Skip to content

मीठ खा…पण जरा सांभाळून !!!

मीठ खा…पण जरा सांभाळून !!!


मीठ केवळ अन्नाची चव वाढवते असं नाही. आपल्या जन्माच्या आधीच आपलं मिठाशी नातं निर्माण होतं. हे नातं आयुष्यभर टिकून राहतं. खूप कमी जणांना हे माहिती आहे कि, गर्भामध्ये साधारण ९ महिने बाळ ज्या पाण्यामध्ये असतं, ते मिठाचं पाणी असतं. आपल्या हाडांमध्ये सुद्धा मीठ असतं. आपला घाम आणि अश्रू हे खारट असतात. याचाच अर्थ असा कि, मिठाशिवाय आपण जगूच शकत नाही. पण जेव्हा हे मिठाचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त असतं, तेव्हा ते आपल्यासाठी जीवघेणं होतं.

मीठ आपल्यासाठी काय करतं ?

खूप कमी प्रमाणात मिठाचे सेवन करण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. या स्थितीला हाईपोनेट्रेमिया असं म्हणतात. शरीरात मिताच्या कमतरतेची सुरुवातीची लक्षण म्हणजे थकवा, मानसिक अस्वस्थता, चक्कर येणे, पेशींमध्ये आखडलेपणा, भूक कमी लागणे हि आहेत. लक्षणं जास्त गंभीर फिट्स येऊ शकतात. व्यक्ती कोमातही जाऊ शकते. मीठ शरीरात पाण्याची पातळी नियंत्रित करण्याबरोबरच अनेक कामं करते.

मीठ आपल्या मेंदूच्या पेशींमध्ये ऍसिडिटीला बाहेर काढते. किडनी मिठाशिवाय व्यवस्थित काम करत नाही. मीठ तणाव, नैराश्य, मानसिक समस्या यांपासून मुक्तता देते. मीठ ब्लेडरच्या समस्येला नियंत्रित करते. जर मूत्रावर नियंत्रण नसेल तर आहारातील मिठाचं प्रमाण वाढतं. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. मधुमेहाने त्रस्त लोकांमध्ये इन्शुलिन घेण्याची गरज कमी पडते. अनियंत्रित हार्टबीट झाल्यानंतर जर एक चिमूट मीठ जिभेच्या शेवटी ठेवले आणि ते विरघळू दिले तर समस्या थांबते.

आपल्या पचनयंत्रणेला अन्न व्यवस्थित शोषून घेण्यासाठी मिठाची आवश्यकता असते. मिठाच्या कमी सेवनामुळे ऑस्टिओपोरोसिस नावाचा आजार होतो. शरीरात मिताच्या कमतरतेमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. हे एक उत्तम फूड प्रिजर्व्हेटिव्ह आहे.
अनरिफाईंड मीठ सोंदर्य प्रसाधनांसाठी वापरतात. पोटेशियम बरोबर ते मिसळून शरीरात द्रव, ज्यामध्ये रक्ताचाही समावेश आहे, जे दबावाला नियंत्रित ठेवते. जेव्हा शरीराला मिठाची गरज असते, तेव्हा ते हाडांमधून घेते. यामुळे हाडं पातळ, मुलायम आणि कमजोर होतात.

मीठ सांभाळून खा.

अधिक प्रमाणात मिठाचं सेवन करण्याने हायपर टेन्शन आणि हाय ब्लडप्रेशरचा त्रास होतो. सतत हायपर टेन्शन मुळे हृदयरोग, स्ट्रोक, किडनी संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते. जास्त प्रमाणात मीठ खाण्याने लोहाचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे ॲसिडिटी वाढते, यामुळे भूक लागली नसेल तरी भूक लागल्यासारखे वाटते, यामुळे शरीरात अधिक प्रमाणात कॅलरीज जातात, लठ्ठपणा वाढतो. याशिवाय मिठात असणाऱ्या सोडियम पाण्याला स्पंच प्रमाणे शोषून घेते. त्यामुळे वजन वाढतं, शरीराला सूज येते. विशेषतः हात आणि पाय ज्यास ईडेमा असे म्हणतात. ईडेमा तेव्हा होतो, जेव्हा शरीर अधिक सोडियमला संतुलित करण्यासाठी अतिरिक्त तरल पदार्थांना शरीरात थांबवतो. मिठामध्ये असणारे सोडियम जर अधिक प्रमाणात शरीरात गेलं तर पोटाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.

म्हणून निरोगी राहण्यासाठी मिठाचं सेवन सीमित प्रमाणात करणे आवश्यक आहे.



online counseling घेऊन मिळालेली प्रतिक्रिया नक्की वाचा आणि अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !


Online Counseling मध्ये कोणत्याही प्रकारची व्यक्तिगत माहिती जसे की नाव, ठिकाण, ओळख, समस्या हे उघड केले जात नाहीत, त्या गोपनीयच ठेवल्या जातात, कृपया याची नोंद घ्यावी.


Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!