Skip to content

तू चाल पुढं तुला रं गड्या भिती कशाची, पर्वा बी कुणाची!

तू चाल पुढं तुला रं गड्या भिती कशाची, पर्वा बी कुणाची!


राकेश वरपे
(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


‘डबल सीट’ या मराठी चित्रपटातील सुंदर गीताने या लेखाची सुरुवात करूया. कारण विषय सुद्धा हुबेहूब या गीताच्या शीर्षकाला लागू होतोय. सद्यस्थितीत असे अनेक उदाहरणं आपण अवतीभवती अनुभवत असतो. तसेच असे अनुभव स्वतःला सुद्धा कोणत्यातरी वळणावर येऊन गेलेले असतात. अशावेळी निर्णय घेणे खूपच कठीण होते. मनावर प्रचंड ताण येतो. केवळ इतरांची मर्जी राखावी किंवा परिस्थिती नियंत्रणात रहावी म्हणून आपली स्वप्ने पायदळी तुडवावी लागतात आणि मग पुढे मात्र कळतं, वळतं तसेच चांगलंच जाणवतं की थोडासा सय्यम बाळगला असता, थोडीशी डेअरिंग केली असती, थोडंसं स्वतःला प्रश्न विचारले असते तर आज रिझल्ट काही वेगळेच दिसले असते.

‘पण असो..’

या शब्दाचा उपयोग करून लगेच झापडं उघडावी, अशी सांत्वनपर शब्द सुनावून रमलेल्या भूतकाळातून स्वतःला आपण बाहेर खेचून आणतो.

तर काही उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया….जे आपण कधीनाकधी मनात पुटपुटत असतो.

● सरासरीपेक्षा अधिक प्रत्येक विवाहीत स्त्री आणि पुरुषाला नेहमी वाटतं की बघायला आलेल्या त्या मुलाला किंवा मुलीला होकार कळवला असता, तर आज आयुष्य वेगळं असतं.

● वेळीच आपल्या मुलाला किंवा मुलीला हाताबाहेर जाऊ दिलं नसतं तर आज ते आपल्याशी उलट वागले नसते.

● या ठिकाणी ३९ लाखाचा फ्लॅट घेऊन चुकी झाली आमची. सगळे पैसे आमचे वाया गेले.

● ११ वी मध्ये सायन्स न निवडता कला शाखेत गेलो असतो तर कदाचित आज आनंदाने जीवन जगलो असतो.

● वेळीच प्रियकराची हवी ती इच्छा पूर्ण केली नसती तर आज तो मला सोडून गेला नसता.

● मागची नोकरीच खूप छान होती, इथे फार वैताग येतोय.

● तिला जाऊन आज ३ वर्ष झाले, अचानक एकटी सोडून देवाघरी गेली.

● मागच्या मुलाखतीत त्या एका प्रश्नाचे उत्तर दिले असते, तर आज साडे दहा लाखांचं पॅकेज असतं.

● मला असं बोलायला नको होतं, भावनेच्या भरात नको-नको ते मी बोलून बसले.

● काल रात्री मुलाला इतकं मारायला नको होतं. किती बैचेन झाला होता तो.

● विनाकारण १ लाखाने फसवलो गेलो. पाई-पाई बचत केली होती.

अशी नेक-अनेक उदाहरणं इतरांबद्दल तसेच आपल्याबद्दल आपण दररोज अनुभवतो.

पण मित्रहो तुम्हाला सांगू का, की ही सर्व वाक्य आपल्याला मागे ओढणारी आहेत. ज्या व्यक्ती स्वतःशी अतिप्रमाणात निगेटिव्ह ‘self talk’ करतात त्यांची पुढे जाण्याची प्रेरणा ही घटते. आपल्या मागे जे काही घडलं किंवा घडतंय त्याचा जर आपण अजूनही नकारार्थी विचार करत असू, तर पुढे सुद्धा अशाच कित्येक प्रसंगांना आपण नकळत आमंत्रीत करीत असतो.

आपण जो विचार जास्त करतो त्याची ऊर्जा ही अवतीभवती पसरत असते आणि तसेच अनुभव वारंवार येत राहतात.

त्यापेक्षा हे करून बघा..

● त्या मुलाला किंवा मुलीला होकार कळवला असता तर आज आहे त्यापेक्षाही वाईट परिस्थिती ओढवली असती.

● प्रियकराची इच्छा पूर्ण झाली की तो सोडून देतो, मग लग्न जर झालं असतं त्याच्याशी तर मी पूर्णतः अडकून गेले असते. आज मी मोकळी आहे.

● १ लाख वाया गेले असले तरी आता त्याला शोधण्यात वेळ फुकट न घालवता २ लाख कसे कमवू शकतो, इकडे मी माझं पूर्ण लक्ष पुरवेल.

● काल मुलाला मारायला नको होतं, आता पुन्हा तसं माझ्याकडून घडणार नाही, हे माझ्या वागण्यातून जेव्हा त्याला दिसेल तेव्हा तो स्वतः मला माफ करेल.

● मागच्या मुलाखतीत बरं झालं तो प्रश्न चुकला, नाहीतरी शनिवारची सुट्टी मिळाली नसती आणि माझ्या छंदांना वेळ नसता देता आला.

असंच काहीसं इतर प्रसंगाबाबत! असं केल्याने भूतकाळातील प्रसंगाबाबत आणि आहे त्या प्रसंगाबाबत उत्कृष्ट समायोजन होण्याची शक्यता वाढते.

असा विचार केल्याने मागची स्थिती बदलणार नाही, पण आपले त्या प्रसंगात अडकलेले विचार फूरररकन निसटतील आणि नव्याचा शोध घेण्यास सुरुवात करतील.

आपल्याच मार्गावर आपण तयार केलेले हे अडथळे आहेत. मागचं सर्व ऊनधुनं विसरून एका नव्या आयुष्याचा प्रारंभ करूया….

असं आयुष्य जे अजूनही आपल्याला खुणावतंय, आणि आपली आतुरतेने वाट पाहतंय….

म्हणून….

तू चाल पुढं तुला रं गड्या भिती कशाची, पर्वा बी कुणाची!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!