
प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याकडून हीच अपेक्षा करत असते.
लग्नाच्या वाढदिवशी एकमेकांबद्दल काय विचार मनात येतात, ते लिहून ठेवायला नवरा बायकोने सुरुवात केली. पस्तीस वर्ष पूर्ण झाल्यावर पहिल्यांदा बायकोची डायरी वाचायचं ठरलं. बायकोच्या डायरीचं पहिल पान उघडलं आणि…..
पहिलं पान..दुसरं पान..तिसरं पान..
– आज लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी मला आवडीचं गिफ्ट मिळालं नाही….
– आज जेवायला बाहेर जायचं होतं, पण नवरा विसरूनच गेला….
– आज माझ्या आवडीच्या हिरोचा सिनेमा दाखवणार होता, पण, घरी आल्यावर विचारले तर म्हणाला खुप दमलोय, आज नको जाऊया….
– आज माझ्या माहेरची माणसं आली होती पण त्यांच्याशी तो धड बोललाही नाही….
– आज कितीतरी दिवसांनी तो माझ्यासाठी साडी घेऊन आला ती पण जुन्या डिझाईनची होती.
दिवसेंदिवस अशाच छोट्या मोठ्या कुरबुरींनी तीची डायरीची पानं भरलेली होती. ती वाचून नव-याचे डोळे भरून आले. तो म्हणाला माझ्या हातून एवढ्या चुका झाल्या आहेत हे मला माहीत नव्हते .आता पुन्हा अशा चुका होणार नाहीत याची काळजी नक्की घेईन.
मग बायकोने नव-याची डायरी वाचण्यासाठी हातात घेतली.
पहिले पान कोरं….
दुसरं पान कोरं….
तिसरं पान कोरं….
आणखीही काही पानं उलटली ती ही तशीच कोरी.
बायको म्हणाली, मला माहीत नव्हते की, तु माझी एवढीही इच्छा नाही पूर्ण करणार. दोघांनीही डायरी लिहायचं असं आपलं ठरलं होतं ना ? पण तु तर काहीच नाही लिहीलंस. मी वर्षभर तुझ्यात काहीतरी सुधारणा व्हावी म्हणून बारीकसारीक तपशील टिपून ठेवले. तुला वाचायला दिल्या पण तु मात्र काहीच लिहिले नाही.
नवरा मंद हसला आणि म्हणाला मला जे लिहायचे होते ना ते मी शेवटच्या पानावर लिहिले आहे. ते वाच….
बायकोने शेवटचे पान उघडलं,त्यात लिहिलेलं होते….
मी तुझ्या तोंडावर कितीही जरी तक्रारी केल्या तरी तु आजवर जो त्याग माझ्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आजवर केलास, इतक्या वर्षात जे अपरिमित प्रेम आजवर दिले आहेस त्या तुलनेत या डायरीत लिहावी अशी एकही कमतरता मला तुझ्यात आढळली नाही
तुझ्यात काहीच कमतरता नाही असं नाही परंतु तु केलेला त्याग, समर्पण, तुझं प्रेम या सगळ्यापेक्षाही खुप जास्त आहे. माझ्या अक्षम्य अगणित चुकांनंतरही तु माझ्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या छोट्या टप्प्यांवर माझी सावली बनून मला साथ दिलीस.आता माझ्याच सावलीत मला दोष तरी कसे दिसतील..?
आता रडण्याची वेळ बायकोची होती. तीने नव-याच्या हातातली स्वतःची डायरी खेचून घेतली आणि जाळून टाकली. त्यात आत्तापर्यंतचे सर्व रुसवेफुगवेही स्वाहा होऊन गेले. लग्नाच्या पंचवीस वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा- नवपरिणीत जोडप्याप्रमाणे प्रेम फुलु लागलं.
मंडळी, म्हटलं तर ही एक काल्पनिक गोष्ट. पत्नीच्या जागी पती किंवा पतीच्या जागी पत्नीही असू शकते. यातून एकच संदेश ध्यानात घ्यायचा तो म्हणजे, तारुण्याचा सुर्य अस्ताला निघाला की, एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा आपल्या जोडीदाराने आपल्यासाठी, घरादारासाठी, संसारासाठी कीती त्याग केला, किती गोष्टी मुद्दाम केल्या, किती गोष्टी सोडून दिल्या, किती प्रेम केलं तेच आठवायचं . क्षणोक्षणी जोडीदाराने कशी साथ दिली ते आठवायचं. बघा, ते पहिल्यासारखे प्रेम पुन्हा पल्लवित होतं की नाही….!
? ????
आवडले तर नक्की पुढे पाठवा.????
सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
.

