Skip to content

हा लेख तुम्हाला दैनंदिन जीवनातील काही प्रश्नांची उत्तरे मिळवून देईल!

हा लेख तुम्हाला दैनंदिन जीवनातील काही प्रश्नांची उत्तरे मिळवून देईल!


माझं डोकं दुखत होतं. मी औषधांच्या दुकानात गेलो. दुकानात नोकर होता, त्याने मला एक गोळ्यांची पट्टी दिली, ४ दिवस सकाळ संध्याकाळ घ्या – म्हणाला ! मी त्याला विचारले मालक कुठं आहेत ? तो म्हणाला मालकांचं डोकं दुखतंय् म्हणून ते कॉफी प्यायला गेलेत !! मी माझ्या हातातल्या गोळ्यांची पट्टी बघतच राहिलो….

माझ्या आईचं बीपी आणि साखर वाढली होती, म्हणून सकाळी मी तिला आमच्या फॅमिली डॉक्टरकडे नेलं. योग आणि व्यायाम करीत असलेले डॉ. मला सुमारे ४५ मिनीटांनी भेटले. डॉक्टर त्यांचे लिंबू पाणी बाटलीत घेऊन क्लिनिकमध्ये आले आणि माझ्या आईची तपासणी करण्यास सुरवात केली. त्याने माझ्या आईला सांगितले की तिची औषधे वाढवावी लागतील आणि त्यांनी एका प्रिस्क्रिप्शनवर सुमारे १० औषधांची नावे लिहिली. आईला त्यांनी नियमितपणे औषधे घेण्याची सूचना केली. नंतर मी डॉक्टरांना कुतुहल म्हणून विचारले की ते नियमितपणे योगासने वगैरे करतात काय ?
डॉ. म्हणाले की ते गेली १५ वर्षे योगासने, प्राणायाम करीत आहेत आणि निरोगी आयुष्य जगत आहेत !! मी माझ्या हातात आईच्या प्रिस्क्रिप्शनकडे पहात होतो, ज्यामध्ये बीपी आणि साखर कमी करण्यासाठी डॉक्टरांनी अनेक औषधे लिहून दिली होती…

एके दिवशी मी माझ्या पत्नीबरोबर होतो आणि ब्युटी पार्लरच्या वेटींगरूम मधे बसलो होतो. तिचे केस अतिशय रुक्ष झाल्याने माझ्या पत्नीला केसांसाठी ट्रिटमेंट घ्यायची होती. रिसेप्शनमध्ये बसलेल्या मुलीने तिला बरेच पॅकेजेस आणि त्यांचे फायदे सांगितले. हे पॅकेजेस रू .१०००/- पासून ते रू.३०००/- पर्यंत होते आणि काही सूट दिल्यानंतर तिने माझ्या पत्नीला २४०० / – रुपयांमध्ये ३००० / – चे पॅकेज दिले. केसांच्या उपचाराच्या वेळी, माझ्या पत्नीवर उपचार करणार्‍या महिलेच्या केसांचा एक वेगळा सुगंध तिच्या केसातून जाणवला. मी तिला विचारलं की हा वास कशाचा येतोय्.. तिने सांगितले की तीने खोबरेल तेलात कापूर मिसळून वापरल्याने तिचे केस मऊ होतात.. माझी पत्नी २४००/ – रुपयांमध्ये केस चांगले बनवण्यासाठी आली होती..

माझा श्रीमंत चुलत भावाचा जर्सि गायींचा मोठा गोठा आहे. मी त्याच्या शेतावर गेलो होतो. शेतावर जवळच्या गोठ्यात जवळपास १०० विदेशी गायी असून त्यांचे दूध काढणे वगैरे सगळे संगणकीय मशीनद्वारे चालले होते. पलिकडे वेगळ्या भागात २ देशी गीर गायी हिरवा चारा खात होती. या गायी कोणासाठी आहेत? असे विचारले असता तो म्हणाला की विदेशी गायींचे दूध हा माझा व्यवसाय आहे.आणि घरी दोन देशी गायींचे दूध, दही आणि तूप आम्ही वापरतो.!
आणि मी.. सर्वात चांगले ब्रँडेड दूध घेण्यासाठी तिथे आलो होतो..

आम्ही एका प्रसिद्ध रेस्टॉरेंटमध्ये जेवायला गेलो जे खास थाळी आणि शुद्ध अन्नासाठी प्रसिद्ध आहे. निघताना मॅनेजरने मला अतिशय विनम्रपणे विचारले, सर, जेवणाची चव कशी वाटली, आपण शुद्ध तूप, तेल आणि मसाले वापरतो.आम्ही अगदी घरच्या सारखं जेवण बनवतो. जेव्हा मी जेवणाचे कौतुक केले तेव्हा त्याने मला त्याच्या व्हिजिटिंग कार्ड देण्यासाठी त्याच्या केबिनमध्ये नेले. काउंटरवर 3 बॉक्सचे स्टील टिफिन ठेवले होते. तितक्यात् एक वेटर तिथे आला आणि दुसर्‍याला म्हणाला “सुनील सरांचे भोजन केबिनमध्ये ठेवा, ते नंतर जेवतील”.
मी वेटरला विचारले- सुनील इथे खात नाही का? त्याने उत्तर दिले- “सुनील सर कधी बाहेर खात नाहीत, त्यांच्यासाठी घरुन जेवण येतं.”. मी माझ्या हातात असलेले 1670 / – रुपयांचे बिल पहातच राहिलो…

ही काही उदाहरणे आहेत..

ज्यामुळे मला समजले की बर्‍याचदा आपल्याला विकल्या जाणाऱ्या वस्तू विक्रेते स्वत: वापरत नाहीत.. आणि आपण मात्र त्यांच्या उत्पादनासाठी आणि सेवांसाठी भरमसाठ किंमत मोजतो.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजचे अपडेट मिळवण्यासाठी!

Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी

Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!