
मुलं ही आई – वडिलांचा आरसा असतात.
हे वाक्य दिसतंय तितकं सरळ नाहीय. आई – वडिलांनी केलेले संस्कार हे मुलांमध्ये दिसतात. त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून त्यांच्या प्रत्येक कृतीतून ते दिसत असतात. ते बोलतात नां, सूनेची काही चूक झाली तर दोष आई – वडिलांना दिला जातो. शाळेत, कॉलेजमध्ये, समाजा समोर जर मुलांकडून एखादं चुकीच कृत्य घडलं तर दोष आई – वडिलांना दिला जातो. ज्या प्रमाणे एखाद्या प्रौढ व्यक्ती कडून जर काही चूक घडली तर ती व्यक्ती ज्या देवाला पुजत असेल, उदा. एखाद्या बाबांना, तर दोष हां त्या देवाला दिला जातो त्या व्यक्तीला नाही.
त्यामुळे आई – वडिलांची देखील जबाबदारी असते कि, शक्य तितकं मुलांना वेळ देणे, उत्तम संस्कार करणे, चुकेल तिथे शिक्षा करणे. मुलं ही अगदी बालवाडीत असल्या पासून ते पाचवीला जाईपर्यंत त्यांच्यावर उत्तम संस्कारांसोबत जर त्याचं काही चुकलं तर त्यांना त्यांची चूक समजेल अशी शिक्षा देखील करावी, त्यांच्या शिक्षा लक्षात नाही रहात मात्र पुन्हा चूक देखील नाही घडत. वेळप्रसंगी फटका देखील बसतो मुलांच्या. मुलं लहान असल्याने, हातावर, पायावर, किंवा गालावर त्यांना सहन होईल या अंदाजानेच मारावे. आत्ता केलेली शिक्षा मुलं लक्षात नाही ठेवत. मात्र, संस्कार नक्की घडतात.
ती जेव्हा सहावीत जातात. इथून पुढे फक्त आणि फक्त उपदेशाचे डोसच कामी येतात. अगदी दहावी पर्यंत. या वयात चुकुनही मुलांवर हात उचलू नये. कायमच लक्षात ठेवतात. तसंही हे वय त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याचं असतं. पाचवीत असतांनाच त्यांच्यातील कलागुण दिसून येतात. ही गोष्ट आई – वडीलच हेरु शकतात. कारण, शाळेतील शिक्षकांच्या ताब्यात मुलं ही मोजून २० मिनिटांसाठीच असतात. आणि, हजारो मुलांच्या अंगात हजारो गुण असू शकतात. तेव्हा प्रत्येक पालकाची जबाबदारी असते कि त्यांनी आपल्या पाल्यात काय कलागुण आहेत ते हेरून काढावे. पाचवी नंतर, त्याला ज्या गोष्टीची आवड आहे. त्या क्षेत्राचे जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.
कलागुणांशी संबंधित अनेक विषय शाळेत शिकविले जातात. मात्र, त्याला ज्यात रस आहे. अगदी मंत्रमुग्ध होऊन तो ती गोष्ट करतो तेच त्याचे ज्ञान त्याला जास्त देऊन इतर दैनंदिन जीवनात गरजेचे असणारे विषय शिकविले जावे. अशा वेळी पाल्य स्वतःहून अभ्यासात रस घेणार. घरातल्यांचे ऐकणार. शिक्षकांचे ऐकणार. एक नवीन आणि तज्ञ पिढी जन्म घेईल.
असा उत्तम संस्कार असणारा पाल्य जेव्हां समाजासमोर उभा राहील, तेव्हा तो अगदी कमीतकमी शब्दातच त्याच्यावर झालेल्या उत्तम संस्काराचेच धडे वाचून दाखवेल. त्यातूनच त्याला ज्या कुंभाराने घडविले त्याचे गुणगान समाज गाण्यास सुरुवात करेल. कारण, ज्या प्रमाणे मुलगा किंवा मुलगी चुकली तर आई – वडिलांस बोल लावले जातात, अगदी त्याच प्रमाणे. त्यांनी अभिमानास्पद कृती केली तर, त्यांना घडविणाऱ्या पालकांचे कौतुक केले जाते.
मुळात पालकांचेच वर्तन चुकीचे असेल तर पाल्याला देखील बोलून काहीच पायदा होत नाही. कोणतीही वाईट सवय ही शक्यतो घरातूनच लागते. मुळात मुल चुकण्यामागे घरातल्यांना जबाबदार धरलं जातं.
लैंगिक शिक्षणाच्या बाबतीत देखील हेच होतं. मुळात ह्या संदर्भातील प्रश्न घरात विचारलाच तर हजारात एक घर असं मिळत जे लैंगिक शिक्षणा बद्दल मुलांना योग्य मार्गदर्शन करत. आपल्या देशात पालकांचा खूप मोठा असा वर्ग आहे जे हा विषय प्रकर्षाने टाळतात. टाळणं म्हणजेच आपल्या मुलाला किंवा मुलीला दरीत ढकलणं. कारण, सगळेच नाही मात्र, बहुतेच पालकच अगदी मुलांच्याच समोर एकमेकांस लैंगिक स्पर्श करीत असतात. त्यानंतर जर चुकून मुलाने किंवा मुलीने प्रश्न केलाच तर स्वतःची चूक झाकण्यासाठी किंवा त्यांना ओरडून नाकारलं तर ती असं काही करणार नाही या गैरसमजापोटी त्यांना उत्तर देण्याचे टाळतात. इथेच चुकतात.
आई – वडील हे मुलांचे सर्वात पहिले आणि सर्वात जवळचे मित्र असतात. अगदी आपण आपल्या बेस्ट फ्रेंडला सुद्धा जी गोष्ट सांगणार नाही ती आई किंवा वडिलांना सांगतो. कारण, विश्वास आणि संपूर्ण जगात फक्त तेच आपल्या साठी चांगला विचार करतात. इतर कोणीच नाही. जग हे तुम्हांला लुटायला बसलंय. तेव्हा आई – वडिलांनी देखील या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे कि, आपलं आपल्या पाल्या सोबतच नातं हे अगदी तो जन्माला येण्याची चाहूल लागल्या पासून मैत्रीच असावं. खरे संस्कार यातूनच होतात.
अगदीच जर पाल्यांना मुलांच्या एखाद्या प्रश्नाला उत्तर देणे शक्य नाहीच झालं तर टाळू नका. थोडा वेळ मागा. योग्य तज्ञा कडून मागर्दर्शन मिळवा. पण, उत्तर तुम्हीच द्या. कारण, एकदाका अंतर दिलत कि, ते वाढत जातं आणि परत कधीच भरून काढता येत नाही.
ज्या प्रमाणे कुंभार काळजी पूर्वक मातीच्या गोळ्या पासून मडक तयार करतो. अगदी तसंच पालकांना सुसंस्कृत मुलं घडवावी लागतात. ते जोपर्यंत दहावीला असतात, तो पर्यंत त्यांना उपदेश देणं शक्य असतं. नंतर ते स्वतः काय योग्य आणि काय चूक हे समजून घेण्यास सुरुवात करतात. अगदीच चुकले तर योग्य मार्ग दाखवा. इथेच तुमची त्यांच्या सोबत असलेली मैत्री कामी येईल. ते तुमचं लगेच ऐकणार. तुम्ही सांगाल ती उत्तर दिशा असणार त्यांच्यासाठी.
ती फक्त तुमची मुलं नसून तुमचा आरसा असणारं आहेत. त्यांच्यातून समाज तुम्हांला पाहणार आहे.
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !
