Skip to content

आजचा पालक हा म्हातारा होत आहे ???

धावते मातृत्व


कौंसेलर ज्योत्स्ना डगळे

नाशिक


नमस्कार पालक हो!

लेखाचा मथळा वाचून जरा विशेष वाटले असेल ना….?
परंतु सत्य हेच आहे. आजचा पालक म्हातारा होत आहे.
शिक्षण…
करिअर…
नोकरी….
या सगळया गोंधळात इतका वेळ होऊन जातो कधी 35-40 ओलांडते याचा अंदाजाच येत नाही.
आणि या सगळ्यांनतर मग लग्नाचा विचार होतो.

आणि यानंतर अर्थात आई बाबा होण्याचा…तोपर्यंत बहुतेक 35-40 ओलांडलेली असते. आई बाबा दोघांनाही.
सृदृढ मूल जन्माला घालण्याचे योग्य वय 20-30…
याच कालावधीत एक सुदृढ मूल जन्माला येऊ शकते. जसेजसे आईचे वय वाढते तसतसे जोखीम वाढत जाते. याच वयात नानाविध आजार बळावलेले असतात. आणि मग डॉक्टर म्हणतात…तुमची डिलेवरी कॉम्पलिकेटेट वाटते हं…
मग पुन्हा महागड्या मेडिसीन..ट्रिटमेंट…

त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे तो , वाढते प्रदूषण.
या प्रदुषणामुळे आपण श्वास घेतो ती हवा सुद्धा शुद्ध राहिली नाही. योग्य आहार नाही, जीवनशैली बदलेली…
मोठमोठ्या शहरांत भावी माता सुद्धा व्यस्नाला बळी पडलेल्या आहेत… का तर म्हणे पाश्चिमात्य संस्कृती. अशा या भावी माता 35-40 नंतर आई हाण्याचा निर्णय घेतात, त्यात गर्भात मुल आहे याचे भानही न ठेवता आपली जीवनशैली आहे तशीच सुरू ठेवतात. अशा या प्रदुषित वातावरणात व प्रदुशित गर्भात जन्माला येणारे मुल कसे हो सुदृढ असेल?
मुंबई त झालेल्या एका सर्वेनुसार सन 2016 नंतर सुमारे 60% मुलांना जन्मत: ह्दयाचे विकार आहेत. काही व्यंग जन्माला आलेले आहेत. आता गर्भात असणारे व्यंग आधीच लक्षात येतात त्यामुळे वेळेवर लक्षात येताच अशा मुलांचा जन्म थांबविता येतो. परंतु काही व्यंग असे असतात की, ते जन्माला असल्यावरच लक्षात येतात. काही ठिकाणी जन्मानंतर मुलांचा Rector गुद्वारच नसते. काही मतिमंद जन्माला येतात.

याही पलीकडे असतात त्या आयटी सेक्टर मध्ये काम करणाऱ्या भावी माता…
महिन्याला 2 – 2 लाख पगार घेणाऱ्या मातांना नऊ महिने मुल पोटात वाढविणे म्हणजे मोठी अडचणच असते. त्यात दुसरीकडे भावी बाबा अन आई हा हिशोब करत असतात की मुल जन्माला घालेपर्यंत किती लाखांचे नुकसान होणार…?
मग यांचे पाय वळतात #सरोगसीकडे…
सध्या अशा भावी माता पितांचे नुकसान लक्षात घेता सरोगसी मदर चा #ट्रेंड वाढता आहे. सध्या तो सिनेकलाकारांमध्ये वाढता आहे. मध्यंतरी शाहरुख खान च्या पत्नीलाही सरोगसीच्या माध्यमातून मुलाचा जन्म दिल्याचे वाचनात आहे होते.

मुलाला जन्माला घालण्या इतपत वेळ नाही असे हे भावी माता पिता… यापुढे जाऊन पुन्हा कमावत्या मातांना या मुलांच्या संगोपनाची अडचण वाटायला लागती आहे. आई वडील त्या मुलाचे भविष्य चांगले घडावे याकरीताच रात्रंदिवस राबराब राबत असतात…नव्हे त्याना लक्झरीयस लाईफ देण्यासाठी ते कटीबध्द असतात. अशा या कमावत्या भावी माता पित्यांनी भविष्यात मुल दत्तक घेण्यावरच भर दिला तर नवल वाटू नये… त्यातही जरा समजदार मुल…जेणे करुन सुरूवातीच्या 2-3 वर्षांच्या बालसंगोपनाचे कष्ट वाचतील.
असो … परंतु यामुळे बिचाऱ्या अनाथाश्रमातील मुलांना म्हातारे का असेना चाळीशीतील आई बाबा तरी मिळतील…

गम्मत नाहीये ही….वेळ आली आहे स्वत: अंतर्मुख होण्याची.
मी माझे लग्न कितव्या वर्षी करतेय/ करतोय? माझं आई /बाबा होण्याचं आदर्श वय काय? मला माझं करिअर महत्वाचं आहे की माझं आरोग्य..
या आणि यासारख्या अनेकाविध प्रश्नांची उत्तरे आपणच आपल्याला द्यायला हवीत. अन्यथा पुढे जाऊन मुलांनाच पालक दत्तक घेण्याची वेळ आली तर नवल नाही.


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी!

? ?

Whatsapp | Telegram



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!