Skip to content

मुलाला मोबाईल दिला नाही, म्हणून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला!

मुलाला मोबाईल दिला नाही, म्हणून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला!


मुलींवरचे, स्त्रियांवरचे अत्याचार तसेच मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या करणारी मुले असे आजचे चिंतेचे विषय बनत असताना त्याची सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक बाजू आपण पाहतो का? अशा बाजूंवर प्रकाश टाकणारा हा महत्त्वाचा छोटासा लेख.

घराकडे ,समाजाकडे डोळसपणे पहा!

प्रियंका रेड्डी प्रकरण असो की निर्भयावरील अत्याचार असो आपण थेट समाजव्यवस्था अथवा सरकार अथवा प्रशासन यांना दोष देतो आणि मोकळे होतो .परंतु भारतीय संस्कृतीचे मूलभूत संस्कार, आपले घर तसेच आपला समाज यांच्याबाबत आपली कर्तव्य आणि आपले रोजचे वागणे याबाबत फारसा गांभीर्याने विचार करत नाही .

संत ,समाजसुधारक यांच्या विचारापासून आपण लांब जात आहोत आणि आपल्या मुलांनाही त्याची जाणीव करून देत नाही हे आपल्या लक्षात आहे का ?कोणा महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी झाली, कुठल्या संतांचा पालखी महोत्सव झाला.ते आपण पेपर मध्ये वाचतो आणि सोडून देतो.पण त्याबाबत आपल्या मुलांशी बोलतो का?

कॅलेंडर मध्ये फक्त आपण पौर्णिमा, अमावस्या पाहतो.परंतु बहिणाबाई चौधरी यांची जयंती आहे, साने गुरुजींची पुण्यतिथी आहे .त्यांच्या बाबत चार शब्द घरात मुलांशी बोलतो का ?आपल्याला माहिती नसेल तर आपण त्याची माहिती काढतो का?

वर्तमानपत्रात राजकीय बातम्या येतात .तेव्हा; त्यांची आपण चवीने चर्चा करतो परंतु सद्गुरु ,श्री श्री रविशंकर अशा महापुरुषांच्या विचारांचे मंथन किंवा सामूहिक वाचन आपण घरात करतो का, याचा विचार केला पाहिजे.

आपल्या मुला-मुलींना सोबत घेऊन आपण गप्पा मारतो का? हेही पाहिले पाहिजे .टीव्हीवर अश्लील गाणी सुरु असतात, चित्रपटातील अश्लील दृश्य सुरू असतात.संपूर्ण कुटुंबात टीव्ही सुरू असतानाही कुणालाही काही वाटत नाही.तो चॅनल आपण तडकाफडकी बंद करतो का? तसे आपण अजिबात करत नाही.कारण आपल्या मुलांना आपण अतिप्रेमाने लाडावलेले आहे .

रात्री एक- दोन वाजेपर्यंत मुले मोबाईलवर बसलेले असतात, तेव्हा त्यांना खडसावून विचारतो का? सकाळी नऊ- साडेनऊ वाजेपर्यंत मुले निवांत लोळत पडतात.त्यांना आपण बोलतो का? त्यांचे आपण अतिरिक्त लाड करतो हे आपणास समजत नाही का ?

आपले संस्कार घरात अवलंबले पाहिजेत आणि त्या संस्कारांचा संबंध समाजाची जोडला पाहिजे हे आपल्या लक्षात येत नाही.आपण मुलांच्या देखत राजकारणाच्या जोरदार चर्चा करतो.नातेवाईकांमध्ये हेवेदावेबद्दल जोरजोरात बोलतो.त्याच गोष्टी मुलांच्या रूदयात कोरल्या जातात.

आपल्या कुटुंबात किंवा नातेवाईकांमध्ये कोणीतरी जबाबदार, हुशार व्यक्ती असते.त्या व्यक्तीने आपल्या मुलांना हक्काने रागावलेले, चार शब्द चांगले सांगितलेले आपल्याला आवडते का ?अजिबात आवडत नाही.कारण आपल्या मुलांबद्दल आपण ओव्हरप्रोटेक्टिव झालो आहोत.

जितका वेळ राजकारणाच्या गप्पा ला किंवा नातेवाईक त्यांच्यामधील हेवेदावे यांच्या गप्पांना देतो तेवढा वेळ आपण मुलांना देतो का .तर अजिबात देत नाही.

मुले चिडचिड का करतात, मुले असमंजस का होतात ,मुले आपलं का ऐकत नाहीत याचे उत्तर लहानपणापासूनचे ट्रीटमेंट मध्ये आहे. सुसंस्कार करण्यासाठी प्रथमपासूनच प्रयत्न केले पाहिजेत.अजून तो लहान आहे ,मोठा झाल्यावर आपोआप समजेल हा अत्यंत घातक गैरसमज आहे.

आपल्या आसपास असणाऱ्या हुशार व्यक्ती, महान व्यक्ती ,समाज सुधारक यांच्याशी आपण आपल्या मुलांची ओळख करून देत नाही.आपल्या वाचनालयात आपल्या मुलांना आपण घेऊन जातो का? तर अजिबात नाही .अनेक व्याख्याने, सामाजिक कार्यक्रम होत असतात.अशा कार्यक्रमांना आपण मुलांना घेऊन जात नाही.त्यामुळे मुलांमध्ये सामाजिकता येत नाही.

अनेक जाहिराती, अनेक गाणी बिनधास्तपणे आपण मुलांसह पाहतो.त्यात आपल्याला काही गैर वाटत नाही आणि मग अत्याचार झाले, काही अघटीत घडले की आपण सरकार, समाजव्यवस्था यांना दोष देऊन मोकळे होतो.

घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर चालत जाऊन एखादी वस्तू आणायला आपण मुलांना सांगतो का? तर अजिबात सांगत नाही.घरात मोठी मुले असतात.तरीही मोठी माणसे खरेदीसाठी घरातून बाहेर पडतात.पण मुलांना सांगत नाही.कारण मुले नाराज होतील असा अनाठायी गैरसमज असतो किंवा अतिलाड असतात.

घरापासून जवळच्या अंतरावर जाण्यासाठी सुद्धा आपण मुलांना चालत जा असे म्हणतो का? तर नाही..!!त्यांना आपण बिनधास्त गाडी देतो आणि पेट्रोल महाग झाले, अशी सरकारचे नावाने ओरड करतो

या सर्व मुद्द्यांचा विचार करण्याची खरंच वेळ आली आहे. संत ,समाजसुधारक महापुरुष तसेच आत्ताच्या काळातील डॉक्टर अभय बंग, राणी बंग ,प्रकाश आमटे डॉक्टर रवींद्र कोल्हे अशा समाजसेवकांबद्दल मुलांशी भरभरून बोलण्याची वेळ आली आहे.तरच सामाजिकता निर्माण होईल आणि आपोआप मुलांना समाजात चांगले अनुभव येऊ लागतील. कारण त्यांचे मन शुद्ध होईल.

मग पुढील सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल.

तुम्हाला काय वाटते?


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

क्लिक करा!



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!