Skip to content

सुखी असण्यापेक्षा समाधानी असणे केव्हाही उत्तम व वास्तव!

समाधान म्हणजे काय ??


गौरव पाठक


आपल्या मागची पिढी म्हणजे अंदाजे २०-२५ वर्षे मागे.खूप सुखी आणि समाधानी लोक होती.

त्यांच्या मूलभूत गरजा आणि त्यांचे विश्व लहान जरी असले तरी नशीबवानच म्हणावे लागेल.

पहाटे लवकर उठावे आणि नित्य नेम न चुकावे असेच काहीसे.म्हणजे शेती असेल तर शेती किंवा इतर व्यवसाय धंदा करावा पण कोणाशी स्पर्धा नव्हती.घरे मोठी होती,नातेवाइकांची ये जा होती,अंगण मोठी होती,माणसाची मने मोठी होती

तिन्हीसांजेला घरातली सर्व व्यक्ती घरात दिसणार.चुलीजवळ स्वयंपाकाची लगबग. घरातल्या देव्हाऱ्यात आणि अंगणातल्या तुळशीजवळ तेवणारा मंद दिवा.शुभंकरोती ची इतर स्रोताचे पठण.घरातली आदरणीय व्यक्ती ने धाकात बसवलेली लावलेली वळणे.मोठ्यांचा लहानांनी केलेला आदर.उलटे बोलणे लांबची गोष्ट. tv दुर्मिळ त्यामुळे एकत्रित जेवताना होणारे संवाद.घरात विश्वासू लोकांची येणे जाणे.त्यामुळे जोडलेली चार माणसे कधीही वेळेला उपयोगी येणारे.

पारावर चावडीवर रंगलेल्या गप्पांच्या मैफिली.मॅट्रिक शिक्षण म्हणजे पुष्कळ आणि केलाच तर I T I. त्यातून सहज मिळालेली नोकरी मग खाजगी असो वा सरकारी.Strugle हा प्रकार खूप कमी.योग्य वयात होणारी लग्न.

मोबाइल नव्हते त्यामुळे संवाद जास्त होते(आजही या पिढीला मोबाईल नीट हाताळता येत नाही आणि मला बाबा त्यातले जास्त काही कळत नाही यावरून खरेच विशेष वाटते.आणि त्याची त्यांना अजिबात खंत नसते.कधी मोबाईल वर कोणाशी बोलताना पण खूप मोठ्या आवाजात बोलणार?)

सण उत्सव सम्पूर्ण गाव एकत्र येऊन साजरा करणार.सुखा दुःखात धावून जाणार.पोस्टमन दारात दिसला की टेन्शन घेणारे.कारण काय ऐकायला मिळेल याची भीती.

मैदानी खेळ न खेळणारा क्वचित असेल.त्याची मज्जा मोबाईल गेम मध्ये काय मिळणार??

सूर पारंब्या, कब्बडी,कोणतीही फी न भरता विहिरी-तलावात मनसोक्त पोहणे,तालमीत जाऊन व्यायाम करणे,अनेक प्रकारचे खेळ त्यामुळे मनसोक्त बालपण जगले,गाड्या मोजक्या असल्याने सायकलिंग,चालणे(जे आज जिममध्ये विकत करावे लागते)बैलगाडीतला मजेशीर प्रवास

कधी सर्दी पडसे झाले की आजीबाईचा बटवा होताच. मेडिक्लेम तसलं काही माहिती नव्हतं.एकंदरीतच स्वच्छ हवा,ताजे आणि सकस आहार सोबतीला रानमेवा,हायब्रीड फळे भाजीपाला नव्हता.निरोगी आणि भरपूर आयुष्य.

????????☘️????️
?????????????
???️??????

आज चे चित्र किती उलट झालेय.

इंजिनीअर कॉमन झालाय,अनेक पदव्या पडून आहेत,सरकारी लांबच खाजगी नोकरी मिळणे कठीण झालेय,strugle आणि उशिरा होणारे लग्न.सोबतीला हा पुढे गेला त्याने ते केले म्हणून होणारी ईर्षा.भले लठ्ठ पगाराची नोकरी मिळालीच तरदिवस वैताग वाडीत कधी उजाडतो आणि कधी रात्री उशिरा ते पण दोन तीन वाजता कधी चहा पिऊन तर कधी दारू पिऊन संपतो कळत नाही. अनेक सोयी सुविधा आहेत पण समाधान नाही.????️?????????????

शहरे गच्च भरलीत. पण माणुसकी संपलीय.

घरे मोठी आहेत पण घरात माणसे कमी

फास्ट फूड खातोय पण आयुष्य कमी झालेय.

दवाखाने गच्च भरलेत

उच्च शिक्षण झालेय पण नोकरी नाही

नोकरी मिळालीच तर जॉब सुटायची रोज टांगती तलवार

खिशात पैसा आहे पण समाधान नाही

LED,Laptop,Android Mob अनेक तंत्रज्ञान आले पण ऑफिस मध्ये शेजारचा साधा जेवलास का?हे सुद्धा विचारायला वेळ नाही.

शुभेच्छा,आमंत्रण मेसेज मधूनच देतोय पण समोरचा कोणत्या मनस्थितीत आहे समाजनारच नाही कारण संवाद संपलाय

लग्न करणे म्हणजे परीक्षा आहे आणि नाती टिकविणे त्याहून कठीण.

पैशात नकळत तोलायची सवय लागल्याने पैसा हेच अंतिम ध्येय बनलेय पण त्या नादात साधी पण महत्वाची नातीच ओळखता नाही आली

लग्न होते,दोघे कमावते झाले
बँक बॅलन्स च्या नादात कुटुंब नियोजनाचे बॅलन्स ढासळले.

चांगली नोकरी मिळाली,पण ती टिकविण्यासाठी वेगळी धडपड,

पैसा आलाही पण त्या नादात कुटुंबाकडे लक्ष कमी,त्यातून वाद,संशय,नैराश्य,घटस्फोट आणि आत्महत्या

तिन्हीसांजेला दिवा लांबच,कारण त्यावेळी एकतर जॉब वर किंवा सुट्टीच्या दिवशी मॉल मध्ये

एकत्र कुटुंब लांबच आहे ते आई बाबा पण नको,आपण दोघे राजाराणी
मग काय लहान मुले पाळणा घरात

मुलांच्या गरजा पैशात निभावल्या
पण वात्सल्याचे प्रेम विकत कुठं मिळते?

एक्कल कोंडी मुले लहानाची मोठी कधी झाली कळत नाही
पण ती चिडचिड करतात ही तक्रार येऊ लागली

त्यात मुलांचे करिअर,महागडे शिक्षण,वाढती व्यसनता,महागाई,उशीरा होणारे लग्न

खरंच पूर्वीची पिढी खूप सुखी होती
कारण तिथे ना स्पर्धा होती,ना दिखावा होता.??
कदाचित हीच #समाधानाची #व्याख्या #असावी??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!