Skip to content

जगात सुंदर असे खूप काही आहे, तू फक्त नजर बदल!

झाले मोकळे श्वास….


श्वेता पेंढारकर


किती शुल्लक गोष्ट होती ना …मनाच्या आधीन जाऊन नुसता त्रास करून घेतला आपण ….स्वतःशी ती पुटपुटली…दोन्ही हाताने आळोखे पिळोखे देत तिने आळस झटकला….रोजच्या पेक्षा आजची सकाळ काही वेगळी होती…धुकं असले तरी सगळी कडे स्वच्छ दिसत होते तिला …डोळ्यापुढे आलेली काजळी निघाली होती…रात्रभर जागून सुद्धा सकाळ लोभस होती …प्रसन्न मुद्रेने ती सभोवताली पहात होती ..आकाशात उडणारा पक्षाचा थवा पाहून तिच्या तोंडून नकळत गेले …वाह किती सुंदर दिसत आहे दृश्य…पूर्वी कडे दिवसभर दाह ओकणारा गोल…तिच्या विचारानं सारखा शांत होता ..त्याच ते सौंदर्य मनात एक सकारात्मक ऊर्जा होत…

आपल्याच बागेत उमळणारी फुल आज नव्याने बहरलेली वाटली..समोरच्या तळ्यातील कमळ आणि त्यातुन धड्पडून बाहेर पडणारा भ्रमर अगदी तिच्या सारखा भासला तिला…झाडाच्या खोडाशी कोशात बांधलं गेलेले सुरवंट बहुतेक फुलपाखरू होण्याच्या अवस्थेत आलं होत…आणि तिने एकटक त्याच्या कडे नजर लावली किती ती धडपड..वरील एवढं वेष्टन झुगारून हे बाहेर येणार वाह…खूप वेळच्या निरीक्षण नंतर इवलेसे पाखरू बाहेर आले ..

ती स्वतःशी हसली किती सोप्प होत नाही कोषातून बाहेर पडणं.. थोडा त्रास आणि मग फक्त आनंद …समोरच्या झाडावर घरट्यात असणारी अंडी बहुतेक जीव धारण केलेली होती ..त्याचा चिवचिवाट खूप सुखद होता ..चिमणी पिलांच्या चोचीत काहीतरी भरवत होती आणि चिमणा दर पाच मिनिटांनी चोचीत काहीतरी घेऊन येत होता..एवढ्या टणक अवरणातून बाहेर येणं अवघड होत पिल्लाना पण प्रेमाची उब,आणि बाहेर येण्याची उर्मी याने ते सहज शक्य झाले होते …

गवतात कसला तरी आवाज झाला सळसळ पाने हलली आणि ती चमकली ..दगडाच्या कपारीत चार पाच फुटी साप होता ..अंगावर भीतीने काटा आला पण अंतर खूप असल्याने तिने निरीक्षण केले ..दगडाच्या कपारीचा आधार घेत तो पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होता ..प्रथम दिला वाटले अडकला आहे काठीने बाजूला करू या का ??पुन्हा तिने नीट पहिले तर मागे वित दोन वित कात तिला दिसली ..बाप रे कात टाकण्या साठी इतका त्रास इतके हाल…तरी पुढील जीवन सुखकर करण्या साठी किती तो प्रयत्न..या त्रासा नंतर तो नव्याने जन्म घेणार होता..

किती सुंदर आहे ना हे जग किती गोष्टी आहेत प्रेम करण्या सारख्या,किती गोष्टी आहेत शिकण्या सारख्या या प्रत्येकाने मला एक नवीन गोष्ट शिकवली आणि सगळी एकाच ठिकाणी येऊन थांबली की बाहेर ये ..या कोषा मधून …जगात सुंदर असे खूप काही आहे..तू फक्त नजर बदल..पहा प्रेम करण्यासाठी तो ,किंवा तुझी त्याचाच प्रेम मिळण्या साठीची धडपड आणि स्वतःला तू करून घेतलेला त्रास सगळा नाहक होता…

आपण ना खूप वेडे असतो अमुक एक गोष्ट अमुक एका कडून हवी हा अट्टाहास असतो…त्या पलीकडे जग आहे जे आपल्यावर प्रेम करणारे आहे हे आपण विसरूनच जातो ..”हे जिवन सुंदर आहे,नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली ,किती सुंदर आहेत ओळी.. खरंच हे जीवन किती सुंदर आहे…

आपण गेले कित्येक दिवस याला फक्त मातीमोल केलं..असो…तिचा दीर्घ श्वास हा नवीन श्वास घेण्या साठी होता ..तिने ही आज जणू नवीनच जन्म घेतला होता …स्वतःवर भरपूर प्रेम करणार होती ती ..आणि सगळ्यांवर ही कोणत्याही अपेक्षा न ठेवता फक्त आणि फक्त निस्वार्थ प्रेम…

कुठूनतरी सुप्रभात आकाशवाणी कानावर पडले आणि गाण्याच्या त्या चार ओळी तिला आज अधिक आनंद देऊन गेल्या …

“या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.”..शतदा प्रेम करावे…

‘दाते ‘चा आवाज आणि ‘पाडगावकराचे’ शब्द ‘देवाचं’ संगीत कुठेतरी खोलवर एक छान उर्मी देऊन गेलं हे खरं….


आवाहन – सभोवतालची अस्वस्थता वाढत आहे. ही चाहूल लक्षात घेता. आम्ही सर्व मानसशास्त्र विद्यार्थ्यांना आवाहन करत आहोत की आपण जास्तीत जास्त लेख लिहावे. आपल्या लेखाची योग्य दखल घेऊन प्रकाशित केले जातील. तसेच सोबत काम करण्याची संधी देण्यात येईल. संपर्क – ९१७५४२९००६.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!