Skip to content

आणखी काही वर्षानंतर स्त्रिया लग्नच करणार नाहीत!!

विवाहसंस्था


मयुर जोशी


काही लोक आज-काल बोलताना ऐकू येतात सध्याच्या काळात घटस्फोट यांचे प्रमाण खूप वाढले आहे. तरूण अत्यंत भरकटत चाललेले आहेत. हा सर्व आधुनिकतेचा आणि पाश्चात्य संस्कृती अवलंबण्याचा परिणाम. स्वैराचार. तीस-चाळीस वर्षांपूर्वी हे सर्वजण गुण्यागोविंदाने राहात होते. आता मात्र अविचारी, व्यभिचारी, संयम नसल्यामुळे या सर्व कारणांमुळे घटस्फोटांचे प्रमाण खूप वाढलेले आहे.

माझे काही मुद्दे आहेत किंवा उत्तरे देखील यातच सापडतील.

1. स्वातंत्र्यापूर्वी पर्यंत अनेक बायका असलेले अनेक पुरुष भारतामध्ये राहत होते कारण एक पत्नित्वाचा कोणताही कायदा येथे येथे नव्हता.

2. अगदी 20 ते 25 वर्षा अधी पर्यंतच्या पिढीमधील स्त्री ती स्वतःच्या पायावर उभी असलेली पाहणे हे कमी प्रमाणातच होते.

3. हजारो वर्षांपासून साधारणतः 30 ते 40 वर्षापूर्वीपर्यंत स्त्री ही फक्त घरांमध्ये राहून चूल आणि मूल इतकेच बघेल असे सर्वमान्य होते.

थोडक्या मध्ये पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला घराच्या बाहेर फारसे करण्यासारखे काही नव्हते व ते अधिकारही नव्हते. काही नावे असतील स्त्रियांमधधील असतील परंतु ते अपवादात्मक. जशा की सावित्रीबाई फुले किंवा रमाबाई वगैरे वगैरे परंतु ही अपवादात्मक नावे आहेत. उरलेल्या 95 टक्के बायका या चूल आणि मूल हेच करीत होत्या.

जेथे स्त्रीला स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा अधिकार नव्हता. आर्थिक दृष्ट्या ती कधीही स्वतंत्र नव्हती. सासरी जर का आवडले नाही तर माहेरी जाण्याची सोय नव्हती कारण ते घर आता तुझे आहे हे घर तुझे नाही हे ठामपणे सांगणारे सर्वच जण होते अगदी आई-बाबा देखील. मुलेबाळे असल्यावर त्यांना घेऊन तिला त्याच सासरच्या घरात जबरदस्तीने राहायला लागत असे. आणि ही गोष्ट जवळपास प्रत्येक घरांमध्ये. आज येथे छातीठोकपणे म्हणणंरी माणसे असे असतील की असे नव्हतेच.
पण त्याचे कारण देखील लाचारी हे होते कारण ती स्त्री बोलणार कोणाला आणि कशासाठी??

गेल्या वीस ते तीस वर्षांपासून स्त्रिया स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजेच आता त्यांच्यासमोर एखाद्या ठिकाणी जाच झाला तर तेथे न राहता दुसरीकडे स्वतःची सोय करण्याची ताकद आलेली आहे. अर्थातच यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढणारच… नाही का?? कारण पूर्वीच्या काळी मुलाबाळांना घेऊन किंवा एकटीने घर सोडून जाणार कुठे??

आत्तापर्यंतची विवाह संस्था ही एका बाजूच्या पक्षाला पूर्णपणे दाबून त्यावर स्वार केलेली आहे. आणि मग तिला यशस्वी संस्था म्हणून सर्वजण मिरवतात खरे. परंतु मुळातच स्त्रियांच्या बाजूला पूर्णपणे दाबून ठेवून ही संस्था इतक्या वर्ष यशस्वीपणे कार्यरत राहिली पण आता ते मूळ कारण आणि बेसला हादरा बसलेला आहे.

माझा एक मित्र मुलीला भेटण्याकरता एका कॉफी शॉप मध्ये गेला. कोणत्यातरी साईटवरून स्थळ आले होते. तिथे तो त्या मुलीला म्हणाला बाकी काहीही कर पण माझ्या आई-वडिलांची काळजी घेतली पाहिजे. ती मुलगी काहीही न बोलता उठली आणि चालायला लागली. मला येऊन म्हणाला हल्लीच्या मुली अत्यंत उद्धट आणि माज असलेल्या झालेल्या आहेत. मी त्याला म्हणालो तुझे आईबाप म्हणजे काय राजा-राणी वगैरे आहेत की काय ? तुझ्यासाठी असतील. पण एक तर मुलगी स्वतःचे घर सोडणार, स्वतःचे आईबाप सोडणार तुझ्या आईबापांचे काळजी तिने घ्यायची तिची आईबापांची काळजी घ्यायला तू जाणार का?? अचानक बरे वाटले नाही म्हणून जाऊन चार दिवस काळजी घेणे आणि आणि रोजच्या रोज त्यांची काळजी घेणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे हे अजून पुरुषांच्या डोक्यात शिरलेले नाही. ही गोष्ट काही स्त्रिया अजूनही स्वतःच्या इच्छेने आणि जीव लावून करत आहेत परंतु अजून दहा ते पंधरा वर्षांनी कोणतीही मुलगी तुमच्या आईबापांचे काळजी वगैरे घेणार नाही इतके नक्की. आणि त्यात चुकीचे काहीही नाही.

माझ्यामते विवाह संस्थेचे यश हे स्त्रियांना पूर्णपणे दाबून त्यावर आधारलेले होते. नाहीतर ज्या प्रमाणे आज चालू आहे तीच गोष्ट आधी झाली असती.

गावांमध्ये देखील आज-काल मुली सुशिक्षित झालेले आहेत व सासरी जाच झाला असता त्या बिनधास्त घरी निघून येतात. आता खरोखर जाच होत आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे परंतु थोडक्यात पटत नसल्यामुळे त्या मारून मुटकून सासरी राहणार नाहीत इतके नक्की.

माझ्या मते अजून पंचवीस ते तीस वर्षांनी विवाह संस्था ही जवळपास ( जर का मुलांनी स्वतःला बदलले नाही तर) पूर्णपणे उध्वस्त झालेली असेल. त्याचे कारण जवळपास तेव्हाच्या पिढीमधील सर्व मुली या स्वतःच्या पायावर उभ्या असतील.

आज देखील स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या खूप मुली आहेत त्या मुली लग्न करतात की , त्यांचे काय? हा प्रश्न विचारला जाईल परंतु आजच्या मुलींना त्यांच्या आयांनी वडिलांनी हेच पाढवलेले आहे की लग्न म्हणजे एक सुरक्षितता असते, नवऱ्याचे घर हे आता स्वतःचे घर. त्यामुळे काही प्रमाणामध्ये त्यांच्या मनामध्ये विवाह संस्था ही त्यांना महत्त्वाची वाटली म्हणून त्यांनी लग्ने केली असावीत. परंतु पंचवीस एक वर्षात हे चित्र बदलेल.

हजारो वर्षे ही संस्था अगदी निवांत यशस्वी होत राहिली. नवऱ्याने अजून एखाद दुसरे जास्त लग्न केले तरीदेखील फारसे काहीही न वाटणारी किंवा वाटले तरी बोलू न शकणारी स्त्री ही अगदी पन्नास ते साठ वर्षांपूर्वीपर्यंत अस्तित्वात होती. म्हणजेच एका प्रकारे किती लाचार पणे जगणे असेल. मुलांवर मुले पैदा करणारी स्त्री हीदेखील गेल्या पन्नास वर्षांपर्यंत अस्तित्वात होती. त्यामुळे लग्नसंस्था ही अत्यंत यशस्वी संस्था आहे असे म्हणणाऱ्या लोकांवर मला फक्त हसायची इच्छा होते. ज्या संस्थेमध्ये अशा गोष्टी सर्रास घडत होत्या त्याला यशस्वी कोणत्या तोंडाने म्हणता येते मला माहित नाही. कोणी आपले ज्ञान प्रकट करून हे सांगत असतात की मुघल आल्यानंतर बहुपत्नीत्व वगैरे आलं कदाचित त्यांनी आपले पुराण आणि त्याकाळातील गोष्टी कधी वाचलेल्या दिसत नाहीत असे वाटते. अगदी देवांपासून,राजांपासून साध्या माणसापर्यंत सगळ्यांची बहुपत्नीत्वाची उदाहरणे असलेल्या गोष्टी पुराणात सापडतात.

आपण मर्त्य जगामध्ये राहतो. येथे निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट ही कधी ना कधीतरी नष्ट होण्यासाठीच जन्माला येते. विवाह संस्था हे देखील त्याला अपवाद नाही. त्यामुळे ती नष्ट झाल्यामुळे व्यभिचार वाढला आहे किंवा तरुण मुले बिघडली आहेत अशी कारणे शोधण्यापेक्षा मुळामध्ये जाऊन विचार केला असता वेगळेच चित्र दिसून येईल. खरे तर निम्म्यापेक्षा जास्त संसार हे मना मधील काडीमोड पेपर वर येऊ शकत नाही म्हणून चालू असतात. समाज, पालक, मुलेबाळे या सगळ्यामुळे ..केवळ चालवायचे म्हणून.

सहज मजा म्हणून एक प्रयोग सांगायचा प्रयत्न करतो……..समजा लग्न झालेल्या प्रत्येक माणसाला पाच वर्षानंतर जर का पार्टनर बदलायचा (विना कटकट) ऑप्शन कायद्याने दिला तर कळेल लग्नसंस्था किती पाण्यात आहे. आणि किती दुतोंडी.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

क्लिक करा!


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!