Skip to content

आयुष्यात सुखाचे ‘क्षण’ आणि दुःखाचे ‘दिवस’ येतच असतात!

आयुष्यात सुखाचे ‘क्षण’ आणि दुःखाचे ‘दिवस’ येतच असतात!


विक्रम इंगळे

18 जानेवारी 2020


माणसाच्या आयुष्यात सुखाचे ‘क्षण’ अणि दुःखाचे ‘दिवस’ ये- जा करत असतात. हे प्रसंग म्हणजे जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. कमी अधिक प्रमाणात अणि प्रखरतेने दोघेही एकमेकांच्या मागे पुढे चालत असतात. कधी आपण मस्त पणे सुखाचा उतार उतरत असतो तर कधी दुःखाचा चढ चढत असतो. उतार पटकन संपतो अणि चढ चढायला खूप वेळ लागतो. म्हणून आपल्याला वाटते की सुख कणभर अणि क्षणभर तर दुःखाचा काळ फार मोठा. अणि मनुष्य स्वभावाप्रमाणे आपण कष्टदायक काळ जास्त लक्षात ठेवतो. खरं म्हणजे कष्टदायक काळ हा एक शिकवण म्हणून लक्षात ठेवला पाहिजे. पण दुर्दैवाने जास्त लोक हा काळ रडगाणं गायला अणि सिंपथी गोळा करायला उपयोगी आणतात.

जत्रेत कधी फिरता पाळणा (जायंट व्हील) पाहिलंय! माणसाचं आयुष्य तसंच असावं बहुतेक. तुम्ही वर आहात, आकाश शिवणार असं वाटेपर्यंत खाली येता अणि आता किती वेळ ‘खालीच’ रहाव लागेल असा विचार असताना ‘वर’ जाता. हे खाली वर जाणं एका क्षणार्धात होतं. हा! मात्र तो क्षण केंव्हा येईल हे मात्र नक्की कुणालाच माहीत नसतं. त्याचा ना अंदाज बांधता येतो ना त्याचं काही गणित असतं.
‘खाली’ किंवा ‘वर’ लागणारा वेळ हा व्यक्ती सापेक्ष असतो. तुमच्या मानसिकतेवर हा वेळ छोटा किंवा मोठा वाटतो. तुम्ही कित्येक माणसं आयुष्याची पंचवीस पंचवीस वर्षे अस्तित्वासाठी लढताना पहिली असतिल तर कित्येक माणसं तेवढीच आयुष्यावर राज्य करताना पहिली असतिल. पण असा फरक का! काही उत्तर नाही. देणारे देतात, नशीब, पूर्व संचित, मागच्या जन्माची फळं (हे सगळे शब्द बहुतेक वेळा ‘दुःखी वस्तुस्थिती’ सांगण्यासाठी वापरतात) वगैरे. परिस्थिती जर सुखद असेल तर मग कष्ट साध्य, चांगलं भाग्य, पूर्व पुण्याई वगैरे वापरले जातात.

मला नेहमी काय वाटतं परिस्थिती ज्यावेळी अनुकूल नसेल त्यावेळी माणसाने खंबीरपणे दटून उभे राहिले पाहिजे अणि ती निवळु द्यावी. कारण आयुष्य चक्रानुसार प्रतिकूल परिस्थिती जाणार आहेच. ती काही कायमची मुक्कामाला नाही आली. प्रतिकूलतेला कणखरपणे तोंड दिलं की सगळं सुरळीत वाटतं. इथे मला स्वामी विवेकानंद यांचं वाक्य आठवतं, ‘द बेस्ट वे टू अव्हाईड डिफिकल्टी इज टू गो थ्रु इट’. अत्यंत सुंदर आहे. प्रतिकूल आहे म्हणून बाऊ करत बसलो तर परिस्थिती आणखीनच त्रासदायक/कष्टदायक वाटते. पेक्षा आहे ती परिस्थिती स्विकारून तिला आनंदाने तोंड/लढा दिला तर ती अवस्था कमी प्रमाणात मानसिक त्रास देते.
माझं स्पष्ट मत बनतेय की प्रतिकूल परिस्थितीत तुमचा संयम टेस्ट केला जातो. जेवढे आपण शांत, संयमी अणि डोक्याने विचार करतो तेवढे छान पैकी तरून जातो.

कधीकधी मनावर संकटाचे ढग जमा होतात. मळभ दाटून येतं. पण त्या ढगांमधून सूर्य प्रकाशाचा किरण येत असतो. त्याच्याकडे लक्ष ठेवलं की मळभ दूर होतं.
नसेल तर इतकं खंबीर व्हायचं की आपल्याला हे ढग हे मळभ छेदून प्रकाशाकडे झेपवता आलं पाहिजे. सगळे मनाचे खेळ आहेत ना!
आपण लहानपणापासून ऐकतोय, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. पण होतं काय, यश मिळाल्यावर माणूस एवढा हुरळून जातो की अपयशातुन काही शिकायचे असते, हे विसरून जातो.
शेवटी काय! तर तुमचे कष्ट, तुमची जिद्द, तुमची चिकाटी हाच यशाकडे जाण्याचा मार्ग. ह्याच गोष्टी तुम्हाला सोन्याचे दिवस दाखवणार

आपल्या मनातला/डोक्यातला मोठा अडथळा म्हणजे लोक काय म्हणतील हा विचार. विशेषतः काहीतरी नवीन करताना, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहताना हा विचार तुमच्या मनात कोंबला जातो. तुम्हाला असं काही वाटत नाही पण आजूबाजूचे इतकी भीती दाखवतात की नकळत तुमच्याही मनात शंका यायला लागते.
पण मला वाटतं की हेतू जर चांगला असेल अणि स्वतःवर विश्वास असेल तर आपल्या मतावर ठाम रहावं. मान्य! हजारात थोडेच यशस्वी होतात पण आपण लाखातले मोजके होऊ जे अपयशाने खचून न जाता परत प्रयत्न करतात. धुळीत पडलो म्हणून काय झालं! आपण फर्श से अर्श पर जाऊ.

लक्षात घेऊ की

जो भी तुमने हासील किया है वो तेरी मेहनत से है बंदेयकिन रख अपने आप पर आखिर सफलता तेरी है बंदे ।।



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!