Skip to content

अहंकारी व्यक्ती आणि अभिमानी व्यक्ती यामधला फरक!

अभिमान जरूर बाळगा, पण यशामुळे अहंकारी होऊ नका.


आपण जेव्हा एखादे काम पूर्ण करतो, एखादे यश मिळवतो, तेव्हा आपला आनंद गगनात मावेनासा होतो. आपण म्हणू लागतो की हे काम फक्त मीच करू शकतो.आपण हे लक्षात घेतले पाहिजे की यशाबद्दल अभिमान बाळगणे व यशामुळे अहंकारी बनणे यात फार मोठा फरक आहे. जर आपण काही प्राप्त केले असेल तर त्याबद्दल अभिमान वाटणे सहाजिकच आहे. स्वतःच्या यशाबद्दल अभिमान वाटणे हे नैसर्गिकच आहे. परंतु आपण त्याबद्दल अहंकार बाळगणे चुकीचे आहे. तसे पाहिले तर एका अर्थाने अभिमान बाळगणे व अहंकारी बनणे यात फारच थोडा फरक आहे.परंतु हा थोडासा फरक ही आपले पूर्ण विश्व बदलून टाकण्यासाठी सक्षम असतो. आपण जेव्हा अभिमान बाळगतो तेव्हा आपण आखडू बनत नाही उलट तेव्हाही आपल्यातील माणुसकी शिल्लक असते. परंतु ज्या क्षणी आपण अभिमानाची सीमारेषा ओलांडून अहंकारी वृत्तीकडे वाटचाल करतो तेव्हा आपल्यामधील माणुसकीचा पहिला बळी जातो.आपण जेव्हा अभिमान बाळगतो तेव्हा आपण इतरांना आपल्या वर्तुळात जागा देण्यासाठी तयार असतो. परंतु जेव्हा आपण अहंकारी बनतो तेव्हा मात्र आपण इतरांना आपल्या वर्तुळात प्रवेश करण्यासाठी मनाई करू लागतो. तेव्हा आपल्याला आपल्या पेक्षा इतर लोक तूच्छ वाटत असतात. परंतु असे करण्याने आपल्या जीवनातील प्रगतीचा मार्ग आपण स्वतःच्या हाताने रोखत असतो. एक वेळा अभिमान बाळगणे ठीक आहे. अभिमान बाळगल्याने आपल्या प्रगतीचा वेग मंदावत नाही, परंतु अहंकार केल्याने मात्र हा वेग जरूर रोखला जातो.याच कारणाने जेव्हा आपण अहंकारी बनतो तेव्हा आपण आपले संतुलन, विवेकबुद्धी हरवून बसलो आणि तरीही तसे कबूल करायला मात्र तयार होत नाही. अभिमान बाळगल्याने आपले पाय जमिनीवरच राहतात परंतु अहंकारी बनल्याने मात्र आपले जमिनीशी असणारे नाते तुटते.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!