Skip to content

प्रत्येकाच्या वागण्यातून हल्ली ‘प्रवेश बंद’ च्या पाट्या दिसतात!

प्रवेश बंद….


योगिता कुलकर्णी


खुप वाईट वाटुन घेऊ नये हल्ली..
कुठल्याही गोष्टीचं….
वाटेत जो भेटेल तो आपला…..बोलला तर ठिक नाही बोलला तर रामराम… ?
सगळं आपल्या मनातलं हे वाटणं आहे ना ते गाठोडं बांधुन सोडुन यावं गंगेत…..

प्रेमळ लोकांचं खुप कठीण असतं जगात..
तुमचा प्रेमळपणा नंतर लोक ग्राह्य धरायला
लागतात.. तसं होण्याआधीच सावध व्हावं
आणि…. सावरावं स्वतःला…

जग असच होतं.. आहे आणि रहाणार…
नाना प्रकारची माणसं येतात जातात….
प्रत्येकाचा अनुभव वेगळा……
तुम्ही कसंही वागा लोक घालायचा तो गोंधळ घालणारच…..

फार वाईट वाटुन घेऊ नये…

कारण कुणाच्या तरी मनापर्यंत पोचायला त्या मनाची संवेदनशीलता तर जागृत हवी..
त्या मनाची दारं तर उघडी हवीत…..
हल्ली जशी घराची दारं सुरुंगा सारखी मजबुत तशी मनाचीही….. सगळी कडे एक अदृश्य पाटी…..
” प्रवेश बंद..”

आपण सगळं लहानपणा पासुन उलटच बघितलेलं…. घरात अति प्रेमळ माणसांचा सहवास…आणि ” माणसं महत्त्वाची”
ही शिकवण ठासुन शिकवलेली…

पण… बदललय ना हल्ली…
सगळंच बदललय…..
कोरडेपणाच वाहतो मनामनात…..

घरं सजलीत हजारो रुपयांच्या लाईट्स नी, शो पिसेस नी…. चकचकीत फर्निचर नी..
पण आयुष्य सजवणाऱ्या गोष्टी दाखवल्याच जात नाहीत…..जाणुनबुजुन.
मुलं बसतात घराचा एक कोपरा पकडुन..
मोबाईल मधे तोंड घालुन तिसरं माणुस नकोसं होतं त्यांना…
आपण बागडायचो आत्या, मावश्यांच्या,
आजीच्या अंगाखांद्यावर…..काय तो आनंद…..

पण हल्ली प्रवेश बंदच्या पाट्या सगळ्यांच्या हातात दिसतात….

आणि मग इच्छाच होत नाही…

कुणाला आपलं म्हणायची…..



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!