Skip to content

‘स्व-लिखाण’ करणाऱ्यांसाठी ‘आपलं’ मार्फत हक्काचं एक व्यासपीठ!

लिहून-वाचून दडलेल्या भावना मोकळ्या होतात!


नमस्कार ?,

आजपासून अधिकृतपणे आपण लिखाणाची आवड असणाऱ्यांसाठी एक मंच तयार करीत आहोत. ज्यामध्ये याअगोदर लिखाण केलेले तर असतीलच पण विशेष म्हणजे लिखाणाची आवड बाळगणारे नवलेखक सुद्धा असतील.

आपल्यापैकी कोणाही सदस्याला लिखाणाची आवड असल्यास, (मग त्या सदस्याने यापूर्वी कधीही लिखाण केलेले नसले तरी चालेल) अशा सर्व सदस्यांसाठी एक संधी…

तुम्ही लिहा, आम्ही प्रकाशित करू!


थोडक्यात ‘आपलं मानसशास्त्र’ विषयी माहिती

आपलं मानसशास्त्र’ २०१२ सालापासून कार्यरत आहे. विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमाने फेसबुक आणि व्हाट्सएप यांचा योग्य उपयोग करून आपण मानसशास्त्र विषयप्रेमींपर्यंत पोहोचू शकलो. आज आपला व्याप इतका वाढला आहे की आपल्याला जवळजवळ ३० लाख वाचन प्रेमी लाभलेत. तसेच ५ वी ते १५ वी पर्यंत शिकणाऱ्या मुलांसाठी करिअर काऊंन्सीलिंग (२०१२ पासून) आणि मानसिक समस्या निवारणासाठी पर्सनल ऑनलाईन काऊंन्सीलिंग (२०१४ पासून) आपण पूर्ण महाराष्ट्रासाठी सुरू केल्या आहेत.

‘आपलं मानसशास्त्र’ च्या इथपर्यंतच्या प्रवासाला अनेक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रेरणादायी हात लाभलेले आहेत. तसेच ‘आपलं मानसशास्त्र’ चे संस्थापक आणि संचालक श्री. राकेश वरपे हे सुद्धा स्वतः मानसशास्त्रीय तज्ञ असून त्यांना नवलेखकांची एक मोट बांधायची आहे आणि त्यात जर मानसशास्त्रीय विद्यार्थी असतील तर लिखानासोबतच प्रॅक्टिकली मानसशास्त्र हाताळणे, त्या-त्या भागात केसेसचा अनुभव घेणे, विद्यार्थ्यांना शिकण्याच्या वयापासूनच रोजगार उपलब्ध करून देणे, असा त्यांचा दुरदृष्टीय मानस आहे.


■ लिखाणाचे विषय ?

● सामाजिक मानसिकता

समाजामध्ये वावरत असताना अनुभवास येणारे मानसिक प्रश्न, गुंता, गोंधळ आणि संकुचितपणा. यावर खूप मोठ्या प्रमाणात लेखन साहित्य निर्माण होणे गरजेचे आहे. अशा विषयांवर वाचणारे खूप आहेत पण मानसशास्त्रीय अंगाने लेखन साहित्य फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणून हा मोठा स्पेस भरून काढणे आवश्यक.

● प्रेरणादायी लेख

पुष्कळ लेख असे असतात ज्या मनाला उभारी देऊन जातात. मग त्यात काही आत्मचरित्र असतात. गुंतलेल्या प्रश्नांचा एक उलगडा असतो. मन प्रसन्न होते. नवीन उभारी घेण्यास सज्ज होते.

● वैवाहीक जीवन

पती-पत्नी विषयी असणारे लेखन साहित्य हे आत्तापर्यंत आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेले आहेत. कारण असमाधानी वैवाहिक जीवन हे सध्याचं वास्तव आहे. ते वास्तव स्वीकारण्यास प्रेरित करणारे लेखन आणि वैवाहिक जीवन उत्तम आणि समृद्ध कसे करता येतील, अशा लेखनाला प्रचंड स्पेस आज उपलब्ध आहे.

● पालक – बालक

संबंधशिक्षणाचं बाजारीकरण, पालकांच्या अवास्तव अपेक्षा, जीवघेणी स्पर्धा त्यातून मुलांवर येणार स्ट्रेस यावर एखादं लिखाण पडलं की वाचायला प्रचंड गर्दी जमते. अशा लेखनात उत्तम उपाय सुचविलेल्यांनाच पालक डोक्यावर घेतात. जसे पहिला नंबर आल्यावरच मुलांना घेतात अगदी तसेच. म्हणून नव लेखकांसाठी हा स्पेस पूर्ण भरून काढावा.

● बदलते नाते संबंध

पैसे कमविण्याची धडपड, पटकन श्रीमंत होऊन स्वतःला सिद्ध करने, विस्कटलेला संवाद, निष्क्रिय चर्चा, बदलती जीवन पद्धत याकडेही मानसशास्त्रीय अंगाने लिहिण्यासारखे प्रचंड आहे.

● मानसिक समस्या आणि आजार

निरनिराळ्या मानसिक समस्या आणि आजार याविषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचणे ही एक काळाची गरज बनली आहे. कारण सर्रास औषधोपचारांवर जोर दिला जातोय.

● लैंगिकता आणि आपण

मानवी जीवनाचं केंद्रबिंदू असणारी लैंगिकता याबद्दल समाधानकारकता असल्यास उत्तम आणि आनंदी आयुष्य जगता येते. पण जर याबद्दल विकृत विचार मनात असतील तर समाज अधोगतीला जातो. म्हणून हा भाग याठिकाणी निवडण्यात आलेला आहे. यावर जास्तीत जास्त लिखाण अपेक्षित आहे.

● वृध्यांच्या समस्या आणि उपाय

मुलांची लग्न झालेली असतात, मुलं आपापल्या जीवनशैलीत व्यस्त असतात या गडबडीत आयुष्याचा हा अंतिम टप्पा दुर्लक्षित राहू नये, म्हणून वृद्धांच्या जीवनाविषयी, मानसिकतेविषयी काही गोष्टी आत्ताच तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.

● इतर (सुचविण्यासाठी)

एखादा भाग टाकायचे राहिले असे वाटत असल्यास आपण सुचवू शकता. ज्या मुद्यांवर ‘आपलं मानसशास्त्र’ या विचार मंचावर अमुक-अमुक लेखन होणे आवश्यक वाटत असल्यास त्यासाठी या विचारमंचाची दारं सदैव उघडी असतील.

वरील संबंधित विषयांवर जास्तीत जास्त लिखाण होणे जरुरीचे आहे. त्या सर्व लिखानांमधून समाजाला एक नवीन दिशा मिळण्याची अदब असावी.


■ निकष

●लिखाण करणारी व्यक्ती मानसशास्त्रीय विषयाशी संबंधितच असणे गरजेचे नाही. पण असल्यास स्वागत.

● लिखाण करणारी व्यक्ती ही सोशल मीडियावर काही प्रमाणात ऍक्टिव्ह असावी.

● Whatsapp, Facebook, Telegram, Helo किमान या चार सोशल मीडियावर व्यक्तीचे अकाउंट असावे. जेणेकरून तुमचे लेख किती वाचकांनी वाचले, काय प्रतिक्रिया दिल्यात याविषयी तुमच्याकडे माहिती असेल. त्याचाच फायदा पुढचे लिखाण अजून प्रभावशाली होण्यासाठी मिळेल.

● दिवसातून दोन लेख किंवा दिवसातून एक लेख किंवा तीन दिवसातून एक लेख किंवा आठवड्यातून एक लेख या चारपैकी कोणत्याही प्रकारे आपण स्वलिखान देऊ शकता.

● आपले लिखाण हे टायपिंगमध्येच आपल्याला पाठवायचे आहे. PDF, Word किंवा हस्ताक्षरात लिखाण केलेले फोटो गृहीत धरले जाणार नाहीत.

● लिखाण करणारी व्यक्ती एखादी तज्ञ असल्यास त्या व्यक्तीचे नाव, पद, ईमेल आयडी लेखात असतील. बाकी ऑफिस पत्ता, वेबसाईट लिंक टाकण्यात येणार नाही.


एक साधा फॉर्म भरून आपलं नाव नोंदवा.

येथे क्लिक करा!


दर्जेदार आणि उत्तमोत्तम लेखन साहित्य निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे, हाच एकमेव हेतू.

अधिक माहितीसाठी – ९१३७३००९२९

‘आपलं मानसशास्त्र’ सोशल मिडिया टीम

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!