Skip to content

प्रत्येक जण खोटा मुखवटा धारण करून जगतोय!

प्रत्येक जण खोटा मुखवटा धारण करून जगतोय!


राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


हसत असणाऱ्या सर्व व्यक्ती मनातून सुखी आनंदी असतीलच असे नाही. यामध्ये चार्ली चँपलीन हे एक उत्तम उदाहरण आहे हे तुम्हाला माहिती आहे.

काही व्यक्तींना अगदी लहान लहान गोष्टींवरही रडायला येते. अशा माणसांवर लोक हसतात, रडूबाई म्हणून चिडवतात. परंतु अशी व्यक्ती मनाने फार स्वच्छ आणि हळवी असते. कारण ती संवेदनशील असते. त्यामुळे जरा जराशा गोष्टींसाठी त्यांच्या डोळ्यात पाणी येते.

काही व्यक्ती अशा असतात, ज्या साध्या साध्या गोष्टींवर चिडत असतात, रागवत असतात. अशा व्यक्तींच्या वागण्यावर जाऊ नका तर त्या व्यक्तीला समजून घ्या. कारण त्या व्यक्ती मनातून फार एकटी आणि अस्वस्थ असू शकते. त्या व्यक्तीला प्रेमाची गरज असेल जे तिला कोणाकडूनही मिळालेलं नसतं. त्या व्यक्तीच्या अशा वागण्यामुळे तिला चुकीचेच जज करू नका, तर त्यामागची अवस्था समजून घ्या.

माणसं समजून घ्यायला शिकायला हवं. माणसांचा स्वभाव ओठात एक आणि पोटात एक असा असतो. तसेच काही माणसे फार हळवी असतात, त्यांच्या मनात एक असतं आणि ती वागतात मात्र वेगळंच. मनातून दुःखी असलेली व्यक्ती आपले दुःख कोणाला कळू नये म्हणून ते मनात दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत चेहर्‍यावर मात्र हास्य ठेवण्याचा प्रयत्न करते.

चित्रपटात खलनायकाची भूमिका करणारे अनेक नट मनाने खूप हळवे आणि प्रेमळ असतात. परंतु आपण त्यांच्या भूमिकेवरून त्यांचा स्वभाव ठरवत असतो. माणूस जसा दिसतो तसा तो नसतो. प्रत्येकजण मनाचं खरं प्रतिबिंब चेहर्‍यावर उमटू न देता, खोटा मुखवटा धारण करून जगात वावरत असतात.

पुढील काही लक्षणे आहेत, ज्यातून माणसांना ओळखणं सोपं जाऊ शकतं.

● जी व्यक्ती फार भावनिक असते, ज्यांना एखाद्या कमी भावनिक प्रसंगातही पटकन रडायला येतं, अशा व्यक्तींना प्रेमाची गरज असते, त्यांना समजून घेण्याची गरज असते. ते सतत सुरक्षित वातावरण शोधत असतात.

● ज्या व्यक्ती क्षुल्लक कारणांवरून चिढतात, वैतागतात. अशांना मनाविरुद्ध काही घडू नये, असे वाटत असते. प्रत्येक स्थिती आपल्या आटोक्यात असावी, त्याचे प्रतिनिधित्व आपणच करावे, असे त्यांना वाटत असते.

● काही व्यक्ती प्रचंड लाजरे आणि शांत स्वभावाचे असतात. अशांना लहानपणी अत्यंत कमी प्रमाणात बोलू दिलेलं असतं, त्यांची मते विचारात घेतली गेलेली नसतात. त्यामुळे पुष्कळ ठिकाणी त्यांचा वेळ हा नवीन परिस्थितीत स्वतःला ऍडजस्ट करण्यातच जातो.

● काही व्यक्ती तोंडावर फार साखरेदार बोलतात. गोड बोलून कामे कशी करून घ्यायची या मतावर ते जीवन जगत असतात. त्यांच्या मनाविरुद्ध घडल्यास एकतर ते चिढतात किंवा मग वारंवार आपले गोड मुद्दे मांडत राहतात.

● काही व्यक्ती या स्पष्ट स्वभावाचे असतात. स्पष्ट मत मांडणे, आकर्षित गोष्टींवर कंट्रोल करणे, मनाविरुद्ध प्रसंगात स्वतःला ऍडजस्ट करून पुढे चालणे याबाबतीत ते फार पारंगत असतात. कारण जगण्याविषयी एक वेगळं ध्येय ते बाळगून असतात. कोणत्याही प्रसंगात फार काळ अडकण्याची त्यांची तयारी नसते.

इतरही अनेक लक्षणे आपण दररोज अनुभवत असतो. तरीही कोणत्याही एका व्यक्तीचा पुरेपूर स्वभाव आपल्या पूर्ण जीवनमानात आपल्याला सापडत नाही. खुद्द आपण स्वतः नेमके कसे आहोत, हे सुद्धा आपण प्रामाणिकपणे कधीच सांगू शकत नाही. कारण मानसिकता ही स्थळ, काळ, वेळनुसार सतत बदलत असते.

आणि या बदलत्या चक्रात आपण खूप सारे मुखवटे धारण केलेले आहेत.

जे आपल्याला वाटतात की हे जगण्यासाठी आवश्यक आहेत.

म्हणून कोणत्याही एका प्रसंगात व्यक्तीला स्वभावाचा लेबल लावू नका. कारण तात्काळ लेबल लावून मोकळं होणं, हा सुद्धा एक स्वभावच आहे.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

क्लिक करा!


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!