मुलांसमोर तुमच्या कामांचे टेंशन कधीच येऊ देऊ नका!
ऑफिस आणि घर या दोन्ही ठिकाणच्या जबाबदारी पूर्ण करता करता जोडप्यांच्या नाकी नऊ येत असतात. यामध्ये चिडचिड होणे, अस्वस्थ असणे या गोष्टी होणे स्वाभाविक आहे. पण जर तुमच्या घरात लहान मुले असतील तर पालक म्हणून तुम्ही जरा सावधगिरी बाळगली पाहिजे. तुमचे टेन्शन मुलांसमोर येता कामा नये.
प्राधान्यक्रम ठरवा
बरेच वेळा टेन्शन येण्याचे कारण म्हणजे आपले कामाचे प्राधान्यक्रम ठरलेल्या नसतात. आपण आयुष्यात काही गोष्टी विचारांती निवडत असतो. त्या निवडीच्या पाठीमागे सारासार विचार करून आपण उभे राहिले पाहिजे. जर जोडप्याने मूल जन्माला घालायचा विचार केला असेल आणि त्यानुसार घरात बाळ असेल तर पुढे सहाजिकच सर्व कामाचे आणि पैसे मिळवण्याचे निर्णय हे बाळाला बाजूला ठेवून घेता येणार नाहीत. त्यामुळे वैतागून व चिडचिड करून काहीच हातामध्ये लागणार नाही.
तणावपूर्ण गोष्टींवर मुलांशी चर्चा करू नका
तुमचे ऑफिसचे किंवा घरातील जे काही तणावपूर्ण असे मुद्दे असतील त्यावर मुलांसमोर चर्चा करू नका. बोलता-बोलता शब्दाला शब्द लागून भांडण होऊ शकते. हे मुलांसमोर होता कामा नये. गोष्टींचे गांभीर्य समजण्याइतकी मुले परिपक्व झालेली नसतात. त्यांच्यावर तुमच्या चर्चेचा वाईट परिणाम होऊ शकतो.
तुमचे वर्तन सर्वात महत्वाचे
केवळ ताण आहे तेवढेच नाही तर एरवीदेखील तुम्ही मुलांसमोर कसे वागता हे फार महत्वाचे आहे. पती-पत्नी म्हणून तुम्ही सतत एकमेकांची उणीदुणी काढत असाल, एकमेकांवर साध्या-साध्या गोष्टींवर चिडत असाल तर त्याचा गंभीर परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो. आईला जर बाबा वाटेल तसे बोलत असतील तर मुले देखील आईला गृहीत धरू लागतात ते देखील आईचा आदर ठेवत नाही. हुबेहूब हीच परिस्थिती बाबांबद्दल घडत असते.
घरातली ऊर्जा महत्त्वाची
मुलांसाठी घर कायम ऊर्जादाई, मायेने आणि उबेने भरलेले असले पाहिजे. मुलांना घरात नेहमी सुरक्षित वाटले पाहिजे. केवळ सगळ्या गरजा घर पूर्ण करतात, असा व्यवहारी दृष्टिकोन मुलांसमोर असता कामा नये. तर त्यांना घराची आणि घराला त्यांची गरज वाटली पाहिजे. हे खूप आवश्यक आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा घरात ताणतणाव नसतील तर शांतता नांदत असेल.
शेवटी प्रत्येकाला कामामध्ये काहीना काही टेंशन असतेच. तसेच त्या ताणतणावाचा परिणाम हा व्यक्तिगत आयुष्यावर होत असतो. केवळ तो परिणाम तुमच्या कुटुंबावर तसेच मुलांच्या शैक्षणिक आणि करिअर जीवनावर होऊ नये, याचं मॅनेजमेंट पालकांना करता यायला हवं.
काही पालक ‘मला कामात किती लोड असतो’, ‘मी कसा प्रवास करतो मलाच माहितीये’, ‘एकदा तू माझी नोकरी करून बघ’ असे उद्गार मुलांसमोर काढत असतात.
त्यापेक्षा…
‘हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे’, ‘प्रत्येकाला करिअरमध्ये अशी मेहनत करावीच लागते’, ‘माझ्यापेक्षा जास्त तर किती-किती लोकांना लोड असतो, तरीही कसं आनंदी जगतात ते’
अशी ऊर्जा मुलांसमोर पसरविल्यास दुःखी, आळशी, रडक्या वातावरणापासून आपलीच मुलं मुक्त होतील.
आणि…
संकट काळात परिस्थितीशी चारहात कसे करायचे, हे सुद्धा शिकतील.
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!
क्लिक करा!
आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !