंबातील सासू नंदा यांच्याशी आपसूकच दुरावा
त्यामुळे संवाद न होणं आणि सोबत हा ही प्रयत्न की मी कुठे तुमच्याहून कमी आहे ? ही स्पर्धा.

त्यांनतर आपल्या चुलत सक्खे मावस सर्व नातनग यांच्या पासून ही लांब जाण…

नात्यात दुरावा येण्याचं मुख्य कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली व मीं पणा. हा पण यास तितकाच जबाबदार.
स्वतः स सिद्ध करण्यात आपण सर्वांपासून दूर चाललोय याची होणारी जाणीव हीच आपणास संबंध जोपासण्यास पोषक ठरेल.

त्यासाठी आपण किमान आठ्वडातून एकदातरी आपल्या आप्तस्वकीयांची विचारपूस करावी. जमल्यास सुटीत त्यांना आपल्याकडे किंवा आपण त्यांच्याकडे वेळातवेळ काढून भेट घ्यावी. त्यामुळे दुरावलेले संबंध जवळ येण्यास फार मदत होईल. त्यासाठी लागून लागून लागणार तर काय थोडा वेळ द्यावा लागेल.

पण प्रत्येक व्यक्तीन हा नियम केलाच पाहिजे. त्यामुळे झालं तर नाते पूर्वी सारखेच घट्ट होणार आणि आपणास ही समाधान की मीं सर्वांशी प्रेमानं आणि कुठलाही बडेजाव न करता संबंध टिकवून आहे.

आपसूकच हे समाधान खूप मोठं आहे

राग आत ठेवून आपलंच स्वस्थह्य खराब होत… त्यापेक्षा सर्वांशी मिळून मिसळून राहण्यात खूप खूप आनंद आहे….



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!