Skip to content

नवरा लक्ष देत नाही, म्हणून तिने न राहून आपल्या जुन्या मित्राला मॅसेज केलाच!

तो, ती आणि तिचा “तो” (भाग-१)


जयश्री हाडवळे-कुलकर्णी


निशा, निशु अग लक्ष कुठय तुझं आज? मला उशीर होतोय टिफिन देतीयेस ना? श्रीधरचा गेले १० मिनिटांपासून हाच सूर होता.पण आज निशाच खरचं लक्ष नव्हतं रोज सारख. तिने टिफिन रोजसारखा हातात न देता श्रीधर नाश्ता करत बसलेल्या डायनींग टेबल वर ठेवला. श्रीधर ने काय झालं विचारल्यावर ती म्हटली श्री आज संध्याकाळी बाहेर जाऊयात का रे दोघेचं. मला जरा ऍकचुली जरा नाही जास्तच कंटाळा आलाय रुटीनचा. तिला नेहमी मिळत आलेला आणि माहीत असलेलाच रिप्लाय दिला तिच्या श्री ने अग नाही गं जमणार आज नेमका लेट पर्यंत क्लाईन्ट कॉल नंतर मीटिंग,डीसक्शन अस बरंच काही आहे.इन्फॅक्ट रोज पेक्षा आज मी उशिराही येऊ शकतो घरी. तुम्ही जाऊन या ना, मुलं आईबाबा त्यांना घेऊन जा. तुलाही स्वयंपाकापासून सुट्टी आणि त्यांना ही चेंज. तरी निशा पुढे बोललीच पण मला तुझ्या सोबत वेळ घालवायचाय.संडेला असेही आपण सगळे बाहेर जातोच मुलं, आईबाबा घेऊन. आपण दोघे बरेच महिने झाले दोघेच असे बाहेर गेलोच नाही. श्रीधरचा नाश्ता संपला तशी त्याची वेळ बोलायची वेळ ही संपली. अच्छा बघू, आज तर पॉसीबल नाही. चला मला उशीर होतोय बाय म्हणून तो गेला सुद्धा.

निशा पुढचे दहा मिनिट बसूनच होती पुढे तिच्या मनात नसतानाही तिने दुपारचा स्वयंपाक,भांडी, केर, फरशी आणि अशी बरीच घरकाम केली मुलांना शाळेतून आणायच्या वेळेपर्यंत. आज घरात सगळ्यांच्याच लक्षात आलेलं की हीच काहीतरी बिनसलय.अगदी तिच्या ७ वर्षाच्या मुलाला आणि ५ वर्षाच्या मुलीलाही कळलं होत मम्माचा आज मूड छान नाही आहे.खाऊन पिऊन झोपुन घ्या म्हणताच त्यांनी झोपुनही घेतल.

माझा नोकरी न करण्याच्या निर्णय चुकलाय का? शिक्षणाचा उपयोग घर आणि मुलं सांभाळताना करण्याचा निर्णय चुकलाय का? घरकामाला बाई न ठेवण्याचा निर्णय चुकलाय का? की, श्री सोबत लग्नाचाच निर्णय चुकलाय? छे, छे काहीही येतंय हा आता माझ्या मनात. उगाच निगेटिव्ह विचार येतायेत. अशी ती स्वतःशीच स्वतः मनातल्या मनात संवाद करत होती. आणि मग भूतकाळात रमली. कसे आपण आईच्या हातचा गरमागरम नाष्टा करून आयता टिफिन घेऊन ऑफिससाठी बाहेर पडायचो. कसे शनिवार रविवारचे प्लॅनिंग करायचो.अचानक तिच्या लक्षात की, लग्नाआधी श्री जास्त वेळ माझ्या वाट्याला यायचा आता एका घरात राहून तो मला भेटत नाही.

रात्री श्रीधर उशिराच आला झोपताना फक्त म्हटला की सॉरी निशु सकाळी वेळ नव्हता बोलायला मला कळतंय गं तुझं म्हणणं पण खूप बिझी होतो गं मी. आणि शनिवारी आठवड्याचा आळस रविवारी मुलं आईबाबा आणि मग आपला आपल्याला वेळ नाहीच मिळत.निशा ह्यावर काहीच बोलत नाही म्हटल्यावर तो झोपेच्या आहारी कधी गेला ते त्याच त्यालाच कळलं नाही.

पुढचे २ दिवस निशा थकलेली आणि उदासच होती नकोच वाटत होत तिला हे सगळं रोज मुलांना तयार करा, नवऱ्याला तयार करून ऑफिसला पाठवा घरातल्या बाकी फॅमिली मेंबर्सच बघा.पहिले पाच वर्ष मजेत केलं सुद्धा तिने सगळं पण तोचतोचपणा आल्यावर नको वाटू लागलंय सगळं.तिला आज जाणीव झाली की आपण गेली ९ वर्ष हेच सगळं करतोय.

आणि तिला “त्याची” आठवण आली खूप खूप आठवण आली. किती चांगला होता तो किती समजून घ्यायचा मला किती प्रेम करायचा माझ्यावर मला भेटण्यासाठी म्ह्णून ७/७ तास प्रवास करून यायचा. तिच्या मनात हव्यास उतपन्न झाला आणि करावा का “त्याला” कॉल म्हणून मोबाईल हातात घेतला नंबरही काढला पण थांबवलं स्वतःला इतक्या वर्षांनी असा कॉल? कस वाटेल? बरं दिसेल का? पण ती नाही जास्त वेळ थांबवू शकली स्वतःला आणि निदान मेसेज तरी करावा म्हणून टाईप केलं “कसा आहेस”? रिप्लाय ची वाट पाहत होती पुढच्या 10 मिनीटात रिप्लाय आला….

क्रमशः

(लेखाच्या ह्या भागात PROBLEM काय होतोय ते पाहिलं,पुढच्या भागात SOLUTION पाहणार आहोत.)

पुढचा भाग

??

भाग – २


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!