
मुलांच्या यशासाठी आईची भूमिका खूप महत्त्वाची असते.
एक मुलगी होती. विल्मा रुडॉल्फ नावाची. वेळेच्या आधी जन्माला आलेली एक मुलगी, वर्ष १९४०. जन्माच्या वेळचे वजन २ किलो. गरीब काळ्या कुटुंबात जन्मली.
लहानपणी तिला पोलिओ झाला. तिच्या आईला एका डॉक्टरने सांगितले, यावर काहीच इलाज नाही. पण एवढे ऐकून तिची आई गप्प बसेना.
विल्मा जुनी आठवण काढताना म्हणाली, डॉक्टर म्हणाले मी पुन्हा कधी चालू शकणार नाही. माझी आई म्हणाली मी नक्की चालेल. मी माझ्या आईवर विश्वास ठेवला. विल्माच्या आईला पत्ता लागला की तिच्या गावापासून ८० किलोमीटर अंतरावर एक दवाखाना आहे, जिथे तिच्यावर उपचार केला जाऊ शकतो.
विल्माची आई सलग दोन वर्ष आठवड्यात दोन वेळा मुलीला घेऊन त्या दवाखान्यात गेली. दोन वर्षाच्या उपचारानंतर विल्मा कुबड्यांच्या साह्याने चालायला लागली. अखेर वयाच्या बाराव्या वर्षी ती कुबड्यांशिवाय सामान्यपणे चालायला लागली.

वयाच्या सोळाव्या वर्षी १९५६ च्या ऑलिंपिक्स मध्ये तिने धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं.
१९६० च्या ऑलिम्पिकमध्ये धावण्याच्या शर्यतीत तिन सुवर्णपदके जिंकणारी ती अमेरिकेची पहिली स्त्री बनली.
एका आईने निर्माण केलेल्या विश्वासामुळे एक अशक्य अशी गोष्ट शक्य करून दाखवणारी विल्मा. धन्य तिची आई सलाम तिच्या इच्छाशक्तीला, तिच्या प्रयत्नाला!
यावरून मुलांच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी आईची भूमिका किती महत्त्वाची असते याची कल्पना आपणास नक्की आली असेल.
म्हणूनच पुन्हा पुन्हा पालकांना कळकळीने सांगावेसे वाटते की, हा पहिला सहा वर्षाचा काळ बालकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. तो एकदा गमावला की आयुष्यात परत हाती लागत नाही. मुलांची मने कोवळी असतात त्याला आकार सहज देता येतो.
संकलन – आपलं मानसशास्त्र
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !
