Skip to content

सांग ना काय चूक आहे माझी….? तिचा केविलवाणा प्रश्न!

सांग ना काय चूक आहे माझी?…


श्रुती वारणकर


सांग ना काय चूक आहे माझी?…

वयाच्या एकविसाव्या वर्षी देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आणि आई बाबांच्या संमतीने लग्न झालं तुझ्याशी. हळूहळू गुंतले तुझ्यात. प्रेम काय असत, हे तू आयुष्यात आल्यावर कळलं. फक्त तुझ्यासाठी मी आयुष्यभर जगेन हे वचन मी माझं मलाच दिल. तुझ्या प्रेमाखातर तुझ्यामुळे जुळलेली प्रत्येक नाती मनापासून जपली. कधी स्वतःचा मीपण दाखवत मिरवले नाही कि कधी मोठ्यांना वर मान करून बोलले नाही. कधी सासरच्या सततच्या परकेपणाच्या त्रासाला कंटाळून माहेरी परतले नाही. तर कधी कुणाचा अपमान केला नाही. सगळ्या गोष्टी निरर्थक होत्या माझ्यासाठी… जेंव्हा तू मिठीत घ्यायचा. दिवसभराचा थकवा तुझ्यासमोर क्षीण होत होता. तुझ्या येण्याच्या चाहुलीने मोहरत होते मी. स्वतःच भान हरवून दाराकडे बघत होते मी. दिवसभर वाट तुझी बघून तुला समोर बघताच ठोके वाढत होते माझे. तुझ्या सोबत प्रेमच उच्चक गाठतांना सर्वस्वी मी तुझीच होते रे . सांग ना कुठे चुकले मी …. ?

आपल्या पहिल्या प्रेमाचं प्रतिक मी गरोदर असल्याची बातमी मी दिली. बाळाच्या येण्याच्या चाहुलीने किती खुश होतो आपण. मला आजही आठवते तू किती आतुरतेने वाट बघत होता ते. नंतर माझे सतत बदलणारे मुडविंग, सतत मी आजारी असायची त्यात तुझी शाळा तुला फार कठीण जायचं .तुला फार त्रास होत असे . मला सुद्धा वेळ द्यायला वेळ मिळत नसे. मी स्वतःला एकटी एकटी समजून मी नऊ महिने असेच रडत तुझ्या येण्याची वाट पाहत झुरून काढले शेवटी सात महिने पूर्ण झाले आणि मला बाळंतपणासाठी आईपपा माहेरी घेऊन गेल. आपल्या बाळाचा छोटासा ओटीभरणाचा कार्यक्रम झाला. त्यात आपल्या फॅमिली इगो मुळे तू पहिल्यादा भांडलास.फार वाईट वाटून ही मी हसत च राहिले आपल्या बाळांसाठी.

मी सतत वाट पाहत राहायची. तू येशील ना अशी सतत तुला बोलत असायची,तू बोलायचास तुझी डिलिव्हरी असेल तेव्हा माझ्या शाळेतल्या मुलांची परीक्षा असेल ग बघतो प्रयन्त करतो.शेवटी तो दिवस आला ०४ एप्रिल २०१८ ला मी १२ वाजता admit झाले. तुझी फार आठवण येत होती. मला कळत नव्हतं तू जवळ नाहीस म्हणून दुःख करू की बाळ येणार म्हणून आनंद करू. न राहून मीच कॉल केला मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालीय.शब्दाचा दिलासा देऊन फोन ठेवला.डिलीव्हरी खूप कठीण झाली होती.आईपापा भाऊ सर्व टेन्शन मध्ये होते . तेव्हा तुझा हात हवा होता. जवळ असावास अस वाटत असतानाच ०५ एप्रिल २०१८,संध्याकाळी ६.३० ला एक गोंडस गोड परी आली.

सर्वजण खूप आनंदी होते, तू घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी भेटायला आलास विचारपूस करून लगेच निघून गेलास. थांब ना,,, केविलवाणी हाक सुद्धा तुला समजून नाही आली.फार वाईट वाटत. हे दुःख पचवता पचवता पिलूला कावीळ झाली. पिलूला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन ऍडमिट झालो. तेव्हाही आला नाहीस पैसे देखील देऊन गेला नाहीस.सासरचे सर्व माझे डायरेक्ट बारशाला आले. बारशा छान पार पडला.पिलू बरी होता होता पुन्हा आजारी झाली ३ दिवस पुन्हा ऍडमिट झालो,डॉक्टरांनी फार घाबरून सोडले पिलूची कावीळ लास्ट स्टेज ला आलीय.

स्वतःला सावरून घेतलं. आणि पिलू ३ दिवसात पूर्ण बरी झाली नशीब यावेळी सोबत होतास.तेवढा आधार वाटला.बाळाच्या काळजीत तुझ्यावर थोडंसं दुर्लक्ष झालं माझ्याकडून. पण मला ते कळत होत. मुलगी झाली आणि मी जरा गुंतले रे तीच करण्यात. काय करू नवी नवी आई झाले होते. इवल्याश्या माझ्याच प्रतिबिंबाला सतत मिठी मारावीशी वाटतं होती मग तुझ्या मिठीत शिरणं जरा कमी झालं होत. मी आई झाले होते तर तुही बाबा झाला होतस ना. आनंद बघत होते मी तुझ्या चेहऱ्यावर पण त्या वेळेसही बाळ झोपेपर्यत तुझं माझ्यासाठी वाट बघणं मला मुलीच्या बाबांवर परत प्रेमात पाडत होत. मातृतव आता कुठे अनुभवत होतेच तूच माझं विश्व होतास, तुझ्या मागे पुढे फिरले कि जग फिरून येत होते मी. त्या वेळेस मी जगातली सर्वात सुखी स्त्री होते. नवरा अतोनात प्रेम करत होता.हळू हळू माझ्या मातृत्वाचे अनेक टप्पे गाठत मी आईपण आणि बाईपण जगत होते.

ह्या सर्वांमध्ये मला तुझं प्रेम अति प्रिय होत. उमगत होत रे मला मी किती गुंतल्या जात होती आईच्या भीमीकेत. मग फक्त तुझ्यासाठी वेळ काढून स्वतःला आवरायची. पण तू शाळेत खूप दमायचास वाटतं., घरी आलास मोबाईल घेऊन सोफ्यावर झोपायचास सतत कुणाशीतरी चॅट करत राहायचास. पिलू पुढ्यात रडतेय,हेसुद्धा भान नसायचं. मला सुद्धा जाणवत होते कायतरी गडबड आहे.पण मी लक्ष नाही द्यायची.कारण मी स्वतःच फार मनाने आणि शरीराने खूप आजारी पडायची.स्वतःचा मोबाईल चा बॅलन्स संपला की माझं च हॉटस्पॉट घेऊन रात्री सतत ऑनलाईन असायचा.मला आणि पिलूला पूर्ण विसरत होता.जबाबदारीची जाणीवच झाली नव्हती.

अचानक त्या दिवशी रात्री लाईट्स गेले, आणि अंधार झाला फॅन बंद झाला म्हणून सिया उठली मी जवळ घेऊन मोबाईल शोधत असताना नेमका समीरचा (नवरा) फोन हाती लागला. पासवर्ड होता मोबाईल ऑन करताच तुझ्या मोबाईलवर मॅसेज दिसला.पण मॅसेज बघून मी क्षणभर मृत झाले होते. “लव्ह यू बाबू” “माझ्यासाठी इतका वेळ देतोस….”असे खुप काही मॅसेज होते. नक्की कोण आहे ही म्हणून तुला झोपेतून उठवून लॉक काढून घेतले आणि मी जरा चेक केला तर बापरे .. शाळेतील एक टीचर होती. तरीही विश्वास बसला नाही. आणि तुझ्याशी बोलून मला तुला दुखावण्याची भीती होती. मग हळूहळू तुझं बदलणार स्वरूप मी ओळखायला लागले होते.तुला जरा काहि विचारलं तर तू माझ्यावर चिडायला लागला होता. तुझं वागणं बदलल होत. घरी उशिरा येणं. तास तास टॉयलेट ला मोबाईल घेऊन बसणं . सुट्टीच्या दिवशीही घरी नसणं. मग हिंमत करून तुला विचारलंच, नंतर शाळेतून मला सर्व फोन करून काही बाही सांगू लागले.मी पूर्ण मरून गेली होती शेवटी. हि अर्पणा कोण आहे तुझी.

तू जरा सुरवातीला घाबरलास, मग स्वतःला सावरत मलाच उडवाउडवीची उत्तर देत आणि रागवत होतास.मला सर्व समजले असताना ही तुमच्यातले नॉनसेन्स चॅट चालू होते. त्या टीचारला देखील मला सर्व काही समजलंय हे जाणवून दिल तरी तीच्यात फरक नव्हताच. दोन तीन महिने खूप शांतता होती आपल्यात, मग मीच म्हटलं, तू चुकत आहेस असं वाटत नाही तुला, तू उत्तर दिलंस, हि सर्व तुझी चुकी आहे आणि त्यात काय येवढं प्रेम केलंय तिच्यावर, पण तुला सोडणार नाही मी आणि तू गप्प झोपलास.मी मात्र रात्रभर माझी चुकी शोधात होते, आणि अजूनही शोधते आहे.. नाही सापडली रे .. सांग ना कुठे चुकली मी .. कि बस स्वतःची चूक लपविण्यासाठी माझी चुकी सांगून मोकळा झालास. आहे तुझ्यात हिम्मत तुझ्या प्रेमाची कबुली सर्वांसमोर देण्याची.. आता ह्या घरात माझी मुलगी आहे.चूक तुझीच आहे अन तू ते कबुल न करून स्वतःचा कमीपणा दाखविलास. आणि मी अजूनही माझी चूक शोधत आहे.. ती जर मला गवसली तर मी ती नक्की सुधारेल पण आता तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी, माझ्या घरासाठी, माझ्या पिल्यांसाठी….कदाचित तुला प्रेमाचा अर्थ कळलाच नाही … मला माझी चूक आहे असं म्हण्यापेक्षा तू आधी प्रेमाचा अर्थ शोध .. बघ कुठे मिळतोय का .. तुझ्या आयुष्यात … आणि आता तर माझ्याकडुन तू “चेक अँड मेट”आहेस … सांभाळ स्वतःला …

आई, आई … अशी हाक येताच.. मी डायरी बंद केली आणि ती लगभगिने पिलूच्या खोलीत शिरली… हि एका मनाची कहाणी आहे जे आजही तिची चूक शोधतं आहे जी कधीच नव्हती, पण नवऱ्याच्या चुकीची सजा तिने त्याला सोडून मोकाट केलं नाही तर त्याच्या समोर राहून स्वतःच अस्तिव खंबीर केलं. त्यालाच “चेक अँड मेट” करून … मोकाट सोडणं म्हणजे एक हार आहे स्वतःची, स्वतःचा आत्मसन्मान वाचविण्याच्या नादात आपण अश्या पुरुषांना स्वतंत्र देतो जे मी केलंच नाही .. अश्याच्या पुढे राहून त्याना त्याच्याच नजरेत पाडणं हे महान आहे, जे मी आजही करते… एक मातृत्व जिंकत होत, आहे आणि राहिलही आणि एक आई तठस्थ नेहमीच असते आयुष्यभरासाठी…. मग कुठल्या पुरुषाची काय मज्जाल …

मैत्रिणींनो, सध्याच्या काळातला अतिशय नाजूक विषय आहे हा, कुणीही कधीही फेस करू शकतो, किंवा करत असाल .. तर हे मात्र नक्कीच कि चूक तुमची कधीच नव्हती ….स्वतःला कधीच दोषी ठरवू नका …

स्वतःसाठी जागा .. मातृत्व खूप महान आहे ज्याला समजेल तो चूक कधीच करणार नाही … …आणि समोरच्याला त्याची चूक दिसताच “चेक अँड मेट” करा …तुमचं आयुष्य अनमोल आहे.धन्यवाद !!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!