Skip to content

येणारा प्रत्येक दिवस आपल्यासाठी नवी उमेद घेऊनच येतो!!

येणारा प्रत्येक दिवस आपल्यासाठी नवी उमेद घेऊनच येतो!!


सचिन सनपुरीकर


किती विचित्र आहे नाही…. एकाच वेळी आनंद आणि दुःख दोन्ही गोष्टी अनुभवतो. नवीन वर्षाच्या सुरवात आणि त्याचा जल्लोष तसेच एका मित्राचा वाढदिवस आणि त्याच वेळी दुसऱ्या एका मित्रा चा स्मृतिदिन….

या व्हाट्सऍप, फेबु, ट्वीटर च्या जमान्यात आपण इतके फास्ट झालो आहोत की एक क्षणी आपण आनंदाच्या शुभेच्छा देतो तर दुसऱ्याच क्षणी दुःखाची संवेदना व्यक्त करतो…. हे चक्र अव्याहतपणे चालू आहे… हे म्हणजे अगदी ऋतू जसे बदलतात तसेच आपल्या भावनांचे ऋतू सुद्धा सतत बदलत असतात.

प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार हे नेहमीचेच…, दररोज… 365 दिवस चालू आहेत. पृथ्वी वर सूर्य रोज उगवतो रोज मावळतो. पण तो स्वतः तसाच प्रकाशमान असतो. नेहमीच प्रकाशमान असतो. त्याचं काम ती नियमित करतो. तो एक ऊर्जेचा स्रोत आहे आणि ही ऊर्जा कोणत्याही स्वार्था शिवाय सर्व विश्वाला प्रदान करत आहे. त्याच्या आजू बाजूला अनेक ग्रह आहेत प्रत्येक ग्रह ती ऊर्जा आपापल्या पद्धतीने गरजे नुसार घेतच आहेत. त्या सर्व ग्रहात पृथ्वी ही फार नटखट आहे. स्वतः भोवती फिरता फिरता सूर्या भोवती फिरत राहते. त्याच्या मुळेच दिवस आणि रात्र या दोन्हीचा अनुभव ती सूर्याच्या मदतीने घेत असते. दिवस टवटवीत चैतन्याचा तर अंधार हे विश्रांतीचं स्थान. दिवस भर फिरून दमली की परत अंधार करून संपूर्ण जगाला ही पृथ्वी शांत करते. पण स्वतः मात्र फिरत राहते काळाला मात्र पुढे नेत राहते.

तसंच आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचं आहे. प्रत्येक व्यक्ती ही एक पृथ्वीचंच तत्व आहे. कोणत्या तरी गोष्टीला आपण आपल्या जीवनाच्या केंद्र स्थानी मानलं आहे… ती गोष्ट म्हणजे आपल्या जीवनातील प्रेरणेचा स्त्रोत आहे. त्याच्या भोवती आपण फिरत राहतो. त्या केंद्र स्थानाला दैदिप्यमान करण्यासाठी आयुष्य पणाला लावतो. सुख दुःखाच्या छटा अनुभवतो. कधी या सुख दुःखाचे डोंगर येतात आणि मग हे ही दिवस जातील. एक ना एक दिवस हे ग्रहण संपेल आणि आपला सूर्य पुन्हा तेज:पुंज होऊन जाईल हा प्रचंड आशावाद मनात ठेवून आपण फिरत असतो… प्रत्येक दिवशी उमेदीच्या नवीन किरणांचा शोध घेत असतो.

मग प्रत्येक दिवस हा नवीन दिवस. प्रत्येक पहाट ही नवीन पहाट. अंधारी रात्र सारून काल जे काही वाईट घडलं ते तिथेच सोडून आणि चांगल्या गोष्टीचा वारसा सोबत घेऊन नवीन पहाट उगवते. पृथ्वी फिरतच असते. काळ पुढे जात राहतो. अंधारातुन प्रकाश कडे संक्रमित होत राहते. सुख, दुःख, चांगले आणि वाईट या अनुभवांचे ऋतुचक्र प्रत्येकाच्या आयुष्यात चालूच राहाते.

आणि म्हणूनच असं वाटतं की या 365 दिवसांच्या संक्रमना नंतर येणारा प्रत्येक 366 वा दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन वर्षंची सुरुवात ठरावं. अर्थात प्रत्येक दिवस हा खर तर नवं वर्षाची सुरवातच आहे. करण तो दिवस 365 दिवसा नंतर आलेला आहे. हे चक्र चालूच राहणार…

त्यात आपण तरी का मागे राहायचं. प्रत्येक येणाऱ्या नव्या पहाटे साठी कालच्या पेक्षा आज आपण काय चांगलं करू शकतो. हा संकल्प प्रत्येक दिवशी करून उमद्या मनाने दिवस चालू करावा. आपल्या जीवनाचं संक्रमण सुद्धा त्या पृथ्वी माते सारखे दिवस रात्रीचे अनुभव घेत अव्याहत पणे चालु ठेवावं.

प्रत्येक येणाऱ्या नवीन दिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

क्लिक करा!


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!