Skip to content

मुलांना घडवताना या गोष्टींचा जरूर विचार करा!

मुलांना घडवताना या गोष्टींचा जरूर विचार करा!


मुलांमधील कलात्मक गुण वाढीस लागावे, यासाठी त्यांना त्यांच्या आवडीनुसार खेळ किंवा ज्या कला त्यांना आवडत असतील त्यामध्ये त्यांना मनसोक्त गुंतू द्यावे. मनसोक्त गुंतल्यामुळे मानसिक रीत्या त्यांचा विकास होईल. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत किंवा येणाऱ्या परिस्थितीत समायोजित करण्याची त्यांची क्षमताही वाढण्याची शक्यता निर्माण होईल.

मुलांना विविध प्रश्न विचारावे.

मुलांवर संस्कार करताना त्यांना फक्त उपदेश करू नका, तर मुलांच्या त्या गोष्टी विषयी काय मत आहे, हे जाणून घ्या. त्यासाठी मुलांना प्रश्न विचारावे. जसे की, भांडण करणे योग्य आहे की आयोग्य? खोटं बोलायला हवं, असं तुला वाटतं का? लवकर उठल्याने खरंच फायदे होतात का? याप्रकारे प्रश्न विचारावे व त्यांनी दिलेल्या उत्तरावर तुम्ही तुमचं मत त्यांच्यासमोर मांडा.

प्रत्येक नियमांमागचं कारण सांगावे.

असं करू नकोस, असं सांगण्यापेक्षा असं का करू नये, हे त्याला समजावून सांगावे. त्याला आपोआप पटेल तो परत ती गोष्ट करणार नाही.

मुलांशी संवाद साधावा.

पालक व मुलांमध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे. आम्ही असं करायचो, असे सतत सांगू नका. शेवटी काळानुसार फरक पडतो. तुमच्या बालपणीच्या चांगल्या गोष्टी सांगा. मुलांचा मूड बघून त्यांच्याशी संवाद साधा. त्यामुळे त्यांच्या मनातील अनेक गोष्टी तुम्हाला कळतील.

विचार लादू नये.

पालकांच्या प्रत्येक गोष्टीचा प्रभाव हा मुलांवर होत असतो. मुलांचं मन प्रत्येक गोष्ट टिपणारं असतं. त्यामुळे पालकांच्या वागण्या बोलण्याचा त्यांच्यावर गंभीर परिणाम होत असतो. म्हणून कोणतीही गोष्ट त्यांच्यावर लादू नये. असे केल्याने हळूहळू ते पालकांपासून दुरावतात.

छंद जोपासण्याची सवय लावावी.

मुलांमधील कलात्मक गुण वाढीस लागावे, यासाठी त्यांना त्यांच्या आवडीनुसार खेळ किंवा ज्या कला त्यांना आवडत असतील त्यामध्ये त्यांना मनसोक्त गुंतू द्यावे. कराटे, स्विमिंग, भरतनाट्यम, नाटक असे वेगवेगळ्या कला गुणांमध्ये जर मुलं तुमची रमत असतील तर त्यातून तुमच्या मुलांना मानसिक ऊर्जा मिळत असते. ज्याचा चांगला परिणाम हा मुलांच्या अभ्यासावर होत असतो.

संपर्कात येणाऱ्यांची माहिती ठेवा.

मुलांचे मित्र-मैत्रिणी यांच्या विषयी पालकांना माहिती असायला हवी. त्यावरून मुलांवर कोणाचा प्रभाव अधिक आहे, याचा अंदाज पालकांना सहज मिळवता येतो.

चुकत किंवा रडत असल्यास त्यांना रडू द्यावे.

मुलं चुका करत असतील तर ते खूप चांगले लक्षण आहे. त्यांनी केलेल्या चुकांवर त्यांना ओरडू नका. त्या चुकांमधून पुढे कसं शिकता येईल, हे त्यांना शिकवा. जर मुलं पुन्हा त्याच चुका करत असतील तर याचा अर्थ तुम्ही त्यांना त्यांच्या वयात जाऊन त्यांना ट्रीट नाही करत आहात.

उपदेशाचे डोस देणे टाळावे.

मुलांच्या वर्तनामध्ये पालकांना जे काही अपेक्षित आहे, ती गोष्ट अगोदर पालकांनी स्वतःच्या वर्तनात आणावी. तुम्ही जितकं बोलाल, तितकी मुले कोडगी होतात. म्हणून वागण्यातून शिकणं, हे केव्हाही उत्तम असेल.

मुलांसमोर पालकांनी भांडू नये.

मुलांच्या शैक्षणिक मागासलेपण किंवा वर्तन समस्यांना जर कोणते महत्वाचे कारण असेल तर ते पालकांचे असमाधानी वैवाहिक जीवन आहे. कित्येक पालक मुलांसमोर काही गोष्टी येऊ नयेत म्हणून भावनांचा ताबा ठेऊन असतात, परंतु त्याचा पारा वाढला की मग मुलांसमोर भांडणे, वादावादी होतात. यासाठी पालकांनी समजुतीने केवळ मुलांसाठी काही गोष्टी क्षुल्लक मानून पुढे चालावे.

लैंगिक शिक्षण द्यावे.

वाढत्या वयाबरोबर पुष्कळ मानसिक-शारीरिक बदल मुलांमध्ये होतात. ज्याचा नेमका अर्थ मुलांना कळणे, ही काळाची गरज आहे. पालकांनी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून मुलांशी बोलावे. जेणेकरून बाहेरची अशास्त्रीय माहितींकडे ते आकर्षित होणार नाहीत.


अश्या आणखीन पुष्कळ गोष्टी मुलांना जाणीवपूर्वक वेळ देऊन पालकांनी शिकवाव्यात. तसेच एका उत्कृष्ठ पालकत्वाच्या दिशेने पाऊल टाकावे.

धन्यवाद!


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

क्लिक करा!



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!

***

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!