Skip to content

‘मी टिकली लावणार नाही’, पाय आपटत सोनी म्हणाली.

वाह्यात कार्टी……???


“मी टिकली लावणार नाही.”
पाय आपटत सोनी म्हणाली.

परवा संध्याकाळी बापूच्या घरी गेलो होतो तेव्हा त्याची ही २२-२३ वर्षाची कन्या बोलत होती. जीन्स, कुडता, खांद्यावर सोडलेले मोकळे केस, अगदी गोड दिसत होती. कार्टी वाह्यात आहे अस ब-याच जणांकडून ऐकून होतो पण कधी अनुभव नव्हता.

“आजोबा, तुम्ही तालीबानी आहात! ” आजोबा म्हणजे बापूरावाचे वडील. २५-३० वर्षांपूर्वी सरकारी नोकरीतून मोठ्या हुद्द्यावरून रिटायर झाले. गीता आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक. त्यांची २-३ प्रवचने मी ऐकली आहेत. मोठी श्रवणीय असतात. पण नातीकडून मिळणारा हा घरचा अहेर स्वीकारणे म्हातारबुवाना अवघड पडत होते. चेहराच सांगत होता.”

तुमची सारी जुलुम जबरदस्ती मुलीना आणि बायकांनाच. परवा गौरी पूजनावेळी मी पँट घातली म्हणून केवढा गोंधळ घातलात! “”अगं, आपला धर्म, आपली संस्कृती आपण नको का सांभाळायला?” आजोबा कसाबसा संयम पाळत म्हणाले.”वा वा! संस्कृती,धर्म या गोष्टी एवढ्या तकलादू आहेत का की मी पँट घातली अन् नष्ट झाल्या. मग तुम्ही आणि बाबा का धोतर नेसून बसला नाही? तुमच्या पँटने नाही वाटत संस्कृती बुडत?”कार्टी वाह्यात आहे ऐकलं होतं पण अनुभवलं नव्हतं कधी. आजोबानीही आपली हार मानली आणि तलवार म्यान केली.

“आता संध्याकाळी कुठे निघालीस? काही सांगून बिंगून जायची पद्धत आहे की नाही? “गोलंदाजीची धुरा आता आजीबाईनी सांभाळली.
“तुझी आई अजून मला किंवा आजोबांना विचारल्याखेरीज बाहेर जात नाही.” कौतुकाने सुनेकडे पाहत आजीबाई म्हणाल्या. बायकोचं कौतुक ऐकून बापूरावचाही चेहरा खुलला.

“आजी अगं तूही ?”

अगं तू कशाला या गुलामगिरीची भलामण करतेयस ? आई आता ५५ वर्षांची झाली अजूनही तिला आपल्या मनाप्रमाणे वागता येऊ नये ? साधी भाजी आणायला जायचं तर तुझी परमिशन हवी? बाबा किंवा दादाला नाही कधी हटकत ते?””तुझ्या तोंडी लागणे म्हणजे भिंतीवर डोके आपटून घेणे आहे.”

आजीबाईनी निम्म्यातच आपली ओव्हर संपवली. पण नातीची फटकेबाजी अजून संपली नव्हती.

“आजी आपल्याकडे किनई मुलीना आणि बायकांना गृहीत धरल जाते. आपल्याला सुख कशात आहे, आनंद कशात आहे याचा निर्णय दुसरेच घेतात. एक व्यक्ती म्हणून आपली किंमत शुन्य आहे. ” आजोबा गेल्या ५० वर्षात तुम्ही आजीला वा बाबा तुम्ही आईला तू सुखी आहेस का अस कधी विचारलत का हो ? साड्या, दागिने, भारत भ्रमण तुम्ही किती हौसेने करता. पण हे आईला खरंच आवडत का ? की केवळ तुमच्यासाठी हसतमुखाने ती फरफटत तुमच्याबरोबर येत असते? कधी विचारलत ? कधी जरूर असेल तेव्हा तिची space तिला देऊ केलीत ? सतत आपली बंधन. हे करू नको ते करू नको. लोक काय म्हणतील? हँ..! “”सोने फार झाली हं तुझी बडबड. कुणाशी काय बोलतेस जरा भान ठेव.

” सोनूच्या आईने तिला दटावले.”आई, तुझी चूक नाही.

जन्मल्यापासून तुझं programming च तस झालंय. पती परमेश्वर, त्याच्या सुखातच तुझं सुख. म्हणून तू अशी बोलतेस. स्वतः बंधनात राहतेस अन् मलाही बंधन घालतेस.””जग साध नाही गं सोने….!” बापूरावांना आता कंठ फुटला. “सगळीकडे नुस्त्या विखार भरल्या नजरा आहेत. स्त्रीयांवर अत्याचार होतायेत. आपल्या बाबतीत अशा गोष्टी घडू नयेत म्हणून ही काळजी, ही बंधन. कशाला आपण या वाईट वृत्तीला चाळवायच?”

तशी सोनी उसळलीच!”वा वा वा! ! चोर सोडून सरळ संन्याशीच फासावर लटकवताय. या नराधमाना आवरता येत नाही म्हणून मुलीनांच कुलपात बंद करताय. ठेचाना ही विकृत मनोवृत्ती, बदला ना हा विचार हा समाज! त्यासाठी आधी तुम्ही बदला. तो दादा नाक्यावर टिंगल टवाळी करत बसलायं त्याला आवरा, स्त्रीयांचा आदर सन्मान करायला शिकवा त्याला आणि स्वत: ही शिका. आज नाही तर उद्या हा समाज बदलेल, ही कीड कमी होईल. आमची नाही निदान पुढची पिढीतरी ताठ मानेने बिनधास्तपणे इथे वावरेल.

“कार्टी वाह्यात आहे खूप जणांकडून ऐकल होतं.पण असं वाह्यात असणंही खूप गरजेचं आहे.

माझ्या मुलीला ही अशीच वाह्यात बनवं जी मला, माझ्या घराला आणि समाजाला बदलायला उद्युक्त करेल….!!!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

क्लिक करा!


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!