Skip to content

न घाबरता रोखठोक लोकांसमोर कसं बोलायचं??

न घाबरता रोखठोक लोकांसमोर कसं बोलायचं??


रोखठोक आपलं मत मांडणं ही आजच्या काळाची खरी गरज आहे. पुष्कळ वेळेस नेमकं बोलायचं कसं, याबद्दलचा अतिविचार छळत राहतो. त्यामुळे आपल्याला काही मत नाही, अशी लेबलं चिपकवली जातात किंवा व्यवस्थित बोलता न आल्याने त्यातला नेमकेपणा समोरच्यापर्यंत पोहोचू शकत नाही.

म्हणून स्वतःला कमी लेखणे, आत्मविश्वासाचा अभाव, शरणागती पत्करणे, आतल्या आत घोकंपट्टी करणे, आपल्यापेक्षा हळव्या व्यक्तींपुढे मोठेपणा मिरवणे अशी लक्षणे आपल्यात आढळून येतात.

हे सर्व टाळण्यासाठी आत्ताच रोखठोक कसं बोलायचं हे शिकून घेऊया. खाली काही Exercise दिलेले आहेत…

असा करा अभ्यास.

जर तुम्ही लोकांसमोर बोलण्यासाठी घाबरत असाल आणि या कारणाने संधीपासून वंचित राहत असाल तर तुम्हाला तुमच्या समस्येवर काम करावे लागेल त्यासाठी छोटेमोठे प्रयत्नही उपयोगी ठरू शकतात.

लिहा आणि बोला.

एका डायरीत लहान लहान वाक्य लिहा. त्यांना आधी एकट्याने बोलण्याचा प्रयत्न करा. हळूहळू घरातील लोकांसमोर बोलणे सुरु करा. नंतर मित्रांमध्ये बोला. हा अभ्यास सातत्याने करा.

बोलणे रेकॉर्ड करा व ऐका.

आपल्या बोलण्याला रेकॉर्ड करा. आजकाल प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्मार्टफोन असतो. काही बोलताना रेकॉर्डर ऑन करा. तुम्ही कोणतेही पुस्तक किंवा वर्तमानपत्र यातील भाग वाचू शकता. सुरुवातीला एक मिनिट बोला, रेकॉर्ड करा व नंतर आपला आवाज ऐका. जर आवाजात कंपने ऐकायला मिळाली किंवा असे वाटले की काही अडकत आहे तर हाच अभ्यास तोपर्यंत परत परत करा जोपर्यंत तुमचा आवाज चांगल्याप्रकारे ऐकायला येणार नाही.

आरशासमोर उभे राहून बोला.

काही वाक्य आठवा आणि आरशासमोर उभे राहून बोलण्याचा प्रयत्न करा. विसरला तर पुन्हा दुसऱ्यांदा आठवा. येथे कोणाच्या पसंतीची किंवा नापसंतीची भीती नसेल. तसेच कोणी तुमच्याविषयी मत बनवणार नसते. त्यामुळे तुम्हाला स्वतंत्र वाटेल. केवळ बोलण्यातच प्राविण्य मिळेल असे नाही, तर व्यक्तिमत्व विकासातही हा उपाय परिणामकारक ठरतो याप्रकारे तुम्ही आपले सादरीकरण आणि देहबोली यांच्यावरही काम केले जाऊ शकते.

व्हिडिओ तयार करा.

मिरर प्रॅक्टिस आणि रेकॉर्डिंगच्या नंतर आता वेळ आहे व्हिडिओ बनवण्याचे. एका पेपरवर काही वाक्य लिहा आणि नंतर मोबाईलचा व्हिडिओ कॅमेरा सेट करा. याच्यात घरातील कोणाही व्यक्तीची किंवा लहान भाऊ बहिणीची मदत घेऊ शकता. हे आवश्यक नाही की मोठा पॅरेग्राफ वाचावा. चार-पाच होळीच वाचा. व्हिडीओ कॅमेरा ऑफ करा व क्लिप ला पहा. यामुळे तुम्हाला समजेल की समस्या कोठून येत आहे. समस्येला सुधारण्याचा प्रयत्न करा.

जवळच्यांसमोर बोला

त्या लोकांसमोर बोलण्याचा अभ्यास करा ज्यांच्याबरोबर तुम्ही सहजपणे वागू शकता. आई-वडील, भाऊ-बहीण किंवा मित्रांसमोर वीणा अडखळता काही ओळी बोला. त्यांची प्रतिक्रिया ऐका आणि ते ज्या सूचना देतील त्यावर लक्ष द्या. सुधारणा याविषयी त्यांच्याशी चर्चा करा.

ही Exercise रोज नित्यनेमाने केल्यास याची पूर्ण हमी आहे की आजच्यापेक्षा तुम्ही सकारात्मकरित्या बरेच पुढे गेलेला असाल.

करून बघा!


संकलन – आपलं मानसशास्त्र



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजचे अपडेट मिळवण्यासाठी!

Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी

Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!