Skip to content

भावनांचा गोंधळ का होतो? हे कोडं कसं सोडवायचं?

भावनांचा गोंधळ का होतो? हे कोडं कसं सोडवायचं?


आयुष्याविषयी मनात नकारात्मक भावना निर्माण झाली असेल तर त्याचा निचरा करून सकारात्मकतेकडे यायला हवं. यासाठी काही गोष्टी प्रकर्षाने कराव्या लागतील.

जीवनात विविध भावनांची गुंफण करा, भावनांचा गुंता नाही. आपलं आयुष्य हे वेगवेगळ्या भावनांनी व्यापलेलं आहे. या भावनांची छान गुंफण केली, तर आयुष्य सुंदर बनवता येतं. परंतु असं सहसा कोणी करत नाही. अनेक जण या भावनांचा गुंता करतात आणि तो सोडवण्याचा योग्य मार्ग मिळाला नाही तर त्यात अधिकाधिक गुंतत जातात.

भावनांना आवर घाल असा सल्ला अनेक जण देत असतात. परंतु भावना कशा हाताळाव्या ते कोणी सांगत नाही.

माणूस एखाद्या भावनेत इतका अडकून पडतो की तिच्या कचाट्यातून सुटका होत नाही. एखाद्या भावनेला लगेच झटकून टाकण्याचा प्रयत्न करू नये कारण तसं केलं तर पुन्हा पुन्हा ती येतच राहणार.

जसं की तुम्हाला दुःख झालं तर थोडं रडून घ्यावं. राग आला तर तो दाबून टाकण्यापेक्षा व्यक्त करावा. खूप अस्वस्थ वाटतंय तेव्हा खूप जवळची व्यक्ती असेल तिच्या जवळ मनातलं बोलून मोकळे व्हावे. कोणाजवळ बोलणं असुरक्षित वाटत असेल तर कागदावर लिहून काढावं.

तुम्हाला जेव्हा कशाचा तरी राग आलाय असं वाटतं, तेव्हा तो फक्त त्याच गोष्टीचा राग असतो असं नाही, तर अनेक गोष्टींविषयी राग तुमच्या मनात साठलेला असतो. तो सर्व त्या निमित्ताने उफाळून येतो. त्यावेळी घडलेली घटना ही तर फक्त निमित्त ठरते, तो सर्व राग बाहेर येण्यासाठी.

त्यामुळे तो सर्व राग बाहेर येऊ द्या व मनाला मोकळं करा!

एखाद्या भावनांना मोकळी वाट मिळाल्याशिवाय तिचा निचरा झाल्याशिवाय ती बरी होत नसते. काही वेळा आपल्याला खूप अस्वस्थ वाटतं, कशामुळे वाटतं तेच कळत नाही. मग अशावेळी भूतकाळातील एखादी घटना आठवून त्या अस्वस्थतेला वाट मोकळी करून द्यावी.

जेव्हा खूप दुखी होतो, तेव्हा इतरांचे दुःख ऐकावे. तेव्हा वाटतं की त्या दुःखा पुढे तुमचं दुःख काहीच नाही. असे तुम्हाला वाटू लागते व दुःखाची तीव्रता कमी होते.

तसं पाहिलं तर जेव्हा राग आणि दुःख अशा भावना निर्माण होतात, तेव्हा प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करीतच असतो. कुणी डायरी लिहितं, कोणी गाणी ऐकतं, कोणी आवडतं त्या कामात स्वतःला गुंतवतो, कोणी फिरायला जातं, कोणाला चित्रपट बघून बरं वाटतं, तर कोणाला मित्रांच्या घोळक्यात बरं वाटतं. अशा वेगवेगळ्या तऱ्हेने दुःख विसरण्याचा, त्यातून निघण्याचा प्रयत्न सर्वजण करीत असतात.

परंतु काही जण मात्र यात काही उपाय न शोधता पार अडकून पडतात. अशा वेळी त्यांना काय करावे कळत नाही. स्वतःला दारूमध्ये बुडवण्याचा प्रयत्न करतात, परंतु हा वेडेपणा आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी चांगला विचार करावा. मनाशी ठरवायला हवं म्हणजे तुम्ही नक्की त्यातून बाहेर पडू शकता.

फक्त बाहेर पडण्याची जबरदस्त इच्छा हवी आणि प्रत्यक्ष अमलात आणता यायला हवं.

मग तुम्हाला या गुंत्यातनं बाहेर येण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

क्लिक करा!


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!