
चला आज आपण स्वतःचं कौतुक करूया!!
राकेश वरपे
(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
जेव्हा त्या क्षणाची आठवण येते……..
निलीमा ही मोठ्या IT कंपनीत चांगल्या पदावर काम करते. दुपारचे ३ वाजले होते, दुपारचा लंच संपूण पाऊन तास पुढे सरकला होता. कामाच्या ताणामुळे थोडासा ब्रेक घ्यावा असे तिला वाटत होते. तिने ब्रेक घेतला व ब्रेक दरम्यान तिला तो क्षण आठवला. जर त्या दिवशी पप्पांना त्या माझ्या मित्राबद्दल सांगितले नसते, तर पप्पांकडूनच तो मित्र किती फ्रॉड आहे, हे पुराव्यानिशी समजेल नसते. तसेच आज मी माझ्या पतीसोबत किती आनंदात संसार करत आहे, हे आठवून निलीमा स्वतःच्या प्रेमात पडली. कामाचा ताण नाहीसा होवुन सलग ३ तास तिने उत्तम काम केले.
अजय हा ३ वर्षापासून पोलिस भरती साठी प्रयत्न करतोय. रोज पहाटे ५ ला उठून तो ग्राउंडला पळायला जातो. त्या दिवशी रात्रीच्या अपचनामुळे त्याला उठायला उशीरच झाला, तरीही मनाशी पक्के करून तो पळायला गेलाच. परंतु नेहमीसारखं त्याला आज काही पळता येईना. खुप लवकर दमत होता. शेवटी निर्णय घेतला की १० मि. शांत झाडाखाली बसूया. तेवढ्यात मनात तो क्षण आठवला ज्यामध्ये त्याने एका हरवलेल्या ५ वर्षाच्या गोंडस मुलीला तिच्या आई कडे सुपुर्त केले होते. त्या आईचे आनंदाश्रु त्याला आठवले. स्वतः बद्दल त्याचा अभिमान इतका वाढला की क्षणातच एक ऊर्जा त्याच्या ठिकाणी संचारलेली त्याला जाणवली. तसाच तो ताडकन उठला आणि पळत सुटला. आत्तापर्यंत कमी वेळेत सर्वात वेगवान पळाला होता तो.
जोशी काका आणि काकू हे ज्येष्ठ कपल न चुकता सायंकाळी ६ वाजता पार्कमध्ये फिरायला जातात. आजही ते पुन्हा आयुष्याचं गाऱ्हाणं गायला पार्कमध्ये फिरायला जात आहेत. काहीसं पावसाळी वातावरण झालं आहे. शिवाय जोशी काका हे तब्येतीबद्दल अतिशय जागरूक असलेले आणि काकूंना काधीकाळी पाणीपूरी खावीशी वाटली तरीही नाक मुरडनारे. अचानक जोरात पाऊस सुरु होतो. पार्कमधील एका छताखाली जत्रा भरते. पाऊस जाण्याची वाट पाहत असताना जत्रेतला गोंगाट निवळत जातो. आणि त्या निर्माण होणाऱ्या शांततेत त्या क्षणाची दोघांना आठवण होते. अशा भर पावसातच काकांनी काकुंना गुढघे टेकुन लग्नाचं विचारलं होतं. त्यांची ही फिल्मी स्टाईल पाहुन लगेचच काकुंनीही होय म्हणालं होतं. असं हे सर्व आठवून दोघेही हातात हात घेऊन भर पावसात भिजण्याचा आनंद लूटतात आणि थेट पाणीपुरीची गाडी गाठतात. आणि महत्त्वाचं म्हणजे दोघांची मनं इतकी तरुण झाली होती की पावसात भिजण्याचा आणि पाणीपूरी खाण्याचा कुठलाच वाईट परिणाम उद्भवला नव्हता.
अशा या वरील ३ घटनांचं चित्र रूप जर तुमच्या डोळ्यासमोर उभं रहीलं असेल तर मला नेमकं काय म्हणायचं आहे हे तुम्हाला पटकन कळेल.
प्रत्येकाच्या आयुष्यात असे आणि यापेक्षा अजुन गोड आठवणी व क्षण असतात. ते जर जाणीवपूर्वक किंवा बळजबरी आठवले तर त्याच्यातली ऊर्जा वरील तिनही घटनेप्रमाणे मिळेलच सांगता येत नाही. म्हणून त्याच्यातला अचानकपणा हा आलेला एक सर्वश्रेष्ठ अनुभव आहे.
आपण विनाकारण एकाच दुःखावर सारख्या रेघोटया मारत असतो, हे घडूच शकत नाही, माझं आयुष्य असेच आहे आणि स्वतः ला कमी लेखत असतो. पण आपण आपल्याच नकळत नोबेल पारितोषिके मिळावी अशी कार्ये केलेली असतात.
आपण स्वतः चं कौतुक करत नाही, स्वतः वर प्रेम करत नाही, स्वतःची कला – कौशल्ये समजुन घेत नाही. म्हणून एखादी छोटी बाबही फार मोठी वाटते. यासाठी आपण Motivational व्हिडिओ पाहतो आणि लेक्चर्स ऐकतो. परंतु हे सर्व तात्पुरतं असल्यासारखं आहे.
नकळत आपल्या हातून कोणाची तरी मदत पूर्ण झालेली असते, अवघड स्थितीत सय्यम ठेऊन आपण उत्तम निर्णय घेतलेला असतो. असे इतर अनेक प्रसंग आपल्या स्मृतीत असतात. आणि हेच आपल्या आयुष्यातले खरे Motivational प्रसंग आहेत. जे आपल्याला पुढे सरकवत असतात, प्रोत्साहीत करत असतात.
म्हणून दुःख, ताण, चिंता, भिती हे प्रत्येकाच्या आयुष्यातला भागच आहे. खचून न जाता त्यावर सय्यम ठेवायला हवा. कारण त्यावर आपल्याला प्रोत्साहन नक्की मिळेल, मार्ग नक्की मिळेल, फक्त…..
जेव्हा त्या क्षणाची आठवण येईल…..
Online Counseling साठी !
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी

