Skip to content

‘राग व अहंकार’ हे आपलं फार मोठं नुकसान करताहेत!!

चुक कोणाची ??


अहंकार आणि राग हा माणसाचा खरच मोठा शत्रु आहे . तो आपल्याकडुन काय हिसकाउन घेउन जाईल सांगता येत नाही.

थोडा अहंकार आणि राग आपल्यापासुन लांब करता येतो का बघा ना ..

निलम आणि सुरज . दोघेही एकमेकांवर मनापासुन खुप प्रेम करणारे. एवढ की घरी सांगितल तर होतच पण आता फक्त लग्न करायच राहिल होत. कधी काय काय करायच हे सर्व ठरवल होत त्य़ांनी . त्य़ाने सुद्धा घरी सांगितले होते. पण नियतीला काहीतरी वेगळेच हवे होते.
त्या दिवशी त्यांच्यात काही वाद झाला होता….. वादाच रुपांतर भांडणात आणि नंतर ब्रेक अप मध्ये झाल…एकमेकांना एवढा जीव लावणारे ते दोघे वेगवेगळे झाले …कीती दिवस, कीती महिने सांगता नाही येणार….पण जेव्हा ब्रेक अप झाल तेव्हा त्याने त्यांच नात एका भांडणामुळे कींबहुना कोणीतरी तिसऱ्याच्या सांगण्यावरुन तुटु नये म्हणुन अतोनात प्रयत्न केले…इतके की बस त्याला आता रोडरोमियो च रुप यायच बाकी होत.

पण तरी तो त्यांच नात टीकाव म्हणुन वेड्यासारखा प्रयत्न करत होता. कारण दोघांनी सुद्धा एकमेकांवर खुप प्रेम आणि एकमेंकांना जीव लावला होता. पण त्या भांडणाचा फायदा कोणी तिसरा व्यक्ती घेतो आणि ते नात तोडायला किंवा तिकडेच थांबायला तिच ब्रेन वाँश करतो. आणि ती सुद्धा काहीच विचार न करता नात तोडायचा विचार करते आणि तोडते. तिला माहित होत की तो आपल्यावर कीती प्रेम करतो ते पण तरी सुद्धा तिने नात तोडल.

कारण ही तसच होते ना त्या मुर्खाने सुद्धा तिच्यावर हात उचलला होता तिला खुप वेळा दुाखावल होत. तिच्याकडुन तो दुखावला गेला आहे…गेला तर तो कसा आणि कीती वेळा याची बेरीज नको.

पण त्याच्याकडुन ती मोठ्या प्रमाणात दुखावली गेली होती. तिच्यावर त्याने हात उचलला होता, त्याला कारण हे होते की काहीश्या कारणावरुन त्यांच्यात थोडीशी भांडण झाली पण जेव्हा जेव्हा त्यांच्या मध्ये भाडंण होत होती तेव्हा ते रोजच्या ठिकाणी भेटुन ती सोडवुन शेवट गोड करत होते. पण त्या दिवशी ठरवले काही वेगळ आणि झाले काही वेगळच. आपल्यात भांडण झाली म्हणुन त्याने तिला एक गिफ्ट घ्याव, आणि तिला देताना तिच्या चेहऱ्य़ावरील त्याला तिचा आनंद बघायचा होता. नेहमीच्या वेळेप्रमाणे तो तिथे पोहचला तिने त्याला फोन ही केला. पण त्याने थोड मज्जाक मज्जाक मध्ये जास्तच केल आणि बोलुन गेला.

समोरुन
ती – भेटायच आहे ना
तो – कशाला आणि काय गरज आहे, मला नाही तुला भेटायच
ती – बघ हा मी परत येणार नाही,
तो – बाय

आणि फोन कट होतो..ह्याने रागात केलेली मस्करी त्यालाच भोगायला येणार आहे हे त्याला माहित नव्हत आणि शेवटी तेच झाल. खुप वेळ झाला ती आली नाही, पाउस सुरु झाला तो आणि त्याने आणलेले गिफ्ट दोघेही भिजु लागले.

बस स्टाँप चा आधार होता, पण पाउस वारा एवढा जोरदार होता की पुर्ण पावसाचे पाणी बस स्टाँप च्या आतमध्ये येत होत. गाडीपर्यंत जाउन गिफ्ट गाडीत ठेवण्यासारखी ही सोय नव्हती. शेवटी भिजला तो वाऱ्यामुळे त्याला थंडी वाजु लागली. तेवढ्या पुर्ण वेळेत त्याने तिला बरेच फोन केले पण तिने त्याचे फोन नाही उचलले. अर्थात तिने त्याला ब्लाँक केले होते. हा फोन करुन पावसात भिजुन वैतागुन गेला आणि तिच्यासाठी आणलेले गिफ्ट भिजण्याची भिती. शेवटी त्याने त्यांच्या दोघांच्या काँमन एका मित्राला त्याने काँल केला आणि तिला काँल करुन काँन्फरेन्स वर घ्यायला सांगितले. तेव्हा तिने त्या मित्राचा फोन उचलला. तो तीची वाट बघत भिजत उभा होता आणि ती मात्र घरी निघुन गेली होती.

भिजुन गेलेला तो प्रचंड रागवला खुपच जास्त आणि तिला फोनवरच शिव्या घालुन मोकळा झाला. तिने फोन कट केला. नंतर ह्याने परत तिला फोन केला तेव्हा मात्र तिने त्याचा फोन उचलला आणि आताच्या आता तुझ्या बिल्डींग खाली ये अस सांगुन तो तिच्या बिल्डिंग खाली गेला. ती आली प्रश्न उत्तरे होता होता ती काही तरी उलट बोलुन गेली आणि रागावलेला तो आणखी रागवुन त्याने तिच्या कानशिलात लगावली. एक नाही दोन नाही तर तीन. आणि परत कधी तोंड दाखवु नकोस असे बोलुन निघुन गेला.

पण नंतर घरी पोहचल्यावर, राग शांत झाल्यावर त्याला त्याच्या कृत्याच वाईट वाटल आणि आपण रागाच्या भरात चुक केली हे समजल. त्याने लगेचच तिला फोन केले पण फोन काही लागला नाही. व्हाट्स अँप वर ब्लाँक केले . शेवटी त्याने तिला मेसेज करुन झालेल्या चुकीची मनापासुन माफी मागितली . पण काहीच झाले नाही.
त्याला त्याची चुक समजली होती. ती त्याला नेहमी बोलयची की आई बाबा नंतर मी तुलाच माझ सर्व मानल आहे आणि मग तोच असा वागणार मग तिच्या मनाला ते कीती वाईट वाटणार..

आणि ही सर्व घटना तिने तिच्या दोन मैत्रिणींना सांगितली. आणि मग तिच्या मैत्रिणी तिला तु भेटायचा नाही तिला रिलेशन ठेवायला फोर्स करायच नाही नाहीतर बघ आम्ही काय करु अश्या धमक्या त्याला द्यायला लागल्या.

एका प्रतिष्ठीत कंपनीत आणि चांगल्या हुद्यावर काम करणारा तो घाबरला. पण तरी सुद्धा त्याच प्रेम तिला भेटण्यासाठी तिची माफी मागण्यासाठी जिवाच्या आकांताने प्रयत्न करत होता. पण सर्व निष्फळ ठरले.

खुप विनवण्या केल्या, भिक मागितली आपल्या आठवणी आपण एकमेकांवर केलेल प्रेम कस विसरायच हे सर्व त्याला खुप रडवत होत. मनाने आणि शरीराने ते खुप जवळ आले होते. तरी तो तिला सोडुन द्यायचा हा विचार त्य़ाच्या कधीच मनात येत नव्हता. पण तरी सुद्धा तिने ते नात तोडल. दोघांचा एकमेकांवर स्वत पेक्षा जास्त विश्वास अविश्वासाला त्यांच्या दोघांमध्ये जागा नव्हतीच. एवढा जीव लावणारे ते दोघे वेगळे झाले त्या आठवणी, घरी सांगुन केलेल प्रेम आणि भावी आयुष्य रंगवलेल्या त्य़ा आठवणी सर्वच संपल होते …

पण कोणामुळे संपल होत ? तिने तिच्या मैत्रिणींच्य़ा सांगण्यावरुन घेतलेल्या निर्णयामुळे. त्याच्या रागामुळे ?

कोणाची चुक ?? त्या दोघांच्या अहंकाराची? की त्यांच्या दोघांच्या प्रेमात आलेल्या तिच्या त्या दोन मैत्रिणींची ज्या तिच्या सोबत एकत्र एकाच घरात रहायच्या ?

शेवटी प्रेम त्या दोंघाच होत. पण त्यांच्या गोड प्रेमाचा शेवट कोणी केला ?

म्हणुन रागवावे कीती,? नाते मग तो कोणतेही असो आई- बाबा, भाउ -बहीण, नवरा- बायको , प्रियकर- प्रेयसी , मित्र- मैत्रिण , अगदी कोणतही. पण आपण रागात कोणाला काहीतरी बोलुन आपल्या जीवाभावाच्या माणसाला कीती दुखावतो. अहांकारात आणि इतरांच्या सांगण्यावरुन दिशा बदलुन काय करतो हे लक्षात घ्यायला हवे. कारण नात आपल आहे, प्रेम, भावना , आपल्या आहेत. कोणा इतर व्यक्तीच्या सांगण्यावरुन आपण आपल्या नात्याचा निर्णय घ्यावा का हे सुद्ध तितकेच महत्तवाच. राग हा क्षणाचा असतो ना ? पण ते नात आणि आयुष्यभरासाठी दिलेली साथ ही कायमची असते.

खरच राग, अहंकार आणि इतरांच्य़ा वाईट विचांरापासुन लांबच गेलेल बर नाही का ?


टीप – सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेखन आणि सेवा वाचकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे.

वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!